Headlines

dharmaraobaba atram sensational allegation that bjp gave his nephew rs 5 crore to contest against me; भाजपने पुतण्याला ५ कोटी देऊन माझ्याविरोधात उभं केलं; धर्मरावबाबा आत्रामांचा खळबळजनक आरोप


Dharamrao Baba Atram: भाजपने पुतण्याला ५ कोटी देऊन माझ्याविरोधात उभे केले, असा गंभीर आरोप धर्मरावबाबा आत्रामांनी केला आहे.

atram fadnaivs
atram fadnaivs(फोटोमहाराष्ट्र टाइम्स)
म.टा. वृत्तसेवा, गडचिरोली: विधानसभा निवडणुकीत भाजपने माझ्या विरोधात पुतण्याला ५ कोटी रुपये देऊन उभे केल्याचा खळबळजनक आरोप राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे माजी मंत्री व आमदार धर्मरावबाबा आत्राम यांनी केला आहे.

चामोर्शी येथे रविवारी जनकल्याण यात्रेच्या माध्यमातून जाहीर सभा घेण्यात आली. या सभेत आमदार आत्राम यांनी विरोधी पक्षासोबतच महायुतीतील भाजपवर टीका केली. आत्राम म्हणाले, मला विधानसभेत पराभूत करण्यासाठी भाजपने पुतणे अम्ब्रीशराव यांना डमी उमेदवार म्हणून उभे केले. पाच कोटी रुपये खर्च केले, तरी जनतेने माझ्या पाठीशी ठाम उभे राहून विजय मिळवून दिला. माझ्या मतदारसंघात युतीमध्ये कोणाला किती जागा द्यायचा हे मी ठरवणार आहे, असे सांगत आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत युतीसाठी प्रस्ताव दिला तर जिल्हा परिषदेत ५१ पैकी ३२ जागा मागणार असल्याचे त्यांनी सांगितले. असे न झाल्यास राष्ट्रवादी काँग्रेस स्वबळावर जिल्हा परिषद निवडणूक लढेल असे आत्राम यांनी स्पष्ट केले.
Maharashtra TimesSupriya Sule On BJP: आता पक्षात ओरिजिनल राहिलेच कोण? भाजपचं कॉंग्रेसीकरण झालंय, सुप्रिया सुळेंची टीका
जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या सर्व जागा लढविण्याची तयारी पक्षाची असल्याचा दावा त्यांनी केला. सभेला आमदार अमोल मिटकरी, अभिनेत्री अमृता खानविलकर, जिल्हाध्यक्ष रवींद्र वासेकर, सिनेट सदस्य तनुश्री आत्राम, महिला जिल्हाध्यक्षा डॉ. सोनल कोवे, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष डॉ. तामदेव दुधबळे उपस्थित होते.
Maharashtra Timesएकनाथ शिंदे यांच्या योजना थंड बस्त्यात? आनंदाचा शिधानंतर ‘माझी शाळा’वर लाल शेरा
भाजपला भारताचा तालिबान करायचा आहे- हर्षवर्धन सपकाळ
अफगाणिस्तानच्या परराष्ट्रमंत्र्याच्या दिल्लीतील पत्रकार परिषदेला महिला पत्रकारांना परवानगी न देण्याचा तालिवानी फतवा भारतात काढला जाणे हे अत्यंत आक्षेपार्ह असून काँग्रेस पक्ष याचा तीव्र शब्दांत निषेध करत आहे. भाजपला भारताचा तालिबान करायचा आहे’, असा आरोप काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी रविवारी मुंबईत केला. काँग्रेस सरकारने सुरू केलेला माहिती अधिकार कायदा मोदी सरकारने कमकुवत केल्याचा आरोप करत त्याविरोधात आवाज उठविण्याची गरज असल्याचेही ते म्हणाले. मुंबईतील पक्ष कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

किशोरी तेलकर

लेखकाबद्दलकिशोरी तेलकर किशोरी तेलकर

किशोरी तेलकर महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये कन्सल्टंट या पदावर कार्यरत आहेत. किशोरी या २०२२पासून मटा ऑनलाइन सोबत जोडलेल्या आहेत. राजकारण, हायपर लोकल स्टोरी, क्राईम बातम्या, महिलांविषयक समस्या, गाव खेड्यातल्या बातम्या करण्याचा त्यांचा अनुभव आहे.

पत्रकारितेतील अनुभव
किशोरी यांना वृत्तपत्र, टीव्ही आणि डिजिटल माध्यमांमधील ६ वर्षांचा अनुभव आहे. किशोरी यांनी सकाळ वृत्तपत्रातून पत्रकारितेला सुरुवात केली. सकाळ वृत्तपत्रात काम करतांना त्यांनी प्रिंट मीडियासोबतच सोशल मीडिया हॅंडलिंग, वेबसाईटचेही काम केलं आहे. सध्या चार वर्षांपासून त्या महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये कार्यरत आहेत. लेखन कौशल्याच्या जोरावर सामाजिक समस्या, शाळा- कॉलेज विद्यार्थी समस्या, आरोग्य टिप्स, महिलांविषयक प्रश्न, फॅशन, लाइफस्टाइल या विविध विषयांवर त्यांनी बातम्या केल्या आहेत.

शैक्षणिक पात्रता
किशोरी तेलकर यांनी कै. बिंदू रामराव देशमुख कला व वाणिज्य महिला महाविद्यालय, नाशिकरोड येथून एम.कॉम पदवी संपादन केली. त्यानंतर गोखले एज्युकेशन सोसायटीचे एच.पी.टी आर्ट्स अँड आर.वाय.के सायन्स कॉलेजमधून कम्युनिकेशन अँड जर्नलिझम विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. जर्नलिझमचे शिक्षण घेत असतानाच किशोरी यांनी देशदूत, दिव्यमराठी सारख्या वृत्तपत्रात इंटर्नशिप केलेली आहे. मराठी भाषेवर प्रभुत्व असून हिंदी, इंग्रजी भाषाही त्यांना अवगत आहेत.आणखी वाचा