![]()
उद्या संपूर्ण जग योगासाठी सज्ज असेल. भगवान शिव आणि मातापार्वती यांनी एकांतामधील चर्चेचे संपादन महर्षी पतंजली यांनी केले आणि त्यातूनच योगाची निर्मिती झाली. आज योगाची लोकप्रियता वाढली. त्याच्या परिणामावर विविध दृष्टिकोनातून विद्वान आपली मते मांडतात. माझ्या वैयक्तिक अनुभवावरून मी एवढेच सांगू शकतो की, योगामुळे आपल्या व्यक्तिमत्त्वातील दोन कमकुवत बाजू गुणांत रूपांतरित होतात. एक म्हणजे लाजाळूपणा व दुसरा म्हणजे संकोच. आजच्या जगात तुम्ही लाजाळू असाल तर नुकसान सहन करावे लागते व संकोची असल्यास संधी गमवाव्या लागतात. लाजाळूपणा एक भावनिक प्रतिक्रिया असते, तर संकोच ही एक व्यावहारिक. पण नियमित योगाभ्यास केल्यास लाजाळूपणाचे रूपांतर शिस्तीत होते व संकोची स्वभावामुळे माणूस मर्यादांचे भान राखणारा बनतो. हे दोन्ही गुण योगाच्या माध्यमातून सहज प्राप्त होऊ शकतात. योग आज लोकप्रिय झाला . परंतु तो जीवनातील आवश्यक घटक बनणे अजून बाकी आहे.
Source link
पं. विजयशंकर मेहता यांचा कॉलम:योग लोकप्रिय झाला, पण जीवनावश्यक होणे बाकी
