Headlines

Latur | प्रशासनाकडून मदतीच्या नावाखाली मिळालेला बैल आजारी, शेतकरी हतबल, फडणवीसांना साद – goverment gave farmer sick bull at latur



महाराष्ट्र टाइम्स.कॉम

#latur #farmer #bull #sickbull #devendrafadnavis #bjpलातूर जिल्ह्यातील देवणी तालुक्यातील बोंबळी येथील शेतकरी काशिनाथ गायकवाड यांचा एक बैल वीज कोसळून मृत्युमुखी पडला. त्यानंतर एका बैलाच्या जागी पत्नीला औताला जुंपून मशागत करत असल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आणि राज्यभरातून हळहळ व्यक्त करण्यात आली.या घटनेची दखल घेत पशुसंवर्धन विभागाने गेल्या १० जून रोजी तातडीने मदत म्हणून त्या शेतकऱ्याला एक बैल उपलब्ध करून दिला. मात्र मदतीसाठी दिलेला हा बैल दोनच दिवसांत शेतातील मशागतीदरम्यान खाली बसला. पशुवैद्यकीय तपासणीत तो आजारी असल्याचे निष्पन्न झाले. परिणामी मदत मिळण्याऐवजी शेतकऱ्यावर आता त्या बैलाच्या उपचाराचा खर्च करण्याची वेळ आली आहे.



Source link

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत