Mumbai IT Professional faced Tax Demand Notice: आपल्या दरमहिना पगारातून टीडीएस कापला गेला की, कर सरकारकडे योग्यरित्या भरला जातो, असा बहुतेक पगारदार कर्मचाऱ्यांचासमज असतो. मात्र, नियोक्त्याने कर कापला पण, आयकर विभागाकडे जमा केला नाही, तर समस्या उद्भवू शकतात. कंपनी आपल्या पगारातून कापलेला टीडीएस आयकर विभागाकडे जमा करत आहे की नाही? याची खात्री करणे प्रत्येक कर्मचाऱ्याची जबाबदार असते.

IT व्यावसायिकाला टॅक्सची नोटीस
2019-20 या मूल्यांकन वर्षासाठी सोफीयाने 18.4 लाखांचे वार्षिक उत्पन्न दाखवले आणि 3.91 लाख रुपये टीडीएस क्रेडिटचा दावा केला होता, पण तिला केवळ 79,030 परतावा मिळाला आणि 3.36 लाख रुपयांची tax demand नोटीस मिळाली, असं कसं झालं? यामागचे कारण काय? तर, सोफियाच्या नियोक्त्याने – जी एक आयटी सेवा देणारी कंपनी होती – पगारातून कापलेला टीडीएस सरकारकडे जमा केला नव्हता.
Stock Market: आशियाई बाजारात विक्रीचं तुफान! भारत पुन्हा टॉप 5 मध्ये; तैवान, कोरियन मार्केट कोसळले; नेमका विषय काय?
सोफियाने वेळोवेळी CPC कडे त्रुटी सुधारण्याची विनंती केली, पण पदरी निराशा आली. अखेरीस सोफियाने लढा देण्याचा निर्णय घेतला आणि first appeal दाखल केले, पण मुदत संपल्याच्या कारणास्तव फेटाळले गेले. या निर्णयामुळे निराश होऊन सोफीयाने आयकर अपील न्यायाधिकरण- ITAT – कडे धाव घेतली, ज्याने या व्यावसायिकाच्या बाजूने निकाल दिला.
TDS कपात झाली, पण करदात्याला टॅक्स क्रेडिट नाकारले
करदात्याच्या नियोक्त्याने TDS कपात केला असला तरी महसूल विभागाकडे जमा केला नाही ज्यामुळे करदात्याला TDS पूर्ण क्रेडिट मिळाले नाही, असे ITAT मुंबईने सांगितले. यामुळे करदात्याच्या फॉर्म 26AS मध्ये टीडीएसचे पूर्ण क्रेडिट दिसून आले नाही आणि परिणामी 3.91 लाखांच्या TDS क्रेडिटचा दावा फेटाळला गेला.
US Iran Tension: होर्मुझची सामुद्रधुनी पेटली, इराण-अमेरिका पुन्हा भिडले; तेलाच्या किमतीत अचानक खळबळ, आता पुन्हा महागाईची भडका!
पण आपल्या दाव्याचे समर्थन करताना सोफीयाने नियोक्त्याने खरंच टीडीएस कापल्याचे सिद्ध करण्यासाठी सॅलरी स्लिप, फॉर्म 16, बँक स्टेटमेंट आणि इतर कागदपत्रे सादर केली.
सोफियाने सादर केलेल्या पुराव्यांची दखल घेऊन आणि सर्वोच्च न्यायालय व उच्च न्यायालयाच्या अलीकडील निकालांचा संदर्भ देत न्यायाधिकरणाने आपल्या निकालात म्हटले आहे की, नियोक्त्याने करदात्याच्या पगारातून TDS कपात केली असेल पण रक्कम सरकारकडे जमा केली नाही तर, त्या कर्मचाऱ्याकडे कराची मागणी केली जाऊ शकत नाही. अशाप्रकारे, Assessing Officer ने सोफीयाचा 3.91 लाखांचा टीडीएस दावा पडताळला आणि पूर्ण क्रेडिट मंजूर केल्यानंतर 3.36 लाख रुपयांची कर मागणीची नोटीस रद्द केली जाईल. अशी परिस्थिती टाळण्यासाठी करदात्यांना कोणती पावले उचलली पाहिजे जेणेकरून अडचण होणार नाही पाहूया.
तुमच्या बाबतीत असे घडू नये म्हणून तुमचा आयकर परतावा दाखल करण्यापूर्वी खालील स्टेप्स उचलला
- फॉर्म 16 आणि फॉर्म 26AS, एआयएस व बँक स्टेटमेंटशी जुळवून पाहा.
- TDS मधील छोटीशीही तफावत आढळल्यास नियोक्त्याला तात्काळ कळवा.
- फॉर्म 16, सॅलरी स्लिप आणि बँक स्टेटमेंट जपून ठेवा.

