Headlines

Income Tax Notice; पगारातून TDS कापला पण भरला नाही, आयकर विभागाने दिली 3.36 लाखांची नोटीस; मुंबईतील IT प्रोफेशनलसोबत काय घडलं?


Mumbai IT Professional faced Tax Demand Notice: आपल्या दरमहिना पगारातून टीडीएस कापला गेला की, कर सरकारकडे योग्यरित्या भरला जातो, असा बहुतेक पगारदार कर्मचाऱ्यांचासमज असतो. मात्र, नियोक्त्याने कर कापला पण, आयकर विभागाकडे जमा केला नाही, तर समस्या उद्भवू शकतात. कंपनी आपल्या पगारातून कापलेला टीडीएस आयकर विभागाकडे जमा करत आहे की नाही? याची खात्री करणे प्रत्येक कर्मचाऱ्याची जबाबदार असते.

Mumbai IT Professional Denied TDS Credit ITAT Gives Justice
(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
Income Tax Notice: तुमच्या नियोक्ता म्हणजे employer ने तुमच्या पगारातून कर कापला, पण सरकारकडे जमा केला नसेल, तर काय होतं? अशा परिस्थितीत तुम्हाला संपूर्ण टीडीएस क्रेडिट मिळेल का?मुंबईतील IT क्षेत्रातील व्यावसायिक सोफिया रिक यांच्या बाबत असंच काहीसं घडलं. सोफियाने आपल्या ITR मध्ये 3.91 लाखांचा टीडीएस क्रेडिटचा दावा केला, पण त्याऐवजी 3.36 लाख रुपयांची कर भरण्याची मागणीची नोटीस मिळाली.

IT व्यावसायिकाला टॅक्सची नोटीस

2019-20 या मूल्यांकन वर्षासाठी सोफीयाने 18.4 लाखांचे वार्षिक उत्पन्न दाखवले आणि 3.91 लाख रुपये टीडीएस क्रेडिटचा दावा केला होता, पण तिला केवळ 79,030 परतावा मिळाला आणि 3.36 लाख रुपयांची tax demand नोटीस मिळाली, असं कसं झालं? यामागचे कारण काय? तर, सोफियाच्या नियोक्त्याने – जी एक आयटी सेवा देणारी कंपनी होती – पगारातून कापलेला टीडीएस सरकारकडे जमा केला नव्हता.
Maharashtra TimesStock Market: आशियाई बाजारात विक्रीचं तुफान! भारत पुन्हा टॉप 5 मध्ये; तैवान, कोरियन मार्केट कोसळले; नेमका विषय काय?
सोफियाने वेळोवेळी CPC कडे त्रुटी सुधारण्याची विनंती केली, पण पदरी निराशा आली. अखेरीस सोफियाने लढा देण्याचा निर्णय घेतला आणि first appeal दाखल केले, पण मुदत संपल्याच्या कारणास्तव फेटाळले गेले. या निर्णयामुळे निराश होऊन सोफीयाने आयकर अपील न्यायाधिकरण- ITAT – कडे धाव घेतली, ज्याने या व्यावसायिकाच्या बाजूने निकाल दिला.

TDS कपात झाली, पण करदात्याला टॅक्स क्रेडिट नाकारले
करदात्याच्या नियोक्त्याने TDS कपात केला असला तरी महसूल विभागाकडे जमा केला नाही ज्यामुळे करदात्याला TDS पूर्ण क्रेडिट मिळाले नाही, असे ITAT मुंबईने सांगितले. यामुळे करदात्याच्या फॉर्म 26AS मध्ये टीडीएसचे पूर्ण क्रेडिट दिसून आले नाही आणि परिणामी 3.91 लाखांच्या TDS क्रेडिटचा दावा फेटाळला गेला.
Maharashtra TimesUS Iran Tension: होर्मुझची सामुद्रधुनी पेटली, इराण-अमेरिका पुन्हा भिडले; तेलाच्या किमतीत अचानक खळबळ, आता पुन्हा महागाईची भडका!
पण आपल्या दाव्याचे समर्थन करताना सोफीयाने नियोक्त्याने खरंच टीडीएस कापल्याचे सिद्ध करण्यासाठी सॅलरी स्लिप, फॉर्म 16, बँक स्टेटमेंट आणि इतर कागदपत्रे सादर केली.

सोफियाने सादर केलेल्या पुराव्यांची दखल घेऊन आणि सर्वोच्च न्यायालय व उच्च न्यायालयाच्या अलीकडील निकालांचा संदर्भ देत न्यायाधिकरणाने आपल्या निकालात म्हटले आहे की, नियोक्त्याने करदात्याच्या पगारातून TDS कपात केली असेल पण रक्कम सरकारकडे जमा केली नाही तर, त्या कर्मचाऱ्याकडे कराची मागणी केली जाऊ शकत नाही. अशाप्रकारे, Assessing Officer ने सोफीयाचा 3.91 लाखांचा टीडीएस दावा पडताळला आणि पूर्ण क्रेडिट मंजूर केल्यानंतर 3.36 लाख रुपयांची कर मागणीची नोटीस रद्द केली जाईल. अशी परिस्थिती टाळण्यासाठी करदात्यांना कोणती पावले उचलली पाहिजे जेणेकरून अडचण होणार नाही पाहूया.

तुमच्या बाबतीत असे घडू नये म्हणून तुमचा आयकर परतावा दाखल करण्यापूर्वी खालील स्टेप्स उचलला

  • फॉर्म 16 आणि फॉर्म 26AS, एआयएस व बँक स्टेटमेंटशी जुळवून पाहा.
  • TDS मधील छोटीशीही तफावत आढळल्यास नियोक्त्याला तात्काळ कळवा.
  • फॉर्म 16, सॅलरी स्लिप आणि बँक स्टेटमेंट जपून ठेवा.
प्रियांका वर्तक

लेखकाबद्दलप्रियांका वर्तकप्रियांका वसंत वर्तक या 2023 पासून महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये डिजिटल कन्टेन्ट प्रोड्युसर पदावर काम करत आहेत. 2015 पासून डिजिटल मीडियामध्ये विविध वेबपोर्टलसाठी काम केले असून क्रीडा आणि बिझनेस यासारख्या विषयांवरील बातम्यांचं लेखन आणि कव्हरेज करायचा दहा वर्षाचा अनुभव आहे.

मुंबई विद्यापीठातून बीएमएम आणि मग मास्टर्सच शिक्षण घेतल्यावर त्यांनी एनडीटीव्हीमध्ये या अग्रगण्य वृत्तवाहिनीमध्ये इंटर्नशीप केली. मग एनबीटी या वृत्तपत्रात शिक्षण आणि मनोरंजन डेस्कवर काम केले. इथे काम करताना त्यांनी शिक्षण व मनोरंजनाशी संबंधित मुलाखती घेतल्या. त्यानंतर 2016 मध्ये फ्री प्रेस जर्नल या इंग्रजी वृत्तपत्रातील ऑनलाईन डिपार्टमेंटमध्ये तीन वर्ष केले जिथे त्यांनी मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील घडामोडींचे कव्हरेज सुरु करून तीन वर्षाचा अनुभव घेतला.

पत्रकारिता क्षेत्रात 15 वर्षांचा अनुभव
2019 मध्ये लेट्सली या मराठी वेबसाईटसाठी क्रीडा क्षेत्रात न्यूज रायटर म्हणून काम केले. मे 2023 मध्ये महाराष्ट्र टाइम्समध्ये सर्वप्रथम कन्सल्टंट म्हणून तीन महिन्यांचा अनुभव घेतला. या दरम्यान बिझनेस आणि क्रीडा क्षेत्रातील घडामोडी जसे की आयपीएल आणि वेगवेगळ्या क्रीडा मालिका तसेच बिझनेसमध्ये वेतन आयोगासह आंतरराष्ट्रीय घडामोडी कव्हर केल्या.

2023 मध्ये फुल-टाइम्स बिझनेस कव्हरेज सुरु केले. व्यापार कार्यक्षेत्रातील बातमी आणि विश्लेषण लेखांना प्राधान्य दिलं. आंतराष्ट्रीय तसेच राष्ट्रीय शेअर मार्केट, रिअल इस्टेट आणि व्यापार उद्योगाशी संबंधित घडामोडी आदी विषयांवर लेख मालिका लिहिले. केंद्रीय अर्थसंकल्प, अमेरिकेसोबत ट्रेड डील आणि त्यांचा जनसामान्यांसोबत भारतीय अर्थव्यवस्थेवर होणार परिणाम यांचे विश्लेषण केले.

शैक्षणिक पात्रता
​प्रियांका वर्तक यांनी 2014 मध्ये विद्याविहार येथील एस.के. सोमैया महाविद्यालयातून मीडिया व जर्नालिसममधून पदवी आणि पदव्युत्तर शिक्षण घेतले. महाविद्यालयीन काळात बॅडमिंटन आणि क्रिकेट यासारख्या खेळात भाग घेऊन पारितोषिके जिंकली. खेळ, चित्रपट, संगीत, पर्यटन यामध्ये प्रियांका यांना रुची आहे.आणखी वाचा