Shabana Azmi : शबाना आझमी यांनी नुकत्याच एका मुलाखतीत हिंदू-मुस्लीम विभाजनावर केलेलं वक्तव्य चर्चेत आलं आहे.
(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
मुंबई – ज्येष्ठ अभिनेत्री शबाना आझमी यांनी हिंदू-मुस्लिम विभाजनाच्या मुद्द्यावर त्यांचं मत व्यक्त केलं आहे. समाजातील संघर्ष हा हिंदू आणि मुस्लिमांमध्ये नसून उदारमतवादी आणि कट्टरपंथीयांमध्ये आहे, असं त्यांनी म्हटलंय. एका मुलाखतीदरम्यान शबाना आझमी यांनी सांगितलं की, त्या आणि त्यांचे पती जावेद अख्तर, दोन्ही समुदायांमधील कट्टरपंथीयांच्या टीकेला सामोरे गेले आहेत. त्यांच्या मते, हिंदू आणि मुस्लिम दोन्ही बाजूंचे कट्टरपंथीय त्यांच्या विचारांना स्वीकारू शकत नाहीत.
समाजात जाणीवपूर्वक फुट पाडली जाते
शबाना आझमी म्हणाल्या की, ‘दोन्ही समाजातील कट्टर लोक मला आणि जावेद दोघांनाही सहन करू शकत नाहीत. कट्टर हिंदू कट्टर आणि कट्टर मुस्लीम लोकांना आम्ही आवडत नाही. यावरूनच आमची धर्मनिरपेक्षता सिद्ध होते, असं आम्हाला वाटतं. कारण कधी एखादा मौलवी आमच्याविरोधात फतवा काढतो, तर कधी कोणी आम्हाला दहशतवादी म्हणतं. आपल्याला या हिंदू-मुस्लीम वादाच्या पलीकडे जावं लागेल. समाजात फूट पाडण्यासाठी जे जाणीवपूर्वक प्रयत्न केले जात आहेत, त्यामध्ये आपण न पडणं हाच यावरील एकमेव उपाय आहे. ही लढाई हिंदू आणि मुस्लीम यांच्यात नसून उदारमतवादी आणि कट्टर लोकांमध्ये आहे, हे आपण समजून घ्यायला पाहिजे.’
Vandana Gupte : ‘नाटकाच्या प्रयोगात फोन वाजला की अभिनेते थांबतात, मला त्यांचा राग येतो’; स्पष्टच बोलल्या अभिनेत्री वंदना गुप्ते ‘उदारमतवादी हिंदू आणि मुस्लीम एका बाजूला आहेत, तर कट्टर हिंदू आणि मुस्लीम दुसऱ्या बाजूला आहेत. तुम्ही जेव्हा याकडे या दृष्टिकोनातून बघाल, तेव्हाच धर्माच्या नावावर लोकांमध्ये फूट पाडण्याचं विष तुमच्या मनातून निघून जाईल. धर्माच्या आधारावर फूट पाडणं हे भारताच्या संस्कृतीच्या आणि संविधानाच्या विरोधात आहे. खरा भारत म्हणजे सांस्कृतिक विविधता आहे. आम्ही आयुष्यभर हीच संस्कृती जपली आहे. माझ्या कुटुंबानं नेहमीच भारताच्या विविधतेचा आदर केला आहे.’ असं शबाना आझमी यांनी शेवटी सांगितलं. ‘झूम’ला दिलेल्या मुलाखतीत शबाना आझमी बोलत होत्या.
Vandana Gupte Interview : हाताने रिक्षा उलटवली, मराठी मोहीम योग्यच, वंदना गुप्ते यांची बेधडक मुलाखत
दरम्यान, याच मुलाखतीत शबाना आझमी यांनी ‘बटवारा १९४७’ या सिनेमाबद्दलही प्रतिक्रिया दिली. सनी देओलला प्रेक्षक मुस्लीम पात्राच्या भूमिकेत स्वीकारू शकले नाहीत, असं शबाना यांनी म्हटलं आहे.
लेखकाबद्दलतेजश्री कुलयेतेजश्री कुलये महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये गेल्या एक वर्षापासून ‘कन्सल्टन्ट’ या पदावर कार्यरत आहेत. डिजिटल पत्रकारितेची सुरुवात त्यांनी ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ मधूनच केली. पत्रकारितेचा डिप्लोमा करत असताना त्यांना महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये इंटर्नशिप करण्याची संधी मिळाली. इंटर्नशिप करताना बऱ्याच नव्या गोष्टी शिकायला मिळाल्या. वेब स्टोरी, फोटो गॅलरी करण्यात त्यांचा हातखंडा आहे. चार महिने इंटर्नशिप केल्यानंतर त्यांना महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्येच ‘कन्सल्टन्ट’ म्हणून नेमण्यात आलं.
तेजश्री यांना मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींसोबतच, चालू घडामोडी, क्राईम, राजकीय, फॅशन, या विषयांवर बातम्या लिहिण्याचा अनुभव आहे. वाचकांची दिशाभूल न करता, घडलेली घटना साध्या आणि सोप्या शब्दांत वाचकांपर्यंत कशी पोहोचेल, हाच कायम त्यांचा प्रयत्न असतो. मनोरंजन क्षेत्रातील नवनवीन बदल, गोष्टी जाणून घेण्यासाठी कायम त्यांची धडपड असते. अनेक कलाकारांच्या मुलाखती ऐकून त्याचा ‘सार’ वाचकांपर्यंत पोहोचवण्याचा त्यांचा कायम प्रयत्न असतो. मालिकांची आवड असल्यामुळे त्यातील काही रंजक गोष्टी त्या सोप्या भाषेत वाचकांपर्यंत पोहोचवतात. एखादा सिनेमा किंवा वेब सीरिजवर वाद सुरू असेल तर तेजश्री स्वतः ती कलाकृती पाहून त्यानंतरच त्या विषयावर लेखन करतात.
तेजश्री यांना शाळा शिकत असतानाच मराठी भाषेची गोडी निर्माण झाली, त्यामुळे मराठी भाषेत काहीतरी करायचं, असं त्यांनी शालेय जीवनातच ठरवलं. म्हणूनच त्यांनी ‘मराठी साहित्य’ मध्ये पदवी (BA In Marathi Literature) घेण्याचा निर्णय घेतला. मराठी भाषेचा इतिहास, साहित्यशास्त्र, भाषाविज्ञान या विषयाचा गाढा अभ्यास त्यांनी केला. महाविद्यालयाच्या मासिकासाठी त्यांनी लेखन केलं आहे. ‘मराठी साहित्यात’ पदवी घेत असतानाच नाटक, कविता, कथा, कादंबरी, या कलाकृतींची गोडी अधिकच वाढली. तेजश्री यांनी वझे केळकर महाविद्यालयातून पदवी घेतली आहे. BA In Marathi Literature मध्ये त्यांनी दुसरा क्रमांक मिळवला आहे. पदवीनंतर तेजश्री यांनी CHM महाविद्यालयातून मराठी साहित्यातच पदव्युत्तर (MA In Marathi Literature) शिक्षण घेतलं. त्यावेळीही त्यांनी नाट्यशास्त्र, साहित्यशास्त्र या विषयांचा सखोल अभ्यास केला. महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना पहिली ते पाचवीच्या विद्यार्थ्यांचे क्लासेसही त्यांनी घेतले आहेत.
पदव्युत्तर शिक्षणानंतर तेजश्री यांनी मुंबई विद्यापीठाच्या गरवारे शिक्षण संस्थेतून मराठीमध्ये पत्रकारितेचा डिप्लोमा केला. पत्रकारितेच्या डिप्लोमामध्ये त्यांनी दुसरा क्रमांक पटकवला. पत्रकारितेच्या डिप्लोमानंतर तेजश्री यांचा ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ मध्ये प्रवास सुरू झाला असून त्या रंजक आणि विश्वासार्ह माहिती वाचकांपर्यंत पोहोचवण्याचं काम करत आहेत.… आणखी वाचा