Girish Mahajan clarification on Viral Photo with a lady on Social Media by Sushma Andhare calls it Morphed; महिलेसोबत कथित छायाचित्रं व्हायरल; गिरीश महाजन म्हणाले, फोटो पूर्णपणे मॉर्फ, आक्षेपार्ह काय आहे कळत नाही
Girish Mahajan clarification on Viral Photo with a lady on Social Media by Sushma Andhare calls it Morphed; महिलेसोबत कथित छायाचित्रं व्हायरल; गिरीश महाजन म्हणाले, फोटो पूर्णपणे मॉर्फ, आक्षेपार्ह काय आहे कळत नाही
Girish Mahajan on Viral Photo with Woman : “या फोटोत आक्षेपार्ह काय आहे, ते कळत नाही, मागचे लोक कट करून मॉर्फ केलेले ते फोटो आहेत.” असं स्पष्टीकरण जलसंपदा तथा कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन यांनी दिलं
(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
म. टा. प्रतिनिधी, जळगाव : भाजपचे संकटमोचक म्हणून ओळखले जाणारे जलसंपदा तथा कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन यांचे एका महिलेसोबतचे कथित फोटो शुक्रवारी (दि. १९) सकाळपासून सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. मंत्र्यांच्या या फोटोंमुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली असून, या प्रकरणी जळगाव सायबर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर मुंबई, नाशिकमध्येही याबाबत तक्रार करण्यात येणार आहे. सदरचे फोटो कृत्रिम बुद्धिमत्ते (एआय) च्या साहाय्याने तयार केलेले आणि मॉर्फ केलेले असल्याचा खुलासा मंत्री महाजन यांनी केला आहे.
सुषमा अंधारेंकडून फोटो रिपोस्ट
शुक्रवारी सकाळपासूनच मंत्री महाजन यांचे फोटो वेगवेगळ्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर फिरत होते. दरम्यान, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनीही याबाबत त्यांच्या अधिकृत ‘एक्स’ (ट्विटर) हँडलवर एक ट्वीट केले. अंधारे यांच्या या ट्वीटनंतर संपूर्ण राजकीय वर्तुळात आणि सोशल मीडियावर या प्रकरणाची जोरदार चर्चा सुरू झाली आणि एकच खळबळ उडाली.
मंत्री गिरीश महाजन यांचे बनावट एआय निर्मित फोटो तयार करून आणि आक्षेपार्ह मजकूर जोडून एका फेसबुक खातेदाराने सोशल मीडियावर प्रसारित केल्याप्रकरणी जळगाव सायबर पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा नोंद क्रमांक १७/२०२६ भारतीय न्याय संहिता (बीएनएस) कलम ३५६, ३(५) आणि माहिती तंत्रज्ञान कायदा (आयटी ॲक्ट A) कलम ६६ (सी), ६७ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती पोलिस अधिक्षक श्रीकांत धिवरे यांनी दिली.
Girish Mahajan On Ravikant Tupkar | मंत्री महाजन रविकांत तुपकरांच्या अन्नत्याग आंदोलनस्थळी
सदरचे फोटो व्हायरल झाल्यानंतर या संपूर्ण प्रकरणावर मंत्री गिरीश महाजन यांनी तातडीने आपली बाजू मांडली आहे. बुलढाणा येथे दौऱ्यावर असताना पत्रकारांशी बोलताना त्यांनी हे फोटो पूर्णपणे बनावट आणि मॉर्फ (छेडछाड) केलेले असल्याचे स्पष्ट केले. याविरोधात पोलिसांत अधिकृत तक्रार करणार आहे, अशी माहिती त्यांनी दिली. या फोटोत आक्षेपार्ह काय आहे ते कळत नाही. मागचे लोक कट करून मॉर्फ केलेले ते फोटो आहेत. याबाबत मुंबईतही तक्रार केली आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करावी, अशी मागणी केली आहे. त्यानंतर याबाबत सविस्तर भाष्य करणार असल्याचे महाजन यांनी स्पष्ट केले आहे.
लेखकाबद्दलअनिश बेंद्रेअनिश बेंद्रे हे महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये सहाय्यक वृत्त संपादक या पदावर कार्यरत आहेत. ते मटा ऑनलाईनमध्ये २०२२ पासून कार्यरत आहेत. टीव्ही आणि डिजिटल अशा दोन्ही माध्यमांचा एकत्रित १३ वर्षांचा अनुभव त्यांच्या गाठीशी आहे. त्यांना राजकारण, समाजकारण यासोबतच मनोरंजन, गुन्हेगारी यासारख्या विविध विषयांवरील बातम्यांचे लेखन करण्याचा अनुभव आहे.
पत्रकारितेतील अनुभव
अनिश बेंद्रे यांनी टीव्ही माध्यमातून पत्रकारितेला सुरुवात केली. एबीपी माझा वृत्तवाहिनीत सर्वप्रथम त्यांना प्रॉडक्शन आणि टिकर विभागात काम करण्याची संधी मिळाली. मराठी भाषेवरील प्रभुत्वामुळे त्यांनी लिहिलेल्या आकर्षक हेडलाईन्स सहकाऱ्यांसह प्रेक्षकांची वाहवा मिळवून गेल्या. त्यानंतर २०१५ मध्ये एबीपी माझा वृत्तवाहिनीच्याच वेब टीमसोबत त्यांनी डिजिटल विश्वात कामाचा श्रीगणेशा केला. डिजिटल माध्यमासाठी लेखन करण्याचं आव्हान पेलताना त्यांनी लक्षवेधी मथळे लिहिण्याचं कसब आत्मसात केलं. एबीपी समुहासोबत जवळपास ६ वर्षांच्या कार्यकाळात त्यांनी विविध जबाबदाऱ्या पार पाडल्या. ट्रेनी, असिस्टंट प्रोड्युसर पदापासून प्रोड्युसरपर्यंत संधी मिळवली. मराठी भाषा दिवस, आंतरराष्ट्रीय पुरुष दिन, विवाहबाह्य संबंधावरील सुप्रीम कोर्टाचा निर्णय, वर्ल्ड टीव्ही डे यासारख्या विषयांवर त्यांनी केलेल्या डॉक्युमेंट्रीही विशेष गाजल्या.
पुढे टीव्ही९ मराठी वृत्तवाहिनीच्या वेबसाईटसोबत त्यांनी चार वर्ष काम केलं. यावेळी त्यांच्यातील नेतृत्व गुणांना वाव मिळाला. मॉर्निंग शिफ्ट इन्चार्ज म्हणून काम करताना बातमी लेखनाचं तंत्र शिकवण्यासोबतच त्यांनी सहकाऱ्यांना वेळोवेळी मार्गदर्शन केले. टीमसोबत समन्वय राखणे, प्रत्येकातील गुण हेरुन त्यानुसार कामाची विभागणी करणे यामध्ये त्यांचा हातखंडा आहे. कारकिर्दीच्या १३ वर्षांपैकी दहाहून अधिक वर्ष त्यांनी डिजिटल विश्वात काम केलं आहे. या काळात लोकसभा-विधानसभा-महापालिका यासारख्या विविध निवडणुकांचा त्यांनी बारकाईने अभ्यास केला आहे.
अनिश बेंद्रे २०२२ पासून महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनसोबत काम करत आहेत. सुरुवातीपासूनच मॉर्निंग शिफ्ट इन्चार्ज म्हणून काम करताना त्यांनी सहाय्यक वृत्त संपादक पदापर्यंत उन्नती मिळवली आहे. बातम्यांच्या सखोल विश्लेषणासोबतच बातमीमागील बातमी जाणून घेण्यात त्यांना रस आहे. बातमीचे विविध पैलू जाणून घेत सोप्या भाषेत ते प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. मानसशास्त्र विषयातील अभ्यासामुळे गुन्हेगारी बातम्या उलगडून सांगण्यात त्यांना मदत होते. याशिवाय मटा मॉर्निंग बुलेटिनच्या सूत्रसंचालनाची जबाबदारी त्यांनी स्वीकारली होती. तसंच मटा पत्रकार परिषद या निवडणूक विषयक कार्यक्रमाची संकल्पना-संयोजन आणि सूत्रसंचालनही त्यांनी केले होते. निवडणुकांच्या निमित्ताने त्यांनी विविध मान्यवरांच्या मुलाखती घेतल्या, सखोल राजकीय विश्लेषण केले, तसेच सामान्य नागरिकांशी संवाद साधणारे काही कार्यक्रमही व्हिडिओ टीमसोबत केले.
शैक्षणिक पात्रता
अनिश बेंद्रे यांनी २०१२ मध्ये रुपारेल महाविद्यालयातून मानसशास्त्र विषयात पदवी संपादन केली. त्यानंतर झेवियर्स महाविद्यालयातून मास कम्युनिकेशन विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतले. मराठीसोबतच हिंदी, इंग्रजी, संस्कृत आणि जपानी भाषेचाही त्यांनी अभ्यास केला आहे.… आणखी वाचा