Amit Thackeray On TET Paper Leak: ‘प्रामाणिकपणे अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांवर अन्याय होत आहे. परीक्षा पुढे ढकलल्या जातात; मात्र त्याची किंमत विद्यार्थ्यांना मोजावी लागते,’ असे ठाकरे यांनी नमूद केले.

भिवंडी येथे टीईटीचा पेपर फुटल्याची धक्कादायक घटना नुकतीच उघडकीस आली. या घटनेनंतर राज्यभरातून संताप व्यक्त केला जात असतानाच मनविसे प्रमुख आणि मनसे नेते अमित ठाकरे यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत राज्य सरकारवर ही टीका केली.
Mayank Lohar Death Case : मुंबई लोकल ट्रेन मयंक लोहार मृत्यू प्रकरण; आरोपी रोशन सुवर्णाचे नवीन कारनामे उघड, रेल्वे पोलिसांची मोठी माहिती
नीट, एमएचटी-सीईटी, तलाठी भरती, पोलिस भरती, एमपीएससी आणि आता टीईटी अशा विविध परीक्षांचा उल्लेख करत, एकही परीक्षा घोटाळ्याशिवाय पूर्ण का होत नाही, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. दहावी-बारावीत सामान्य गुण मिळालेल्या विद्यार्थ्यांना सीईटीमध्ये शंभर पर्सेंटाइल मिळाल्याच्या प्रकरणांचाही संदर्भ देत त्यांनी परीक्षा प्रक्रियेच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले.
‘हे कायदे मंत्रालयाच्या कपाटात ठेवण्यासाठी आहेत का, मुख्य सूत्रधारांवर कठोर कारवाई करावी. चौकशी समित्यांच्या घोषणा करून सरकार जबाबदारी टाळत आहे. गरीब आणि मध्यमवर्गीय कुटुंबांतील तरुण दिवस-रात्र अभ्यास करत असताना भ्रष्ट व्यवस्थेमुळे त्यांचे मानसिक खच्चीकरण होत आहे. विद्यार्थ्यांच्या भविष्याचा बाजार मांडणाऱ्यांना थेट तुरुंगात टाका,’ अशी मागणी त्यांनी केली.
Byculla Moharram : मुंबईच्या इतिहासातील सर्वांत मोठा विषप्रयोग; मोहरममध्ये उंदीर मारण्याच्या गोळ्या, भायखळ्यात 30 हजार भाविकांना संपवण्याचा कट
दादा भुसे यांच्या घरासमोर निदर्शने
मुंबई : शिक्षक पात्रता परीक्षेचा (टीईटी) पेपर फुटल्यानंतर राज्यभरात त्याचे पडसाद उमटले आहेत. याप्रकरणी रविवारी मुंबई युवक काँग्रेसच्या वतीने राज्याचे शिक्षणमंत्री दादा भुसे यांच्या घरासमोर निदर्शने करत त्यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात आली. युवक काँग्रेसच्या अध्यक्ष झीनत शबरीन यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात सहभागी झालेल्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. भिवंडी येथे टीईटी पेपरफुटीच्या घटनेनंतर संताप व्यक्त केला जात आहे. त्यानंतर आता युवक काँग्रेसने रविवारी याप्रकरणी थेट मंत्रालयासमोरील शिक्षणमंत्र्यांच्या घरासमोर आंदाेलन केले. यावेळी युवक काँग्रेसच्या अध्यक्ष झीनत शबरीन यांनी बंगल्याच्या सुरक्षा भिंतीवर ‘दादा भुसे राजीनामा द्या,’ असे पोस्टर लावले. तसेच त्याबाबत घोषणाबाजी करण्यात आली.

