Headlines

Fatal road accident in Akola Two killed as iron pipes pierce truck cabin; लोखंडी पाईपांच्या वजनाखाली दोन जीव चिरडले; मूर्तिजापूरजवळ महामार्गावर नेमकं काय घडलं? काळजाचा थरकाप उडवणारा अपघात…


नागपूर-मुंबई महामार्गावर मूर्तिजापूरजवळ काळजाचा थरकाप उडवणारा अपघात

Two killed as iron pipes pierce truck cabin
(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
प्रियंका जाधव, मूर्तिजापूर (अकोला): कधी कोणाचे आयुष्य कोणत्या वळणावर संपेल, हे कोणालाच सांगता येत नाही. नागपूर-मुंबई राष्ट्रीय महामार्गावर शुक्रवारी मध्यरात्री असाच एक काळजाचा थरकाप उडवणारा अपघात घडला. रस्ते अपघातांच्या मालिकेतील हे सर्वात भीषण आणि हळवे प्रकरण समोर आले असून, यामध्ये बुलढाण्यातील दोन तरुणांचा दुर्दैवी अंत झाला आहे.

मृत्यूचा भीषण क्षण

मिळालेल्या माहितीनुसार, लोखंडी पाईपने भरलेला एक आयशर ट्रक (क्र. MH-29-BF-6074) नागपूरकडून संभाजीनगरच्या दिशेने निघाला होता. कुरुम शिवारातील तीन पुलाजवळ हा ट्रक आला असताना, अचानक चालकाचा वाहनावरील ताबा सुटला. मध्यरात्रीच्या गडद अंधारात ट्रक वेगाने डिव्हायडर ओलांडून विरुद्ध दिशेला गेला आणि थेट पुलालगत असलेल्या खोल दरीत कोसळला.

पाईपांनीच घेतला बळी

अपघाताची तीव्रता इतकी भयावह होती की, दरीत कोसळताना ट्रकमधील जड लोखंडी पाईप समोरच्या केबिनमध्ये घुसले. दुर्दैवाची गोष्ट म्हणजे, हेच पाईप थेट चालक अनिसउद्दीन रफिकउद्दीन काझी आणि क्लिनर मोहम्मद रेहान मोहम्मद नाजिम यांच्या अंगावर कोसळले. पाईपांच्या प्रचंड वजनाखाली चिरडले गेल्यामुळे या दोघांचाही जागीच अंत झाला. जोहर नगर, बुलढाणा येथील राहणारे हे दोन तरुण घरासाठी कमवायला निघाले होते, मात्र वाटेतच काळाने त्यांच्यावर झडप घातली.

Maharashtra TimesMumbai Mayor : भाजपचे धक्कातंत्र, मुंबईच्या महापौर पदासाठी महायुतीचे उमेदवार जाहीर, अमित साटम यांची घोषणा

पोलिसांची धाव आणि बचावकार्य

अपघाताचा आवाज ऐकून परिसरातील नागरिकांनी माना पोलिसांना माहिती दिली. ठाणेदार गणेश नावकार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथक तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. क्रेनच्या साहाय्याने ट्रक आणि लोखंडी पाईप बाजूला करून मृतदेह बाहेर काढण्यात आले. या प्रक्रियेदरम्यान काही वेळ महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती, जी पोलिसांनी ताकदीने सुरळीत केली.

प्राथमिक तपासात अतिवेग किंवा डुलकी लागल्यामुळे हा अपघात झाला असावा, असा अंदाज वर्तवण्यात येत आहे. या घटनेमुळे बुलढाणा शहरात आणि मृतांच्या कुटुंबीयांवर शोककळा पसरली आहे.

महिलांचे अश्लील फोटो, तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल


मुर्तिजापूर:
सोशल माध्यमावर फेक अकाउंट तयार करून महिलांचे अश्लील फोटो व व्हिडिओ व्हायरल केल्याप्रकरणी पुण्यातील एका तरुणाविरुद्ध अकोल्यातील मुर्तिजापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एका महिलेने दिलेल्या तक्रारीनुसार, आरोपी आकाश लक्ष्मण कांबळे (वय 35, रा. पिंपरी चिंचवड, पुणे) याने फिर्यादीच्या मैत्रिणीच्या नावाने बनावट अकाउंट तयार केले. त्या अकाउंटवरून फिर्यादी, तसेच तिच्या मैत्रिणीचे अश्लील मजकूर असलेले फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आले. हा प्रकार 15 जानेवारी रोजी ते 4 फेब्रुवारी रोजी घडल्याचे तक्रारीत नमूद आहे. फिर्यादीने आरोपीस फोन करून याबाबत जाब विचारला असता, आरोपीने उलट आणखी अश्लील फोटो व व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी दिल्याचेही तक्रारीत नमूद आहे. या प्रकरणी मूर्तिजापूर शहर पोलिस ठाण्यात माहिती तंत्रज्ञान अधिनियमातील विविध कलम प्रमाणे गुन्हा नोंदविण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास मूर्तिजापूर पोलिस करीत असून, आरोपीचा शोध घेऊन पुढील कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

सुनिल लाटे

लेखकाबद्दलसुनिल लाटेसुनिल प्रभाकर लाटे हे ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन’मध्ये कन्सल्टंट या पदावर कार्यरत आहेत. ते गेल्या तीन वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात सक्रिय आहेत. महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये ते स्थानिक बातम्या, लाइव्ह ब्लॉग कव्हरेज, गुन्हेगारी, राजकारण, देश-विदेश, सरकारी योजना, तसेच इन्फ्रास्ट्रक्चर आणि नागरी विकासाशी संबंधित विषयांवर नियमित लेखन करतात. २०२२ मध्ये पत्रकारितेचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी आपल्या कारकिर्दीची सुरुवात ‘लोकसत्ता ऑनलाइन’ (मुंबई) येथून केली.सुनिल यांनी राजकारण, मनोरंजन, क्रीडा आणि गुन्हेगारी अशा विविध विषयांचे वार्तांकन व विश्लेषण प्रभावीपणे केले आहे. हायपरलोकल न्यूज, क्राईम रिपोर्टिंग, राजकारण आणि चालू घडामोडींवरील नाविन्यपूर्ण डिजिटल कंटेंट लिहिण्याचा त्यांना दांडगा अनुभव आहे. त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या वृत्तपत्रविद्या विभागातून पत्रकारितेतील पदव्युत्तर शिक्षण (MA) पूर्ण केले आहे. शिक्षण घेत असतानाच त्यांनी ‘दैनिक दिव्य मराठी’ आणि ‘दैनिक पुण्य नगरी’ यांसारख्या नामांकित वृत्तपत्रांसाठी बातम्या लिहून प्रत्यक्ष कामाचा अनुभव घेतला. यादरम्यान त्यांनी प्रामुख्याने शिक्षण क्षेत्रातील बातम्यांचे कव्हरेज केले.अचूक आणि प्रभावी डिजिटल रिपोर्टिंग ही सुनिल यांची खासियत आहे. गेल्या तीन वर्षांत त्यांनी उत्कृष्ट ‘न्यूज सेन्स’ आणि ‘ब्रेकिंग न्यूज’ कव्हरेजचे संपादन कौशल्य विकसित केले आहे. महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये काम करताना वेगवान अपडेट्स देणे आणि डिजिटल वाचकांना समजेल अशा सोप्या शैलीत घडामोडींची मांडणी करणे, यात त्यांनी प्राविण्य मिळवले आहे. पत्रकारितेतील नवनवीन तंत्रे शिकून स्वतःला अधिक सक्षम बनवण्यावर त्यांचा सतत भर असतो.पत्रकारितेसोबतच त्यांना फोटोग्राफी, व्हिडिओ एडिटिंग आणि ग्राफिक्स डिझाइनची विशेष आवड असून, जाहिरात क्षेत्रातही त्यांनी काम केले आहे. सर्जनशील लेखनाची ओढ असलेल्या सुनिल यांनी काही लघुपटांचे दिग्दर्शन आणि पटकथा लेखनही केले आहे. तसेच, संगीत आणि गायन क्षेत्रातही त्यांना विशेष रुची आहे.आणखी वाचा