Headlines

खाडीवर सहापदरी पूल, 5 किमी लांब जुळे बोगदे; भाईंदर ते घोडबंदर प्रकल्पांचा मार्ग मोकळा| Maharashtra Times


Bhayander to Ghodbunder Project: पश्चिम द्रुतगती महामार्गाला एक पर्याय म्हणून मुंबई महानगर प्रदेशात भाईंदर ते घोडबंदर मार्ग बांधण्यात येणार आहे. या मार्गसाठी 17 हजार कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे.

भाईंदर-घोडबंदर मार्ग
(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
ठाणे: तब्बल एका वर्ष सुरू असलेल्या निविदा प्रक्रियेनंतर भाईंदर आणि घोडबंदर कनेक्टिव्हिटी प्रकल्पाला राज्य सरकारकडून मान्यता मिळाली आहे. 17, 036 कोटी रुपये खर्च करून बिल्ड-ऑपरेट-ट्रान्सफर (BOT) याअंतर्गत प्रकल्प राबवण्यात येणार आहे. या 15.4 किमी लांब मार्गाचं बांधकाम MMRDA करणार आहे. केंद्राकडून मान्यता मिळाल्यानंतर राज्य सरकारने 22 जून 2026 रोजी प्रकल्पाला हिरवा कंदील दाखवला.

कसे असतील मार्ग?

भाईंदर-घोडबंदर कनेक्टिव्हिटी प्रकल्पाचे दोन प्रमुख टप्पे आहेत. पहिल्या टप्प्यात भाईंदर ते फाऊंटन हॉटेल जंक्शनपर्यंत 9.6 किमी लांब सहापदरी खाडीपूल बांधण्यात येणार आहे. त्यानंतर दुसऱ्या टप्प्यामध्ये फाऊंनटेन हॉटेल जंक्शन ते घोडबंदर मार्गावरील गायमुखपर्यंत 5.86 किमी लांब सहापदरी जुळे बोगदे असतील. या मार्गामुळे ठाणे शहरातील वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात कमी होण्याची शक्यता आहे. पण काही कारणांमुळे या प्रकल्पाची निविदा प्रक्रिया रखडली होती.

Maharashtra TimesNavi Mumbai News: नवी मुंबईत रेल्वे स्थानकांचा विकास होणार, तीन स्थानकं ‘सिडको’कडून मध्य रेल्वेच्या ताब्यात; कुठे-कसा होणार फायदा?

यापूर्वी एमएमआरडीएने या प्रकल्पाचं दोन पॅकेजमध्ये विभाजन केलं होतं. पहिलं पॅकेज ‘मेघा इंजिनिअरिंग अँड इंफ्रास्टक्चर लि.’ ने सर्वात कमी बोली लावली होती. दरम्यान, ‘लार्सन अँड टर्बो’ या कंपनीला तांत्रिक चाचणीदरम्यान अपात्र ठरवण्यात आलं होतं. पण या निर्णयाविरुद्ध L&Tने आधी मुंबई हायकोर्टात आणि मग सुप्रीम कोर्टात धाव घेतली.

प्रकल्प कशामुळे रखडला ?

L&Tच्या ने कोर्टात असा दावा केला त्यांनी टनेलसाठी 6,498 कोटी रुपये तर उन्नत मार्गासाठी 5,554 कोटी रुपयांचं पॅकेज होतं. L&Tने प्रकल्पासाठी 12,000 कोटी रुपयांची बोली लावली असल्याचा दावा केला होता. MEIL हा प्रक्लप 14,000 कोटींमध्ये पूर्ण करणार होतं. पण सुप्रीम कोर्टाने हा वाद निरर्थक असल्याचं सांगत प्रकरण रद्द केलं. त्यानंतर एमएमआरडीएने पुन्हा निविदा काढल्या आणि पहिल्यापासून प्रक्रिया सुरू केली.

Maharashtra TimesDadar-Ratnagiri Passenger: दादर-रत्नागिरी पॅसेंजरसाठी अजून प्रतीक्षा, रेल्वे मंत्र्यांच्या आदेशाला दोन महिने उलटले; एक्सप्रेससाठी हालचाली नाहीच

त्यानंतर एमएमआरडीएने L&T कडून खर्चाचे तपशील आणि कागदपत्रे मागवली. तांत्रिक आणि आर्थिक तज्ञांचा समावेश असलेल्या एका समितीकडून या प्रस्तावाचा तपास होणार होता. पण गेल्या आठवड्यापर्यंत एल अँड टीने या विनंतीला प्रतिसाद दिला नाही. त्यानंतर 22 जून रोजी राज्य सरकारने या प्रकल्पाला 17,036 कोटी खर्चात मंजुरी दिली आहे. या सुधारित प्रस्तावानुसार, केंद्र आणि राज्य सरकार प्रत्येकी 20 टक्के खर्च उचलणार आहे.

या मार्गामुळे पश्चिम द्रुतगती महामार्गावरील वाहतूक कोंडी कमी होणार आहे. नागरिकांसाठी एक पर्यायी उत्तर-दक्षिण मार्ग उपलब्ध होणार आहे. तब्बल 57.76 हेक्टर भूखंडावर हा संपूर्ण मार्ग बांधला जाईल. येत्या पाच वर्षांत बांधकाम पूर्ण करून प्रवाशांसाठी खुला होईल अशी अपेक्षा आहे.

सानिया कदम

लेखकाबद्दलसानिया कदमसानिया कदम या सध्या ‘मटा ऑनलाईन’मध्ये गेल्या सहा महिन्यांपासून कन्सल्टंट पदावर कार्यरत आहेत. २०२५ मध्ये बॅचलर्सचे शिक्षण पूर्ण करून त्यांनी नुकताच पत्रकारितेच्या क्षेत्रात प्रवेश केला आहे. लोकल बातम्या, लाइव्ह ब्लॉग कव्हरेज, गुन्हेगारी, आंतरराष्ट्रीय घडामोडी तसेच इन्फ्रास्ट्रक्चर व नागरी विकासाशी संबंधित बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे.

पत्रकारितेतील व्यावसायिक कामाची ही त्यांची पहिलीच वेळ असली, तरी त्यांच्या पत्रकारितेच्या प्रवासाची सुरुवात महाराष्ट्र टाइम्स प्रिंटमधून झाली. २०२४ मध्ये मुलुंड वाणिज्य महाविद्यालयातून बीएमएमचे शिक्षण घेत असताना प्राध्यापकांकडून त्यांची कॉलेज क्लब रिपोर्टर म्हणून नियुक्ती झाली आणि तेव्हाच ‘मटा’शी त्यांचा पहिला संबंध जोडला गेला.

यानंतर त्यांनी अनेक महिन्यांपर्यंत महाराष्ट्र टाइम्सच्या ‘मुंबई टाइम्स’ पुरवणीसाठी लेखन केले. कॉलेज विद्यार्थ्यांच्या दैनंदिन समस्या, सोशल मीडियावरील ट्रेंड्स तसेच एआयच्या वाढत्या प्रभावावर त्यांनी अनेक लेख लिहिले. सोशल मीडियावर गाजलेल्या ‘घिबली आर्ट’ ट्रेंडवर तसेच परीक्षेच्या काळात विद्यार्थ्यांच्या आयुष्यात वाढत्या एआयच्या वापराबाबत लिहिलेल्या लेखांचे विशेष कौतुक झाले. या काळात महाराष्ट्र टाइम्स प्रिंटच्या विविध कार्यक्रमांमध्ये सहभागी होत त्यांनी वृत्तांकनासाठीही हातभार लावला. २०२५ मधील ‘माय मराठी कला संगम’ तसेच महाराष्ट्र टाइम्सच्या ‘शोध युवा प्रतिमेचा’ या विशेष कार्यक्रमांचे त्यांनी वृत्तांकन केले. विद्यार्थ्यांशी आणि नव्या पिढीशी जोडून घेणाऱ्या, त्यांच्या दृष्टिकोनातून बातम्या मांडण्याचा त्यांचा नेहमीच प्रयत्न राहिला.

२०२५ मध्ये बीएमएमचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी के.सी. महाविद्यालयातून एमए इन जर्नलिझमला प्रवेश घेतला आणि त्याचवेळी ‘मटा ऑनलाईन’मध्ये काम सुरू केले. येथे त्यांनी लोकल बातम्या, लाइव्ह ब्लॉग अपडेट्स, इन्फ्रास्ट्रक्चर व विकासकामे, तसेच सरकारी धोरणे यांवर विशेष प्राविण्य मिळवले.

लहानपणापासूनच मराठी आणि इंग्रजी भाषेत वाचन-लेखनाची आवड असल्याने इंग्रजी भाषेवर त्यांचे विशेष प्रभुत्व आहे. त्यामुळे इंग्रजीतील गुंतागुंतीच्या बातम्या मराठी वाचकांसाठी सोप्या, समजण्यासारख्या भाषेत मांडण्याचा त्यांचा सातत्यपूर्ण प्रयत्न असतो. डिग्रीपर्यंतचं शिक्षण इंग्रजी माध्यमातून केलं असून संपूर्ण महाविद्यालयात प्रथम क्रमांक पटकावला. शेवटच्या वर्षी, न्यूजरूम नावाच्या प्रोजेक्टसाठी एका वृत्तपत्राच्या संपादकांची मुलाखत घेणं आवश्यक होतं. त्यावेळी, मुंबई चौफेरचे संपादक श्री. प्रफुल्ल फडके यांची मुलाखत घेतली. या मुलाखती दरम्यान त्यांनी आपल्या 30 वर्षांच्या मराठी भाषेतील पत्रकारीतेच्या अनुभवाबद्दल सांगितलं. त्यावेळी मराठी माध्यमातून पत्रकारिता करण्याची आवड निर्माण झाली. नंतर महाराष्ट्र टाईम्स प्रिंटमधल्या अनुभवामुळे ही आवड आणखी वाढली.आणखी वाचा