भाजप आणि महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी जातीय राजकारण करणे बंद केले पाहिजे. यापूर्वी अनेक मोठे मोठे नेते झाले त्यावेळी असे प्रश्न का निर्माण झाले नाही. गेल्या 10 वर्षांमध्ये समाजामध्ये आगी लावण्याचे काम देवेंद्र फडणवीस, अमित शहा, नरेंद्र मोदी यांनी
.
संजय राऊत म्हणाले की, मनोज जरांगे पाटील हे त्यांच्या समाजाचे नेतृत्व करत आहे. त्यासाठी सतत उपोषण केल्याने त्यांची प्रकृती खालावली आहे. मी त्यांना सांगितले की असे उपोषण करत स्वत:च्या प्रकृती खराब करुण घेऊ नका. परभणीमध्ये खासदार संजय जाधव यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना बोलावून मेळावा घेतला तो मेळावा टाळावा अशी भूमिका जरांगे पाटील यांनी केला आहे.

जे ठाकरेंचे नाही झाले ते जरांगेंचे काय होणार
संजय राऊत म्हणाले की, संजय जाधव यांच्या लोकसभेच्या निवडणुकीवेळी मनोज जरांगे पाटील यांची बरीच मदत झाली, त्यामुळे जरांगे पाटील यांनी जाधवांकडून अपेक्षा केली ती योग्यच आहे. जे इतके वर्षे पद देऊन ठाकरेंचे होऊ शकले नाही तर ते मनोज जरांगे पाटील यांचे काय होणार? असा सवाल राऊत यांनी केला आहे. ते रोज नवे आई-बाप शोधत असतात. त्यांच्यामध्ये काय होते ते पाहू.
सरकारने जरांगेंचे उपोषण गांभीर्याने घ्यावे
संजय राऊत म्हणाले की, उपोषण हा विषय नेत्याच्या प्रकृतीसाठी अत्यंत त्रासदायक असतो हे आपण मनोज जरांगे पाटील आणि जंतरमंतरवर पाहिला आहे. संजय जाधवांचा सर्वांत मोठा अपराध हा त्यांनी ठाकरेंशी गद्दारी केल्याचा आहे. त्यांना सर्व पदे देऊनही ते ठाकरेंचे होऊ शकले नाही ते इतरांचे काय होणार. मनोज जरांगे पाटलांनी खासदार जाधवांना धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही. जरांगे पाटील यांच्यासोबत चर्चा केली पाहिजे. मुख्यमंत्री नागपुरात बसून बोलतात की मार्ग काढू पण किती चर्चा केल्या? मार्ग काढले? हा विषय लहान आहे का? जरांगे मांडत असलेल्या गोष्टीकडे सरकार गांभीर्याने पाहत नाही. तिथे मंत्र्यांना पाठवून देता मोठा कोणी नेता जात नाही. इतर गोष्टीकडे लक्ष देण्यासाठी तुम्हाला वेळ आहे.
मुख्यमंत्र्यांनी मराठा समाजासाठी वेळ काढावा
संजय राऊत म्हणाले की, मुख्यमंत्र्यांनी मराठा समाजाच्या मागण्यासाठी वेळ काढणं गरजेचे आहे. त्यांनी धनगर समाजाला पहिल्या बैठकीत आरक्षणावर निर्णय घेऊ असे सांगितले होते ते सुद्धा देवेंद्र फडणवीस विसरलेले दिसत आहेत. मराठा समाजाबद्दल सुद्धा त्यांनी हेच शब्द दिले होते. ते प्रत्येक समाजाला एकमेकांच्याविरोधात खेळवतात वाद निर्माण करतात ते निवडणुकीपर्यंत चालवतात मग आश्वासन देतात आणि मते घेतात, पुन्हा तेच करतात. सरकारने मनोज जरांगे पाटील यांचा गैरफायदा घेऊ नये. हे ही वृत्त वाचा मनोज जरांगेंच्या उपोषणाचा तिसरा दिवस:प्रकृती खालावली तरी उपचार नाकारले; सरकारचे शिष्टमंडळ आज पुन्हा भेट घेण्याची शक्यता

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांच्या अंतरवाली सराटी येथील 11व्या आमरण उपोषणाचा आज तिसरा दिवस आहे. सलग उपोषणामुळे जरांगे पाटील यांची शुगर काही प्रमाणात खालावली असली, तरी त्यांनी वैद्यकीय उपचार घेण्यास स्पष्ट शब्दांत नकार दिला आहे. दरम्यान, रविवारी परभणीत झालेल्या शिवसेनेच्या मेळाव्यावरून त्यांनी सत्ताधाऱ्यांवर जोरदार तोफ डागली. वाचा सविस्तर
