मुंबई : दुसऱ्या टी-२० सामन्यात आयर्लंड संघाने भारताचा अवघ्या १ धावेने पराभव केला आहे. या सामन्यामध्ये आयर्लंडने पहिल्यांदा फलंदाजी करताना १५४-८ धावा केल्या होत्या. या धावांचा पाठलाग करताना भारतीय संघाची बॅटिंग पुन्हा एकदा ढासळली. भारतीय संघ १५३-९ धावा करू शकला. या सामन्यामध्ये तिलक वर्माने एकट्याने ५५ धावांची खेळी करत कडवी झुंज सुरू ठेवली होती. पण आयर्लंड संघाने दमदार प्रदर्शन करत भारताला सलग दुसऱ्या सामन्यामध्ये पराभूत करत मालिका २-० ने जिंकली. आयर्लंडने पहिल्यांदाच या मालिकेत भारताला पराभूत केले आणि मालिका खिशात घातली. भारताने २०२३ नंतर पहिल्यांदाच टी-२० मालिका गमावली आहे.
भारताची बॅटिंग ढेपाळली
आयर्लंड संघाला आज भारतीय गोलंदाजांनी आज १५०च्या आसपास रोखले होते. त्यामुळे टी-२० वर्ल्ड कप विजेता संघ हे आव्हान सहज पूर्ण करेल असे वाटत होते. मात्र जय मुंद्रा याने पुन्हा एकदा भारताच्या टॉप ऑर्डरला स्वस्तात माघारी पाठवत झटका दिला. विशेष म्हणजे आज पहिल्या बॉलवर त्याने संजू सॅमसन याला आऊट केले. या ओव्हरमध्ये त्याने संजू आणि अभिषेक शर्मा यांना माघारी पाठवले. IND W vs AUS W: टीम इंडिया टी-20 वर्ल्डकपमधून बाहेर, ऑस्ट्रेलियाने बाजी मारली, भारतीय क्रिकेटप्रेमींचं स्वप्न भंगलं दोघांनाही त्याने शून्यावर माघारी पाठवल्याने भारताला मोठ्या भागीदारीची गरज होती. मात्र सर्व उलटं झालं, श्रेयस अय्यर १० धावा, ईशान किशन १२ धावा, अक्षर पटेल १४ धावा, शिवम दुबे २० धावा आणि सूर्यांश शेडगे १ धाव करून माघारी परतले. शेवटला हर्षित राणा याने आपली ताकद लावली आणि १० चेंडूत २१ धावा करत सामना खेचण्याचा प्रयत्न केला होता मात्र तो संघाला विजय मिळवू देऊ शकला नाही. आयर्लंड संघाने झकास फील्डिंग करत संपूर्ण सामन्यात भारतावर दबाव निर्माण केला होता. IND vs IRE : नाद केला पण वाया नाही गेला! डेब्यू करणाऱ्या प्रिन्स यादव याने बुमराहला मागे टाकत रचला इतिहास आयर्लंड संघाच्या जय मुंद्रा आणि मॅथ्यू हॉलार्ड यांनी तीन विकेट घेतल्या. या मालिकेमध्ये भारतीय संघाची फलंदाजी ढेपाळल्याचं पाहायला मिळालं. आता आगामी इंग्लंडविरूद्धच्या मालिकेत भारतीय संघ कशी कामगिरी करतो हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
भारतीय संघ (प्लेइंग 11): अभिषेक शर्मा, संजू सॅमसन (WK), इशान किशन, श्रेयस अय्यर (C), तिलक वर्मा, शिवम दुबे, सूर्यांश शेडगे, अक्षर पटेल, हर्षित राणा, अर्शदीप सिंग, प्रिन्स यादव
आयर्लंड (प्लेइंग 11): टिम टेक्टर, रॉस अडायर, हॅरी टेक्टर, लॉर्कन टकर (C/WK), बेंजामिन कॅलिट्झ, गॅरेथ डेलानी, जॉर्ज डॉकरेल, लियाम मॅककार्थी, मॅथ्यू हम्फरीज, जय मुंद्रा, मॅथ्यू हॉलार्ड
लेखकाबद्दलहरिश मालुसरे हरिश मालुसरे, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये एक्झिक्युटिव्ह कंटेंट प्रॉड्युसर म्हणून कार्यरत आहेत. ते २०२४ पासून मटा ऑनलाइनसोबत जोडले गेले आहेत. गेली सात वर्षे ते विविध मीडिया समूहांमध्ये काम करत आहेत. त्यांना स्पोर्ट्स, क्राइम आणि राजकीय बातम्यांमध्ये विशेष रुची आहे.
पत्रकारितेमधील अनुभव
पुण्यात पत्रकारितेचे शिक्षण घेत असताना झी २४ तास आणि सकाळ या माध्यम समूहांमध्ये इंटर्नशीप केली होती. त्यानंतर मास मीडियाच्या शेवटच्या वर्षाला असताना ‘थोडक्यात’ या वेब पोर्टलमध्ये इंटर्न म्हणून काम केले आहे. त्यानंतर थोडक्यात मध्येच नोकरीची संधी मिळाली, तिथेच काही दिवसांनी शिफ्ट इंचार्ज म्हणून जबाबादारी सांभाळली. यादरम्यान लोकसभा आणि विधानसभा २०१९ निवडणुकांचे टेक्स्ट बातम्यांमधून वार्तांकन केले. मराठी चित्रपटसृष्टीतील ‘श्रीराम समर्थ’ या चित्रपटातील संत रामदासांची भूमिका साकारणारे मराठी अभिनेते शंतून मोघे यांची छोटेखानी मुलाखत घेतली. (लिंक : https://youtu.be/-wsyyekJ-DE?si=SaJ_OC9nUgLFmKXK)
‘थोडक्यात’ नंतर सकाळ डीजिटलमध्ये सोशल मीडिया एक्सेक्युटिव्ह म्हणून काम पाहिले आहे, त्यावेळी टी-२० वर्ल्ड कपचे लाईव्ह करत क्रीडाप्रेमींना माहिती दिली. त्यानंतर ‘पोलीसनामा’मध्ये काम करत असताना सीडीआर वाचून समजून घेत अनेक स्टोरी साध्या आणि सोप्या शब्दात बातमी लेखन केले. यादरम्यान कॉलेज पूर्ण झाल्यावर झी २४ तासमध्ये संधी मिळाली, मुंबईत झी २४ तासमध्ये महाराष्ट्र केसरी कु्स्ती स्पर्धेवर विशेष स्टोरी केल्या आहेत. टीव्ही९ मराठीमध्ये Sub-Editor, Social Media Executive म्हणून काम पाहिले आहे. त्यानंतर २०२४ मध्ये महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये जॉइन झाले.
महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये महाराष्ट्र, क्राइम आणि स्पोर्ट्स या तिन्ही सेक्शनमध्ये ट्रेंडनुसार बातमी लेखन करतात. आता पार पडलेल्या विधानसभा निवडणूक आणि निकालांचे कव्हरेज बातम्यांच्या माध्यमातून केले. महापालिका निवडणुकांमध्ये मुंबई, पुणे आणि पिंपरी चिंचवड आणि कोल्हापूर या महत्त्वाच्या जिल्ह्यांचे स्थानिक पातळीवर भागानुसार सविस्तर वार्तांकन केले आहे. महापालिका निवडणुकीमध्ये सायली वांजळे यांची मुलाखत घेतली होती. लिंक: https://youtu.be/Wejw-eMnXqI?si=jyeD36tRboIc9bpJ. त्यासोबतच आता टी-२० वर्ल्ड कप २०२६ चे कव्हरेज पाहत आहेत.
शैक्षणिक पात्रता
हरीश मालुसरे यांचे पदवीपर्यंतचे शिक्षण पुणे जिल्ह्यातील नामांकित आबासाहेब गरवारे महाविद्यालयातून झाले आहे. तिथूनच 2022 साली एम. ए. जर्नलिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण पूर्ण केले. त्यांचे मराठी हिंदी आणि इंग्रजी भाषेवर प्रभुत्व असून डिजिटल पत्रकारितेतील सातहून अधिक वर्षांचा अनुभव आहे.… आणखी वाचा