Headlines

Vidhan Parishad Election 2026 Result Jalgaon BJP Nandkishor Mahajan marks victory against MVA Sharad Tayade rebel Reshma Kale; रेश्मा काळेंची माघार पथ्यावर, जळगावात भाजपच्या महाजनांचा एकतर्फी विजय, पहिल्याच फेरीत विजयाचा आकडा गाठला


Maharashtra MLC Election Result 2026 : मतमोजणीत प्रारंभीपासूनच नंदकिशोर महाजन यांनी आघाडी घेतली होती. त्यांना पहिल्याच फेरीत विजयाचा आकडा गाठता आल्याने दुसऱ्या पसंतीक्रमाची मते न मोजताच विजयी घोषित करण्यात आले.

Vidhan Parishad Election Results 2026 Maharashtra Times
(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
जळगाव : स्थानिक स्वराज्य संस्था प्राधिकरणाच्या विधान परिषद निवडणुकीत जळगावातून महायुतीचे उमेदवार नंदकिशोर महाजन यांचा विक्रमी मतांनी विजय झाला असून त्यांनी पहिल्याच फेरीत सरशी मिळवली आहे. पहिल्याच फेरीत त्यांना विजयाचा आकडा गाठता आल्याने दुसऱ्या पसंतीक्रमाची मते न मोजताच त्यांना विजयी घोषित करण्यात आले. त्यांना तब्बल ५७७ पेक्षा जास्त मते मिळाली.

जळगावात ‘महाजनकी’

जळगाव विधान परिषदेची निवडणूक यंदा मोठ्या प्रमाणात गाजली. यात प्रामुख्याने पहिल्या टप्प्या महायुतीत ही जागा भाजपला सुटणार की शिवसेनेला ? यावरून मोठा पेच निर्माण झाला होता. यात भारतीय जनता पक्षाला ही जागा मिळाल्यावर उमेदवारी कुणाला मिळणार ? यावरून मोठा खल झाला. अखेर अनेक मातब्बर इच्छुकांना वगळून भाजपच्या वतीने पक्षाचे रावेर लोकसभा क्षेत्रप्रमुख नंदकिशोर महाजन यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले. तर अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या क्षणाला अपक्ष उमेदवार अनिल चौधरी आणि शिवसेनेच्या बंडखोर उमेदवार रेश्मा कुंदन काळे यांनी उमेदवारी दाखल केली. मविआतर्फे शरद तायडे यांना उमेदवारी मिळाल्याने चौरंगी लढत निर्माण झाली.
Maharashtra TimesAnjali Damania : सुनेत्रा पवारांच्या सख्ख्या भावाला शिक्षा करण्याची हिंमत सरकारमध्ये आहे का? ओमराजेंना दमानियांचे 6 बोचरे सवाल

रेश्मा काळेंची माघार

माघारीची मुदत उलटून गेल्यानंतर देखील चार उमेदवार रिंगणात राहिल्याने प्रचंड चुरस निर्माण झाली. अखेर रेश्मा कुंदन काळे आणि अनिल चौधरी यांनी माघार घेतल्यामुळे शेवटी नंदकिशोर महाजन आणि शरद तायडे यांच्यात लढत झाली. १८ जून रोजी पार पडलेल्या निवडणुकीत तब्बल ९७ टक्के मतदान झाले. यात एकूण ६३० पैकी ६१६ मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. तर, आज म्हणजेच २२ जून रोजी सकाळी आठ वाजेपासून अल्पबचत भवनात मतमोजणी सुरू झाली. ही निवडणूक बॅलेट पेपरवर झाल्यामुळे मतपत्रिकांची मोजणी करण्यात आली.

Raj Thackeray | खासदारफुटीवरून राज ठाकरे रोखठोक बोलले; ‘राजकर्त्यांनी नव्हे जनतेनं विचार करावा’

Maharashtra TimesMilind Narvekar : ‘नार्वेकर कोण लागून गेला?’ भास्कर जाधवांचा बोचरा सवाल, ठाकरे गटात धुसफूस, आता मिलिंद नार्वेकरांचं ट्वीट, यांच्या मानसिक त्रासाचा फटका शिवसैनिकांना बसतोय…

पहिल्याच फेरीत विजयाचा आकडा

आजच्या मतमोजणीत प्रारंभीपासूनच नंदकिशोर महाजन यांनी आघाडी घेतली, आणि त्यांना पहिल्याच फेरीत विजयाचा आकडा गाठता आल्याने दुसऱ्या पसंतीक्रमाची मते न मोजताच त्यांना विजयी घोषित करण्यात आले. त्यांना तब्बल ५७७ पेक्षा जास्त मते मिळाली हे विशेष ! यामुळे विधानपरिषदेच्या निवडणुकीत नंदकिशोर महाजन यांनी एकतर्फी विजय संपादन केला

अनिश बेंद्रे

लेखकाबद्दलअनिश बेंद्रेअनिश बेंद्रे हे महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये सहाय्यक वृत्त संपादक या पदावर कार्यरत आहेत. ते मटा ऑनलाईनमध्ये २०२२ पासून कार्यरत आहेत. टीव्ही आणि डिजिटल अशा दोन्ही माध्यमांचा एकत्रित १३ वर्षांचा अनुभव त्यांच्या गाठीशी आहे. त्यांना राजकारण, समाजकारण यासोबतच मनोरंजन, गुन्हेगारी यासारख्या विविध विषयांवरील बातम्यांचे लेखन करण्याचा अनुभव आहे.

पत्रकारितेतील अनुभव
अनिश बेंद्रे यांनी टीव्ही माध्यमातून पत्रकारितेला सुरुवात केली. एबीपी माझा वृत्तवाहिनीत सर्वप्रथम त्यांना प्रॉडक्शन आणि टिकर विभागात काम करण्याची संधी मिळाली. मराठी भाषेवरील प्रभुत्वामुळे त्यांनी लिहिलेल्या आकर्षक हेडलाईन्स सहकाऱ्यांसह प्रेक्षकांची वाहवा मिळवून गेल्या. त्यानंतर २०१५ मध्ये एबीपी माझा वृत्तवाहिनीच्याच वेब टीमसोबत त्यांनी डिजिटल विश्वात कामाचा श्रीगणेशा केला. डिजिटल माध्यमासाठी लेखन करण्याचं आव्हान पेलताना त्यांनी लक्षवेधी मथळे लिहिण्याचं कसब आत्मसात केलं. एबीपी समुहासोबत जवळपास ६ वर्षांच्या कार्यकाळात त्यांनी विविध जबाबदाऱ्या पार पाडल्या. ट्रेनी, असिस्टंट प्रोड्युसर पदापासून प्रोड्युसरपर्यंत संधी मिळवली. मराठी भाषा दिवस, आंतरराष्ट्रीय पुरुष दिन, विवाहबाह्य संबंधावरील सुप्रीम कोर्टाचा निर्णय, वर्ल्ड टीव्ही डे यासारख्या विषयांवर त्यांनी केलेल्या डॉक्युमेंट्रीही विशेष गाजल्या.

पुढे टीव्ही९ मराठी वृत्तवाहिनीच्या वेबसाईटसोबत त्यांनी चार वर्ष काम केलं. यावेळी त्यांच्यातील नेतृत्व गुणांना वाव मिळाला. मॉर्निंग शिफ्ट इन्चार्ज म्हणून काम करताना बातमी लेखनाचं तंत्र शिकवण्यासोबतच त्यांनी सहकाऱ्यांना वेळोवेळी मार्गदर्शन केले. टीमसोबत समन्वय राखणे, प्रत्येकातील गुण हेरुन त्यानुसार कामाची विभागणी करणे यामध्ये त्यांचा हातखंडा आहे. कारकिर्दीच्या १३ वर्षांपैकी दहाहून अधिक वर्ष त्यांनी डिजिटल विश्वात काम केलं आहे. या काळात लोकसभा-विधानसभा-महापालिका यासारख्या विविध निवडणुकांचा त्यांनी बारकाईने अभ्यास केला आहे.

अनिश बेंद्रे २०२२ पासून महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनसोबत काम करत आहेत. सुरुवातीपासूनच मॉर्निंग शिफ्ट इन्चार्ज म्हणून काम करताना त्यांनी सहाय्यक वृत्त संपादक पदापर्यंत उन्नती मिळवली आहे. बातम्यांच्या सखोल विश्लेषणासोबतच बातमीमागील बातमी जाणून घेण्यात त्यांना रस आहे. बातमीचे विविध पैलू जाणून घेत सोप्या भाषेत ते प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. मानसशास्त्र विषयातील अभ्यासामुळे गुन्हेगारी बातम्या उलगडून सांगण्यात त्यांना मदत होते. याशिवाय मटा मॉर्निंग बुलेटिनच्या सूत्रसंचालनाची जबाबदारी त्यांनी स्वीकारली होती. तसंच मटा पत्रकार परिषद या निवडणूक विषयक कार्यक्रमाची संकल्पना-संयोजन आणि सूत्रसंचालनही त्यांनी केले होते. निवडणुकांच्या निमित्ताने त्यांनी विविध मान्यवरांच्या मुलाखती घेतल्या, सखोल राजकीय विश्लेषण केले, तसेच सामान्य नागरिकांशी संवाद साधणारे काही कार्यक्रमही व्हिडिओ टीमसोबत केले.

शैक्षणिक पात्रता
अनिश बेंद्रे यांनी २०१२ मध्ये रुपारेल महाविद्यालयातून मानसशास्त्र विषयात पदवी संपादन केली. त्यानंतर झेवियर्स महाविद्यालयातून मास कम्युनिकेशन विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतले. मराठीसोबतच हिंदी, इंग्रजी, संस्कृत आणि जपानी भाषेचाही त्यांनी अभ्यास केला आहे.आणखी वाचा