ऑपरेशन तुतारी? शरद पवारांचे आमदार फुटणार? उत्तम जानकर यांचं महत्त्वाचं विधान – uttam jankar makes big statement on possible split in sharad pawars faction
ऑपरेशन तुतारी? शरद पवारांचे आमदार फुटणार? उत्तम जानकर यांचं महत्त्वाचं विधान – uttam jankar makes big statement on possible split in sharad pawars faction
ऑपरेशन टायगरनंतर आता शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार फुटणार अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे सहा खासदार फोडल्यानंतर आता महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा खळबळ उडेल, अशी शक्यता वर्तवण्यात येतेय. याच बातमीमुळे शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातही अस्वस्थता वाढत असल्याचे बोलले जात आहे. त्यातच सोलापूर जिल्ह्यातले राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार हे महायुतीच्या संपर्कात असल्याचा दावा करण्यात येतोय. आधीच विधान परिषद निवडणुकीत इथल्या चारपैकी ३ आमदारांनी म्हणजेच अभिजीत पाटील, उत्तम जानकर आणि नारायण पाटील हे महायुतीच्या बैठकीला जाऊन निवडणुकीत पाठिंबा देऊन आल्याने पक्षात खळबळ उडालेली. त्यामुळे पवार गटालाही धोका असल्याचं सांगण्यात येतंय. याच संदर्भात आमदार उत्तम जानकर यांनी पक्षाच्या आमदार आणि खासदारांबाबत केलेले राजकीय वक्तव्य महत्वपूर्ण मानले जात आहे.