Gadchiroli Nationalist Ajit Pawar Group Women Region Vice President Gitatai Hinge Died an Accident; अजित दादांना मोठा धक्का, राष्ट्रवादीच्या महिला प्रदेश उपाध्यक्षांचा अपघाती मृत्यू, विरुद्ध दिशेने येणाऱ्या कारला धडक
Gadchiroli Nationalist Ajit Pawar Group Women Region Vice President Gitatai Hinge Died an Accident; अजित दादांना मोठा धक्का, राष्ट्रवादीच्या महिला प्रदेश उपाध्यक्षांचा अपघाती मृत्यू, विरुद्ध दिशेने येणाऱ्या कारला धडक
Gadchiroli Accident News : राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेश उपाध्यक्ष तथा आधार विश्व फाऊंडेशन गडचिरोलीच्या अध्यक्ष गीताताई हिंगे यांचं अपघाती निधन झालं आहे.
गिताताई हिंगे अपघात मृत्यू(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
गडचिरोली : गडचिरोली जिल्ह्यातील राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात सक्रिय असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) महिला प्रदेश उपाध्यक्ष गीताताई हिंगे यांचं पाचगाव येथे झालेल्या भीषण अपघातात निधन झालं. काल रविवारी उशिरा रात्री ही घटना घडली असून त्यांच्या अचानक जाण्यानं गडचिरोली जिल्ह्यात हळहळ व्यक्त होत आहे.
कारची जोरदार धडक
गीताताई हिंगे या काल रविवारी खासगी कामानिमित्त नागपूरला गेल्या होत्या. रात्री गडचिरोलीकडे परतताना पाचगाव परिसरात त्यांची कार विरुद्ध दिशेने येणाऱ्या कारला जोरदार धडकली. धडक इतकी भीषण होती की, गीताताई हिंगे यांचा जागीच मृत्यू झाला, तर त्यांच्या पतींना किरकोळ दुखापत झाली. अपघातानंतर स्थानिकांनी तात्काळ मदतकार्य केलं. पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा केला असून पुढील तपास सुरू आहे.
गीताताई हिंगे या मूळच्या भाजपच्या सक्रिय पदाधिकारी होत्या. त्यांनी भाजपमध्ये जिल्हा अध्यक्ष व जिल्हा महामंत्री अशा महत्त्वाच्या जबाबदाऱ्या सांभाळल्या होत्या. स्थानिक स्वाराज्य संस्थाच्या निवडणुकीआधी भाजपने त्यांना नगराध्यक्षपदाचं तिकीट नाकारल्यानंतर ते पक्षातून बाहेर पडले होते. 26 नोव्हेंबर 2025 रोजी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) मध्ये प्रवेश केला आणि पक्षात दाखल होताच त्यांना महिला प्रदेश उपाध्यक्षपदाची जबाबदारी सोपवण्यात आली होती. त्यांच्या प्रवेशामुळे राष्ट्रवादीच्या संघटनात्मक कार्यात नवी ऊर्जा येईल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली होती.
जिल्ह्याभरात प्रशंसा
गीताताई हिंगे यांनी राजकारणासोबतच सामाजिक क्षेत्रातही उल्लेखनीय कार्य केलेलं होतं. त्या आधार विश्व फाउंडेशनच्या अध्यक्षा म्हणून काम पाहत होत्या आणि संस्थेमार्फत अनेक गरजू कुटुंबांना देखील त्यांनी मदत केली होती. विशेषतः करोना महामारीच्या काळात त्यांनी वैयक्तिक पुढाकार घेऊन गरजूंना अन्न, औषधे व इतर आवश्यक साहित्य उपलब्ध करून दिले. त्यांच्या या कामाची जिल्ह्याभरात प्रशंसा झाली होती.
गीताताई हिंगे यांच्या निधनामुळे गडचिरोली जिल्ह्याने एक जिद्दी, सक्रिय आणि संवेदनशील नेतृत्व गमावलं आहे. राजकीय कामात तत्परता, जनसंपर्कात सहजता आणि सामाजिक उपक्रमांतील बांधिलकी यामुळे त्या जिल्ह्यात लोकप्रिय होत्या. राजकीय आणि सामाजिक वर्तुळात त्यांच्या निधनाने शोककळा पसरली आहे. सर्वच पक्षातील नेत्यांनी त्यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त केलं आहे.
लेखकाबद्दलप्रशांत पाटीलप्रशांत पाटील ‘महाराष्ट्र टाईम्स ऑनलाईन'(TIL) या आघाडीच्या डिजिटल माध्यम समूहात सीनियर डिजिटल कंन्टेट प्रोड्युसर पदावर कार्यरत आहेत. पुणे जिल्ह्यातील नामांकित ‘थोडक्यात’ न्यूज वेब पोर्टल, हैदराबादमधील ‘आधान शॉर्ट न्यूज अॅप’, ‘सकाळ मिडिया ग्रुप’ आणि आता ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’, असा जवळपास पाच ते साडेपाच वर्षांपेक्षा अधिक काळ ते कार्यरत आहेत. प्रशांत पाटील यांना महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील सर्व गुन्हेगारी, अपघात, शेतकरी विषयक बातम्या, ग्रामीण भागात यश संपादन केलेल्या तरुणी किंवा तरुणांच्या सक्सेस स्टोरीज् आणि महाराष्ट्र हायपर लोकल अशा विविध विषयांची आवड आहे. ऑगस्ट (2026) पासून ‘महाराष्ट्र टाईम्स ऑनलाईन’साठी (TIL) काम करत आहेत. या दरम्यान, राज्यातील विधानसभा, लोकसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकींच्या बातम्यांवर विशेष लक्ष ठेवतात. याआधीही त्यांनी याच माध्यम समूहासोबत तीन वर्ष काम केलं आहे.
प्रशांत पाटील यांनी पुण्यातील नामांकित आबासाहेब गरवारे महाविद्यालयातून मास कम्युनिकेशन विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. शिक्षण घेत असतानाच त्यांनी ‘थोडक्यात’ या न्यूज वेब पोर्टलला काम केलं. तिथे डिजिटल माध्यमासाठी लेखन करत असताना त्यांना डिजिटल क्षेत्रातलं कसं काम करतात? हे यश संपादन केलं. त्यानंतर त्यांना मुंबईत ‘महाराष्ट्र टाइम्य ऑनलाईन’ (TIL) या नामांकित माध्यम समूहामध्ये काम करण्याची संधी मिळाली. 28 मार्च 2022 रोजी ते ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ या मोठ्या ब्रँण्डसोबत पहिल्यांदा जोडले गेले. तिथे त्यांनी प्रदीर्घ काळ म्हणजे तीन वर्ष डिजिटल विभागात काम केलं. त्यांनतर त्यांनी फेब्रुवारी 2025 ला ‘सकाळ मिडिया ग्रुप’ला काम करण्याची संधी मिळाली. परंतु तिथे ते काम करत असताना त्यांना पुन्हा ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ (TIL) या माध्यम समूहाने संधी दिली. त्यानंतर ऑगस्ट 2026 पासून प्रशांत पाटील हे ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’सोबत (TIL) काम करताय.
‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’मध्ये (TIL) काम करताना त्यांना खूप मोठमोठ्या संध्या मिळाल्या. जसे की, व्हिडिओ करणे, महाराष्ट्रातील संपूर्ण जिल्ह्यातील रिपोर्टर यांच्याशी समन्वय साधणे, जिल्हा प्रतिनिधींकडून वेळोवेळी काम करुन घेणे, विशेष आणि काही महत्वाच्या बातम्या मागवून घेणे, अशा बऱ्याच गोष्टींची त्यांना इथे मिळाली. प्रशांत पाटील हे सकाळच्या शिफ्टला काम करत असताना लाईव्ह ब्लॉग, रिपोर्टरशी बोलणे, ब्रेकिंग बातम्या, हायपर लोकल बातम्या, ग्रामीण भागातील सर्व घडामोडींकडे लक्ष देण्याचं काम ते करतात.… आणखी वाचा