Headlines

भारत वि. श्रीलंका पहिला कसोटी सामना उद्या किती वाजता, कुठे पाहता येणार? जाणून घ्या


IND vs SL 1st Test News : भारत आणि श्रीलंकेमधील पहिला कसोटी सामना उद्या सुरू होणार आहे.हा सामना किती वाजता सुरू होणार आणि कुठे पाहायला मिळणार जाणून घ्या.

IND vs SL 1st Tets Live Streaming
IND vs SL 1st Tets Live Streaming(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
मुंबई : भारत आणि श्रीलंका यांच्यातील मालिकेतील पहिली क्रिकेट कसोटी गॉल आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर होणार आहे. या मैदानावरील खेळपट्टी फिरकीला अनुकूल असल्याचा इतिहास आहे. असे असतानाही श्रीलंकेने आपल्या संघात चार वेगवान गोलंदाजांना स्थान दिले आहे. मात्र, भारतीय संघाने फिरकी गोलंदाजांवरच विश्वास दाखविण्याचे संकेत दिले आहेत. पहिल्या कसोटीत भारतीय संघ तीन डावखुऱ्या फिरकी गोलंदाजांसह उतरण्याची शक्यता असल्याचे स्पष्ट संकेत भारताचे गोलंदाजी प्रशिक्षक मॉर्ने मॉर्केल यांनी गुरुवारी दिले. शनिवारी, १५ ऑगस्टपासून सुरू होत आहे.

भारत आणि श्रीलंका यांच्यातील दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिला कसोटी सामना सकाळी १० वाजता सुरू होणार आहे. त्याआधी ९.३० वाजता टॉस होईल. ९० ओव्हर्समुळे सामना संध्याकाळी पाच किंवा साडे पाचपर्यंत चालू शकतो. या सामन्याचे थेट प्रक्षेपण सोनीलिव्ह या अॅप आणि टीव्हीवर पाहायला मिळेल.

Maharashtra TimesRohit Sharma : रोहित शर्माचा शो अन् निवृत्तीचे संकेत, वर्ल्ड कप 2027 खेळणार की नाही? जाणून घ्या?
कुलदीप यादव, मानव सुतार आणि रवींद्र जाडेजा हे भारतीय संघातील तीन डावखुरे फिरकी गोलंदाज आहेत. त्यांच्या साथीला सारांश जैनचीही निवड झाली आहे. माऱ्यात वैविध्य आणण्यासाठी सारांशला संधी मिळू शकते, असा अंदाज होता. मात्र, पहिल्या कसोटीसाठी अंतिम संघात तीनही फिरकी गोलंदाज डावखुरे असण्याची शक्यता आहे. ‘कुलदीप आक्रमक गोलंदाज आहे. त्याचा अनुभव आणि दर्जा दुर्लक्षित करण्यासारखा नाही. हे तिघेही कुलदीप, सुतार आणि जाडेजा संघासाठी मोलाचे आहेत. त्यांच्या गोलंदाजीत कमालीचे वैविध्य आहे,’ असे मॉर्केल यांनी सांगितले.

Maharashtra TimesRohit Sharma : रोहित शर्माचा शो अन् निवृत्तीचे संकेत, वर्ल्ड कप 2027 खेळणार की नाही? जाणून घ्या?कुलदीप मनगटाच्या साहाय्याने चेंडूला फिरकी देतो. जाडेजाची अचूकता फलंदाजांनाही अडचणीत आणू शकते, तर सुतार चेंडूला उंची देत फलंदाजांना गोंधळात टाकतो. ‘सुतार चेंडू जास्त वळवू शकतो, तर जाडेजाच्या माऱ्यात अचूकता आहे. एक गोलंदाज जास्त टर्न मिळवतो, तर दुसरा अधिक अचूक मारा करतो. तीनही फिरकी गोलंदाज डावखुरे असणे ही चिंता करण्यासारखी बाब नाही. गिल त्यांचा कसा योग्य प्रकारे वापर करून घेतो, हे महत्त्वाचे ठरेल. या तिघांमध्ये कसोटी विजयासाठी आवश्यक असलेल्या वीस विकेट घेण्याची क्षमता आहे,’ असे सांगत मॉर्केल यांनी भूमिका स्पष्ट केली.

Maharashtra TimesHarbhajan Singh : ‘आंतरराष्ट्रीय क्रिकेट मालिका इतिहासजमा होणार, एक गोष्ट ठरेल कारणीभूत’; हरभजन सिंग असं का म्हणाला?

खेळपट्टी फिरकीला अनुकूल

श्रीलंकेने या कसोटीसाठी वेगवान गोलंदाजांची निवड केल्यामुळे खेळपट्टीचे नेमके स्वरूप काय असेल, हे सांगणे अवघड आहे. ‘येथील कसोटींचा इतिहास पाहिला, तर संघात तीन फिरकी गोलंदाज असणे योग्य ठरेल. त्याचबरोबर फिरकी मारा अधिक आक्रमक असणेही आवश्यक आहे. मात्र, यंदाची खेळपट्टी काहीशी वेगळी भासत आहे. या कसोटीत प्रत्येक सत्रागणिक खेळपट्टीचे स्वरूप बदलत जाईल.

हरिश मालुसरे

लेखकाबद्दलहरिश मालुसरे हरिश मालुसरे, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये एक्झिक्युटिव्ह कंटेंट प्रॉड्युसर म्हणून कार्यरत आहेत. ते २०२४ पासून मटा ऑनलाइनसोबत जोडले गेले आहेत. गेली सात वर्षे ते विविध मीडिया समूहांमध्ये काम करत आहेत. त्यांना स्पोर्ट्स, क्राइम आणि राजकीय बातम्यांमध्ये विशेष रुची आहे.

पत्रकारितेमधील अनुभव
पुण्यात पत्रकारितेचे शिक्षण घेत असताना झी २४ तास आणि सकाळ या माध्यम समूहांमध्ये इंटर्नशीप केली होती. त्यानंतर मास मीडियाच्या शेवटच्या वर्षाला असताना ‘थोडक्यात’ या वेब पोर्टलमध्ये इंटर्न म्हणून काम केले आहे. त्यानंतर थोडक्यात मध्येच नोकरीची संधी मिळाली, तिथेच काही दिवसांनी शिफ्ट इंचार्ज म्हणून जबाबादारी सांभाळली. यादरम्यान लोकसभा आणि विधानसभा २०१९ निवडणुकांचे टेक्स्ट बातम्यांमधून वार्तांकन केले. मराठी चित्रपटसृष्टीतील ‘श्रीराम समर्थ’ या चित्रपटातील संत रामदासांची भूमिका साकारणारे मराठी अभिनेते शंतून मोघे यांची छोटेखानी मुलाखत घेतली. (लिंक : https://youtu.be/-wsyyekJ-DE?si=SaJ_OC9nUgLFmKXK)

‘थोडक्यात’ नंतर सकाळ डीजिटलमध्ये सोशल मीडिया एक्सेक्युटिव्ह म्हणून काम पाहिले आहे, त्यावेळी टी-२० वर्ल्ड कपचे लाईव्ह करत क्रीडाप्रेमींना माहिती दिली. त्यानंतर ‘पोलीसनामा’मध्ये काम करत असताना सीडीआर वाचून समजून घेत अनेक स्टोरी साध्या आणि सोप्या शब्दात बातमी लेखन केले. यादरम्यान कॉलेज पूर्ण झाल्यावर झी २४ तासमध्ये संधी मिळाली, मुंबईत झी २४ तासमध्ये महाराष्ट्र केसरी कु्स्ती स्पर्धेवर विशेष स्टोरी केल्या आहेत. टीव्ही९ मराठीमध्ये Sub-Editor, Social Media Executive म्हणून काम पाहिले आहे. त्यानंतर २०२४ मध्ये महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये जॉइन झाले.

महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये महाराष्ट्र, क्राइम आणि स्पोर्ट्स या तिन्ही सेक्शनमध्ये ट्रेंडनुसार बातमी लेखन करतात. आता पार पडलेल्या विधानसभा निवडणूक आणि निकालांचे कव्हरेज बातम्यांच्या माध्यमातून केले. महापालिका निवडणुकांमध्ये मुंबई, पुणे आणि पिंपरी चिंचवड आणि कोल्हापूर या महत्त्वाच्या जिल्ह्यांचे स्थानिक पातळीवर भागानुसार सविस्तर वार्तांकन केले आहे. महापालिका निवडणुकीमध्ये सायली वांजळे यांची मुलाखत घेतली होती. लिंक: https://youtu.be/Wejw-eMnXqI?si=jyeD36tRboIc9bpJ. त्यासोबतच आता टी-२० वर्ल्ड कप २०२६ चे कव्हरेज पाहत आहेत.

शैक्षणिक पात्रता
हरीश मालुसरे यांचे पदवीपर्यंतचे शिक्षण पुणे जिल्ह्यातील नामांकित आबासाहेब गरवारे महाविद्यालयातून झाले आहे. तिथूनच 2022 साली एम. ए. जर्नलिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण पूर्ण केले. त्यांचे मराठी हिंदी आणि इंग्रजी भाषेवर प्रभुत्व असून डिजिटल पत्रकारितेतील सातहून अधिक वर्षांचा अनुभव आहे.आणखी वाचा