Headlines

तिसऱ्या मुंबईचा विकास होणार, नवी मुंबई विमानतळाजवळ उभारणार नवं शहर; पण प्रकल्पासमोर ३ मोठी आव्हानं| Maharashtra Times


मुंबई आणि नवी मुंबईनंतर आता तिसरी मुंबई उभारण्याची तयारी करण्यात येत आहे. या शहरात निवासी, व्यावसायिक आणि औद्योगिक क्षेत्रांचा नियोजित विकास करण्यात येणार आहे.

तिसरी मुंबई (1)
(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
राजेश वाघमारे: मुंबईतली गर्दी कमी करण्याच्या उद्देशाने ५० वर्षांपूर्वी नवी मुंबईची निर्मिती करण्यात आली. त्यानंतर आता तिसरी मुंबईची निर्मिती करण्यात येणार आहे. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लागून असणाऱ्या परिसरात तिसरी मुंबई उभारण्याचा प्रस्ताव आहे. मुंबई महानगर प्रदेशातला हा आत्तापर्यंतचा सर्वात मोठा आणि महत्त्वाकांक्षी विकास प्रकल्प असणार आहे. तिसरी मुंबई ही केएससी (कर्नाळा-साई-चिरनेर) न्यू टाऊन या नावाने ओळखली जाईल. पनवेल, पेण आणि उरण तालुक्यातल्या १२४ गावांमध्ये ३२३ चौ. कि. मी. हून अधिक क्षेत्रात हे नवीन शहर वसवलं जाणार आहे.

एमएमआरमधल्या स्थावर मालमत्ता क्षेत्रासाठी तिसरी मुंबई ही एक खूप मोठी संधी असणार आहे. तिसऱ्या मुंबईतल्या स्थावर मालमत्ता विकासाचा पाया हा प्रामुख्याने कनेक्टिव्हिटीवर आधारित असेल. त्यात सध्या तरी प्रामुख्याने तीन प्रकल्पांचा आवर्जुन उल्लेख करावा लागेल.

Maharashtra TimesPurandar International Airport: पुरंदर विमानतळ भूसंपादनासाठी विशेष मोहीम, शेतकऱ्यांच्या सर्व अडचणी सोडवणार; एक हजार कोटींच्या निधीचे वाटप पूर्ण

कोणती कामं सुरू ?

अटल सेतू (एमटीएचएल) या सागरी पुलामुळे दक्षिण मुंबई ते चिर्लेदरम्यानचं अंतर अवघ्या २० मिनिटांमध्ये कापता येतं. त्यामुळे मुंबईतला उच्चभ्रू आणि व्यावसायिक वर्ग नवी मुंबईकडे आकर्षित होत आहे. अटल सेतूचा फायदा प्रस्तावित तिसऱ्या मुंबईलासुद्धा होणार आहे. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ कार्यान्वित झालं असून विमानतळाला लागून असणाऱ्या परिसरातच तिसरी मुंबई विकसित करण्यात येणार आहे. या भागात हॉटेल्स, व्यावसायिक कार्यालयं आणि आलिशान गृहप्रकल्पाची काम आधीच सुरू झाली आहेत.

विरार-अलिबाग मल्टिमोडल कॉरिडोर हा मार्ग तिसऱ्या मुंबईला उर्वरित एमएमआर क्षेत्राशी जोडेल. त्यामुळे लॉजिस्टिक्स आणि वेअरहाऊसिंग क्षेत्राला चालना मिळत आहे. या मार्गाचं काम वेगाने सुरू असून नजीकच्या भविष्यात तो वाहतुकीसाठी खुला होईल.

जमिनी, मालक आणि परतावा

तिसरी मुंबई उभारताना जमीन परतावा, भूखंड वाटप आणि पायाभूत सुविधा यासाठी निश्चित कालमर्यादा ठरवली पाहिजे, पायाभूत सुविधा पुरवण्याची कायदेशीर हमी दिली पाहिजे आणि त्यासंदर्भातल धोरण पारदर्शक ठेवलं पाहिजे, याकडे नैना बिल्डर वेल्फेअर असोसिएशनचे अध्यक्ष प्रकाश बाविस्कर यांनी लक्ष वेधलं, ते म्हणाले की, “तिसरी मुंबई यशस्वीपणे उभारायची असेल तर जमीनमालकांना लाभार्थी नव्हे, तर विकासातले भागीदार बनवणं गरजेच आहे. विश्वास, न्याय्य परतावा आणि वेळेत अंमलबजावणी हेच या प्रकल्पाच्या यशाचे तीन स्तंभ आहेत. नैना प्रकल्प सुमारे १५ वर्ष रखडला. त्यात झालेल्या चुकांची पुनरावृत्ती टाळली तर जमीनमालक, शेतकरी, विकासक आणि गुंतवणुकदारांचा तिसऱ्या मुंबईवरचा विश्वासही वाढेल.” नैना क्षेत्रात जगीनमालकांना ४० टक्के भूखंड देण्याची तरतूद आहे. तर तिसऱ्या मुंबईत केवळ २२. ५ टक्के भूखंड देण्यात येणार आहे, अशी माहितीही बाविस्कर यांनी दिली.

सद्यस्थिती

  • महाराष्ट्र सरकारच्या नगरविकास विभागाने तिसऱ्या मुंबईचा मास्टर प्लॅन तयार करण्यासाठी सिंगापूरच्या सुरबाना जुरींग इन्फ्रास्ट्रक्चर या कंपनीची सल्लागार म्हणून नियुक्ती केली आहे.
  • हा मास्टर प्लॅन ऑगस्ट २०२६ पर्यंत पूर्ण करण्याचं उद्दिष्ट आहे. प्रकल्पासाठी आवश्यक ड्रोन मॅपिंग आणि लिडार सर्व्हेचं काम पूर्ण झालं आहे.
  • मार्च २०२६ मध्ये राज्य सरकारने न्यू टाऊन डेव्हलपमेण्ट अॅथॉरिटी एनटीडीए) आणि एमएमआरडीएच्या प्रकल्पांसाठी एका व्यापक आणि सर्वसमावेशक जमीन संपादन धोरणाला मंजुरी दिली आहे.
  • एमएमआरडीने आपल्या २०२६-२७च्या अर्थसंकल्पात केवळ तिसऱ्या मुंबईच्या सुरुवातीच्या विकासकामांसाठी ४,००० कोटी रुपयांची घसघशीत तरतूद केली आहे.

Maharashtra TimesKonkan Coastal Highway: रेवस-रेड्डी किनारी महामार्गासाठी महत्त्वाचा दुवा; सागरी पुलाचं काम सुरू; जंजिरा, दिवेआगर गाठणं सोपं होणार

तिसऱ्या मुंबईसमोरची आव्हानं

  • तिसऱ्या मुंबईसाठी लागणाऱ्या जमिनींची नुकसान भरपाई, मोबदला आणि पुनर्वसनाचे प्रश्न सुटलेले नाहीत. त्यामुळे शेतकरी आणि स्थानिक रहिवाशांकडून या प्रकल्पाला अजूनही पूर्ण पाठिबा मिळालेला नाही.
  • प्रस्तावित केएससी न्यू टाऊन भागात शेतीयोग्य जमीन, जंगल आणि पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील क्षेत्र आहेत. त्यामुळे विकास आणि पर्यावरण यांचा समतोल राखण आवश्यक आहे.
  • रस्ते विकासाबरोबरच मेट्रो आणि रेल्वे मार्गाचा विस्तार वेळेत होणं गरजेचं आहे. अन्यथा निवासी प्रकल्पांची मागणी अपेक्षित प्रमाणात वाढणार नाही. शाळा, हॉस्पिटल, बाजारपेठा, मनोरंजन केंद्र आणि इतर नागरी सुविधांचा विकासही त्याच वेगाने होणं आवश्यक आहे.
सानिया कदम

लेखकाबद्दलसानिया कदमसानिया कदम या सध्या ‘मटा ऑनलाईन’मध्ये गेल्या सहा महिन्यांपासून कन्सल्टंट पदावर कार्यरत आहेत. २०२५ मध्ये बॅचलर्सचे शिक्षण पूर्ण करून त्यांनी नुकताच पत्रकारितेच्या क्षेत्रात प्रवेश केला आहे. लोकल बातम्या, लाइव्ह ब्लॉग कव्हरेज, गुन्हेगारी, आंतरराष्ट्रीय घडामोडी तसेच इन्फ्रास्ट्रक्चर व नागरी विकासाशी संबंधित बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे.

पत्रकारितेतील व्यावसायिक कामाची ही त्यांची पहिलीच वेळ असली, तरी त्यांच्या पत्रकारितेच्या प्रवासाची सुरुवात महाराष्ट्र टाइम्स प्रिंटमधून झाली. २०२४ मध्ये मुलुंड वाणिज्य महाविद्यालयातून बीएमएमचे शिक्षण घेत असताना प्राध्यापकांकडून त्यांची कॉलेज क्लब रिपोर्टर म्हणून नियुक्ती झाली आणि तेव्हाच ‘मटा’शी त्यांचा पहिला संबंध जोडला गेला.

यानंतर त्यांनी अनेक महिन्यांपर्यंत महाराष्ट्र टाइम्सच्या ‘मुंबई टाइम्स’ पुरवणीसाठी लेखन केले. कॉलेज विद्यार्थ्यांच्या दैनंदिन समस्या, सोशल मीडियावरील ट्रेंड्स तसेच एआयच्या वाढत्या प्रभावावर त्यांनी अनेक लेख लिहिले. सोशल मीडियावर गाजलेल्या ‘घिबली आर्ट’ ट्रेंडवर तसेच परीक्षेच्या काळात विद्यार्थ्यांच्या आयुष्यात वाढत्या एआयच्या वापराबाबत लिहिलेल्या लेखांचे विशेष कौतुक झाले. या काळात महाराष्ट्र टाइम्स प्रिंटच्या विविध कार्यक्रमांमध्ये सहभागी होत त्यांनी वृत्तांकनासाठीही हातभार लावला. २०२५ मधील ‘माय मराठी कला संगम’ तसेच महाराष्ट्र टाइम्सच्या ‘शोध युवा प्रतिमेचा’ या विशेष कार्यक्रमांचे त्यांनी वृत्तांकन केले. विद्यार्थ्यांशी आणि नव्या पिढीशी जोडून घेणाऱ्या, त्यांच्या दृष्टिकोनातून बातम्या मांडण्याचा त्यांचा नेहमीच प्रयत्न राहिला.

२०२५ मध्ये बीएमएमचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी के.सी. महाविद्यालयातून एमए इन जर्नलिझमला प्रवेश घेतला आणि त्याचवेळी ‘मटा ऑनलाईन’मध्ये काम सुरू केले. येथे त्यांनी लोकल बातम्या, लाइव्ह ब्लॉग अपडेट्स, इन्फ्रास्ट्रक्चर व विकासकामे, तसेच सरकारी धोरणे यांवर विशेष प्राविण्य मिळवले.

लहानपणापासूनच मराठी आणि इंग्रजी भाषेत वाचन-लेखनाची आवड असल्याने इंग्रजी भाषेवर त्यांचे विशेष प्रभुत्व आहे. त्यामुळे इंग्रजीतील गुंतागुंतीच्या बातम्या मराठी वाचकांसाठी सोप्या, समजण्यासारख्या भाषेत मांडण्याचा त्यांचा सातत्यपूर्ण प्रयत्न असतो. डिग्रीपर्यंतचं शिक्षण इंग्रजी माध्यमातून केलं असून संपूर्ण महाविद्यालयात प्रथम क्रमांक पटकावला. शेवटच्या वर्षी, न्यूजरूम नावाच्या प्रोजेक्टसाठी एका वृत्तपत्राच्या संपादकांची मुलाखत घेणं आवश्यक होतं. त्यावेळी, मुंबई चौफेरचे संपादक श्री. प्रफुल्ल फडके यांची मुलाखत घेतली. या मुलाखती दरम्यान त्यांनी आपल्या 30 वर्षांच्या मराठी भाषेतील पत्रकारीतेच्या अनुभवाबद्दल सांगितलं. त्यावेळी मराठी माध्यमातून पत्रकारिता करण्याची आवड निर्माण झाली. नंतर महाराष्ट्र टाईम्स प्रिंटमधल्या अनुभवामुळे ही आवड आणखी वाढली.आणखी वाचा