Headlines

Tragic death of mother and child in hingoli bodies found in pond; जिने जन्म दिला तिच्यासोबतच 5 व्या वर्षीच करुण अंत; आई अन् मुलासोबत काय घडलं? धक्कादायक घटनेनं खळबळ


Hingoli Crime: हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी तालुक्यात धक्कादायक घटना घडली आहे. चार दिवसांपासून बेपत्ता असलेल्या आई आणि मुलाचे मृतदेह गावाजवळील तलावात आढळून आले असून या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. त्यांच्या मृत्यूचे नेमकं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही.

hingoli crime
आई मुलासह घराबाहेर पडली, पण माघारी येईना; कुटुंबाने शोध घेतला अन् 4 दिवसांनंतर सगळ्यांना बसला धक्का(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
हिंगोली: हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी तालुक्यातील खरवड शिवारात एक धक्कादायक घटना घडली आहे. चार दिवसांपासून बेपत्ता असलेल्या आई व मुलाचे मृतदेह गावाजवळील तलावात आढळून आले आहेत. ज्योती सागर सावळे असं 30 वर्षीय मृत महिलेचं नाव असून राजवीर सागर सावळे असं 5 वर्षीय मुलाचं नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, 6 नोव्हेंबर रोजी सकाळी गावकऱ्यांना तलावात आई आणि मुलाचा मृतदेह तरंगताना दिसला. त्यानंतर याप्रकरणाची माहिती पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेऊन मृतदेह बाहेर काढले असून शवविच्छेदनासाठी पाठवले आहेत. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली असून मृत्यूचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

नेमकं काय घडलं?

विवाहित असलेल्या ज्योती सावळे काही दिवसांपूर्वीच आपल्या मुलासह खरवड येथे माहेरी आल्या होत्या. चार दिवसांपूर्वी त्या मुलासोबत घराबाहेर पडल्या होत्या, पण परत आल्या नाहीत. नातेवाईकांनी त्यांचा शोध घेतला, पण काहीच पत्ता लागला नाही. अखेर 6 नोव्हेंबर रोजी सकाळी गावकऱ्यांना तलावात दोन मृतदेह दिसले. त्यांनी तात्काळ कळमनुरी पोलिसांना माहिती दिली. पोलीस निरीक्षक प्रेमप्रकाश माकोडे यांच्या नेतृत्वाखाली पथक घटनास्थळी पोहोचले. गावकऱ्यांच्या मदतीने पोलिसांनी दोन्ही मृतदेह बाहेर काढले असून तपासणीत ते ज्योती आणि राजवीर असल्याचे निष्पन्न झालं आहे.

दरम्यान, या दुर्दैवी घटनेमुळे संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे. आई व मुलाच्या मृत्यूचे कारण अद्याप गूढ असून घटनेनं हळहळ व्यक्त केलं जात आहे. पोलीस या प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत.

अक्षय शितोळे

लेखकाबद्दलअक्षय शितोळेअक्षय शितोळे हे २०१८ पासून डिजिटल मीडियात कार्यरत असून सध्या मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. राज्यभरातील रिपोर्टर्ससोबत समन्वय साधत महाराष्ट्रातील गावगाड्यापासून मोठ्या शहरांमधील दैनंदिन घडामोडी मटा ऑनलाइनसाठी वेगवान आणि अचूक पद्धतीने मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. राजकीय बातम्यांमध्ये विशेष रस, बातम्यांमागची बातमी अर्थात घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेण्याचा सातत्याने प्रयत्न असतो. शेती आणि ग्रामीण जीवन हे जिव्हाळ्याचे विषय आहेत.

पत्रकारितेतील अनुभव
अक्षय शितोळे यांनी २०१८ मध्ये आपल्या पत्रकारितेतील प्रवासाचा प्रारंभ केला. सुरुवातीला न्यूज १८ लोकमत या वेबसाईटसाठी काम करताना ट्रेनी, सब एडिटर असा त्यांचा प्रवास राहिला. या कार्यकाळात प्रामुख्याने राजकीय बातम्यांसह स्थानिक पातळीवरील विविध घडामोडी कव्हर करण्याचे काम त्यांनी केले. २०१९ च्या विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीदरम्यान त्यांनी विविध राजकीय घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेतला. पुढे २०२१ मटा ऑनलाइनमध्ये डिजिटल कंटेट प्रोड्युसर म्हणून जॉइन झाले. यावेळी राजकीय बातम्यांसह विविध जिल्ह्यांतील प्रतिनिधींशी समन्वय ठेवत वेबसाईटसाठी वेगवान आणि अचूक बातम्या मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न राहिला. तसंच मटा ऑनलाइनला २५ वर्षे पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांनी महाराष्ट्राच्या दोन दशकांच्या सामाजिक वाटचालीचा आढावा घेणारा विशेष लेख लिहिला होता. “आरक्षणाचे लढे आणि तिढे, टोकदार जातीय अस्मिता ; २५ वर्षांत कसं ढवळून निघालं महाराष्ट्राचं समाजमन?” शीर्षकाखाली लिहिलेल्या या लेखाच्या माध्यमातून महाराष्ट्रात मागील २५ वर्षांत जी सामाजिक स्थित्यंतरे झाली, ज्या घटनांनी महाराष्ट्राच्या सामाजिक रचनेवर परिणाम केला, अशा घडामोडींचा सविस्तर आढावा घेतला होता. २०२३ मध्ये त्यांनी लोकमत ऑनलाइनसोबतही काम केले असून ते २०२५ पासून पुन्हा मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिलट कंटेंट प्रोड्युसर म्हणून रुजू झाले. विविध जिल्ह्यांतील रिपोर्टर्ससोबत संवाद साधत स्थानिक घडामोडींसह राज्यभरात महत्त्वाच्या बातम्या कव्हर करण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. तसंच विश्लेषणात्मक व्हिडिओच्या माध्यमातून राजकीय घटनांचे अन्वयार्थ प्रेक्षकांसमोर उलगडण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. महाराष्ट्रात २०२५-२६ साली झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीदरम्यान त्यांनी विविध विश्लेषणात्मक व्हिडिओंच्या माध्यमातून राजकीय घडामोडींचं सोप्या शब्दांत विश्लेषण केले. तसंच महानगरपालिका निवडणूक निकालानंतर राजकीय विश्लेषकांची मुलाखत घेत या निवडणूक निकालाचा वेध घेण्याचा प्रयत्न केला.

मुलाखतीची लिंक: Uddhav Thackeray यांचा BMC मध्ये का झाला पराभव? सविस्तर विश्लेषण – https://youtu.be/8UeV9w1vwxQ?si=2sMWoovyx07EpjVU

शैक्षणिक पात्रता
अक्षय शितोळे यांनी १२ वी पर्यंतचे शिक्षण आपल्या मूळ गावी घेतले असून नंतर त्यांनी मुंबई येथील नामांकित असलेल्या रुईया महाविद्यालयातून पत्रकारितेतील पदवी (Bachelor of mass media) चे शिक्षण पूर्ण केले.आणखी वाचा