Headlines

Melghat Water Crisis: ‘समृद्ध’ गावातील चिमुरड्यांचा पाण्यासाठी जीवघेणी संघर्ष; विहिरीच्या गाळातून पाणी उपसण्याची वेळ – severe water crisis in melghat kekadakheda childs have to go down to the well to fill water


Melghat Water Crisis: डिजिटल इंडिया आणि ‘हर घर जल’च्या घोषणा देणाऱ्या प्रशासकीय व्यवस्थेचे हे विदारक वास्तव मेळघाटाच्या दऱ्याखोऱ्यात उघडे पडले आहे.

melghat water crisis
मेळघाट पाणीटंचाई(फोटोमहाराष्ट्र टाइम्स)
म. टा. वृत्तसेवा, अमरावती: एकीकडे ‘मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान’ अंतर्गत उत्कृष्ट कामगिरीचा सन्मान मिळवायचा आणि दुसरीकडे त्याच ग्रामपंचायतीच्या हद्दीतील गावात पाण्यासाठी लहान मुलांचा जीव धोक्यात घालायचा, असा संतापजनक विरोधाभास मेळघाटातील धारणी तालुक्याच्या केकदाखेडात समोर आला. या आदिवासीबहुल पाड्यावर भीषण पाणीटंचाई निर्माण झाल्याने चिमुकल्यांना थेट विहिरीच्या तळाशी उतरून गढूळ पाणी भरावे लागत आहे.

केकदाखेडात जलस्रोत कोरडे…
केकदाखेडा गावाची लोकसंख्या अवघी १५०च्या आसपास असून येथे साधारण २२ घरे आहेत. मात्र, उन्हाळ्याच्या तीव्रतेमुळे गावातील एकमेव विहीर, बोअरवेल आणि पारंपरिक जलस्रोत पूर्णपणे कोरडे पडले आहेत. पाणी आटल्याने महिला आणि वृद्ध नागरिकांना पाण्यासाठी मैलोन्मैल भटकंती करावी लागत आहे. शाळा शिकणे किंवा खेळण्याच्या वयातील येथील अल्पवयीन मुले-मुली जीव मुठीत धरून विहिरीच्या कठड्यावरून खाली उतरतात आणि तळाशी साचलेले दूषित, गढूळ पाणी डब्यात भरतात. हेच दूषित पाणी पिण्याशिवाय गावकऱ्यांसमोर दुसरा कोणताही पर्याय उरलेला नाही.

Maharashtra TimesVijay Chavan : छोट्या गावातून तहसीलदारपर्यंत, लाचखोर अधिकारी विजय चव्हाणांची नेमकी स्टोरी काय? सोशल मीडियातही प्रचंड सक्रिय; 19 वर्षांच्या सेवेला भ्रष्टाचाराचा डाग
दरम्यान, प्रशासनाने तात्काळ केकदाखेडा गावात टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू करावा आणि गावात कायमस्वरूपी पाणी योजना राबवावी, अशी मागणी गावकऱ्यांनी केली आहे. येत्या दोन दिवसांत पाणी न मिळाल्यास थेट प्रशासनाविरोधात तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा संतप्त ग्रामस्थांनी दिला आहे.

Maharashtra TimesNagpur News: पिकनिकचा आनंद घेतानाच काका-पुतण्यासह तिघं बुडाले, नातेवाईकांचा धाय मोकलून आक्रोश, जेवणाचं साहित्यही नदीकाठीच पडून
गावकऱ्यांनी अनेकदा पंचायत समिती आणि संबंधित पाणीपुरवठा विभागाकडे लेखी तक्रारी केल्या, मात्र प्रशासनाला अद्याप जाग आलेली नाही. धारणी पंचायत समिती सध्या प्रभारी अधिकाऱ्यांच्या भरवशावर सुरू असल्याने ग्रामीण भागातील या मूलभूत समस्येकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप होत आहे. जलजीवन मिशन अंतर्गत प्रत्येक व्यक्तीला रोज ५५ लिटर शुद्ध पाणी देण्याचा दावा केकदाखेडा येथील परिस्थितीने खोटा ठरला आहे.

ग्रामसेवकाला निर्देश दिलेत
संबंधित ग्रामसेवकाला तत्काळ संपर्क साधून उपाययोजना करण्याचे निर्देश दिले आहेत. माझ्याकडे प्रभारी पदभार असून रुजू होऊन अवघे पाच दिवस झाले आहेत, अशी सारवासारव धारणीचे प्रभारी गटविकास अधिकारी रजत कावळे यांनी ‘मटा’शी बोलताना केली.

किशोरी तेलकर

लेखकाबद्दलकिशोरी तेलकर किशोरी तेलकर

किशोरी तेलकर महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये कन्सल्टंट या पदावर कार्यरत आहेत. किशोरी या २०२२पासून मटा ऑनलाइन सोबत जोडलेल्या आहेत. राजकारण, हायपर लोकल स्टोरी, क्राईम बातम्या, महिलांविषयक समस्या, गाव खेड्यातल्या बातम्या करण्याचा त्यांचा अनुभव आहे.

पत्रकारितेतील अनुभव
किशोरी यांना वृत्तपत्र, टीव्ही आणि डिजिटल माध्यमांमधील ६ वर्षांचा अनुभव आहे. किशोरी यांनी सकाळ वृत्तपत्रातून पत्रकारितेला सुरुवात केली. सकाळ वृत्तपत्रात काम करतांना त्यांनी प्रिंट मीडियासोबतच सोशल मीडिया हॅंडलिंग, वेबसाईटचेही काम केलं आहे. सध्या चार वर्षांपासून त्या महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये कार्यरत आहेत. लेखन कौशल्याच्या जोरावर सामाजिक समस्या, शाळा- कॉलेज विद्यार्थी समस्या, आरोग्य टिप्स, महिलांविषयक प्रश्न, फॅशन, लाइफस्टाइल या विविध विषयांवर त्यांनी बातम्या केल्या आहेत.

शैक्षणिक पात्रता
किशोरी तेलकर यांनी कै. बिंदू रामराव देशमुख कला व वाणिज्य महिला महाविद्यालय, नाशिकरोड येथून एम.कॉम पदवी संपादन केली. त्यानंतर गोखले एज्युकेशन सोसायटीचे एच.पी.टी आर्ट्स अँड आर.वाय.के सायन्स कॉलेजमधून कम्युनिकेशन अँड जर्नलिझम विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. जर्नलिझमचे शिक्षण घेत असतानाच किशोरी यांनी देशदूत, दिव्यमराठी सारख्या वृत्तपत्रात इंटर्नशिप केलेली आहे. मराठी भाषेवर प्रभुत्व असून हिंदी, इंग्रजी भाषाही त्यांना अवगत आहेत.आणखी वाचा