Headlines

Vikram Gaikwad : ‘माझ्यावरही ७५ लाखांचं कर्ज, साडेसातशेमध्ये मांडवली होईल का?’, सुभाष चंद्रा प्रकरणावरून मराठी अभिनेत्याची खोचक पोस्ट


Vikram Gaikwad On Subhash Chandra Loan Case : उद्योगपती सुभाष चंद्रा प्रकरणासंदर्भात मराठी अभिनेते विक्रम गायकवाड यांनी केलेली पोस्ट चर्चेत आली आहे.

Vikram gaikwad post
(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
मुंबई – उद्योगपती सुभाष चंद्रा यांच्या हजारो कोटींच्या कर्ज सेटलमेंट प्रकरणाची सध्या देशभरात जोरदार चर्चा सुरू आहे. या पार्श्वभूमीवर मराठी अभिनेते विक्रम गायकवाड यांनी सोशल मीडियावर एक उपरोधिक पोस्ट शेअर केली आहे. विक्रम यांची ही पोस्ट सोशल मीडियावर व्हयरल होत असून या पोस्टनं नेटकऱ्यांचं लक्ष वेधून घेत आहे.

विक्रम गायकवाड यांची पोस्ट काय आहे?

सोशल मीडियावर सतत सामाजिक व राजकीय घडामोडींवर व्यक्त होणाऱ्या विक्रम गायकवाड यांनी उद्योगपती सुभाष चंद्रा प्रकरणासंदर्भात पोस्ट लिहिली आहे. ‘माझ्यावर पण ७५ लाखांचं कर्ज आहे. साडेसातशेमध्ये मांडवली होईल का? कॅश देतो हवंतर.’ असं विक्रम यांनी पोस्टमध्ये लिहिलंय. तसंच, ‘विचारून बघायला काय हरकत आहे.’ असं या पोस्टला विक्रम यांनी कॅप्शन लिहिलं आहे. विक्रम यांच्या या पोस्टवर कलाकारांनी आणि चाहत्यांनी हसण्याचे इमोजी कमेंट करत पाठिंबा दर्शवला आहे.

Vikram Gaikwad Post

नेमकं काय आहे सुभाष चंद्रा कर्जप्रकरण?

मीडिया क्षेत्रातील दिग्गज आणि ‘झी’ समूहाचे संस्थापक सुभाष चंद्रा यांना नुकताच थकीत कर्जाबाबत राष्ट्रीय कंपनी कायदा न्यायाधिकरणाकडून (NCLT) मोठा दिलासा मिळाला आहे. NCLT ने त्यांच्या वैयक्तिक दिवाळखोरी निराकरण प्रक्रियेत सुमारे २२,००६.५७ कोटी रुपयांच्या मंजूर कर्ज दाव्यांच्या सेटलमेंटसाठी अवघ्या ६.५ कोटी रुपयांच्या परतफेडीची योजना मंजूर केली. इतक्या मोठ्या कर्जाची अवघ्या ६.५ कोटी रुपयांत मांडवली झाल्यानं सर्वसामान्यांमधून आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.

Vandana Gupte Interview : हाताने रिक्षा उलटवली, मराठी मोहीम योग्यच, वंदना गुप्ते यांची बेधडक मुलाखत

विक्रम गायकवाड यांच्या मालिका आणि सिनेमे

दरम्यान, विक्रम गायकवाड सामाजिक आणि राजकीय विषयांवर त्यांचं मत सोशल मीडियावर व्यक्त करत असतात. काही दिवसांपूर्वी लडाखमधील सीजेपी आंदोलनादरम्यान सोनम वांगचुक यांनी केलेल्या उपोषणालाही विक्रम यांनी जाहीर पाठिंबा दिला होता. विक्रम गायकवाड यांच्या कामाबद्दल सांगायचं तर त्यांना ‘उंच माझा झोका’ या लोकप्रिय मालिकेतून ओळख मिळाली. तसेच त्यांनी ‘पावनखिंड’, ‘शेर शिवराज’, ‘लपाछपी’, ‘रघुवीर’ आणि ‘जारण’ यांसारख्या गाजलेल्या चित्रपटांमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका साकारल्या आहेत.

तेजश्री कुलये

लेखकाबद्दलतेजश्री कुलयेतेजश्री कुलये महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये गेल्या एक वर्षापासून ‘कन्सल्टन्ट’ या पदावर कार्यरत आहेत. डिजिटल पत्रकारितेची सुरुवात त्यांनी ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ मधूनच केली. पत्रकारितेचा डिप्लोमा करत असताना त्यांना महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये इंटर्नशिप करण्याची संधी मिळाली. इंटर्नशिप करताना बऱ्याच नव्या गोष्टी शिकायला मिळाल्या. वेब स्टोरी, फोटो गॅलरी करण्यात त्यांचा हातखंडा आहे. चार महिने इंटर्नशिप केल्यानंतर त्यांना महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्येच ‘कन्सल्टन्ट’ म्हणून नेमण्यात आलं.

तेजश्री यांना मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींसोबतच, चालू घडामोडी, क्राईम, राजकीय, फॅशन, या विषयांवर बातम्या लिहिण्याचा अनुभव आहे. वाचकांची दिशाभूल न करता, घडलेली घटना साध्या आणि सोप्या शब्दांत वाचकांपर्यंत कशी पोहोचेल, हाच कायम त्यांचा प्रयत्न असतो. मनोरंजन क्षेत्रातील नवनवीन बदल, गोष्टी जाणून घेण्यासाठी कायम त्यांची धडपड असते. अनेक कलाकारांच्या मुलाखती ऐकून त्याचा ‘सार’ वाचकांपर्यंत पोहोचवण्याचा त्यांचा कायम प्रयत्न असतो. मालिकांची आवड असल्यामुळे त्यातील काही रंजक गोष्टी त्या सोप्या भाषेत वाचकांपर्यंत पोहोचवतात. एखादा सिनेमा किंवा वेब सीरिजवर वाद सुरू असेल तर तेजश्री स्वतः ती कलाकृती पाहून त्यानंतरच त्या विषयावर लेखन करतात.

तेजश्री यांना शाळा शिकत असतानाच मराठी भाषेची गोडी निर्माण झाली, त्यामुळे मराठी भाषेत काहीतरी करायचं, असं त्यांनी शालेय जीवनातच ठरवलं. म्हणूनच त्यांनी ‘मराठी साहित्य’ मध्ये पदवी (BA In Marathi Literature) घेण्याचा निर्णय घेतला. मराठी भाषेचा इतिहास, साहित्यशास्त्र, भाषाविज्ञान या विषयाचा गाढा अभ्यास त्यांनी केला. महाविद्यालयाच्या मासिकासाठी त्यांनी लेखन केलं आहे. ‘मराठी साहित्यात’ पदवी घेत असतानाच नाटक, कविता, कथा, कादंबरी, या कलाकृतींची गोडी अधिकच वाढली. तेजश्री यांनी वझे केळकर महाविद्यालयातून पदवी घेतली आहे. BA In Marathi Literature मध्ये त्यांनी दुसरा क्रमांक मिळवला आहे. पदवीनंतर तेजश्री यांनी CHM महाविद्यालयातून मराठी साहित्यातच पदव्युत्तर (MA In Marathi Literature) शिक्षण घेतलं. त्यावेळीही त्यांनी नाट्यशास्त्र, साहित्यशास्त्र या विषयांचा सखोल अभ्यास केला. महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना पहिली ते पाचवीच्या विद्यार्थ्यांचे क्लासेसही त्यांनी घेतले आहेत.

पदव्युत्तर शिक्षणानंतर तेजश्री यांनी मुंबई विद्यापीठाच्या गरवारे शिक्षण संस्थेतून मराठीमध्ये पत्रकारितेचा डिप्लोमा केला. पत्रकारितेच्या डिप्लोमामध्ये त्यांनी दुसरा क्रमांक पटकवला. पत्रकारितेच्या डिप्लोमानंतर तेजश्री यांचा ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ मध्ये प्रवास सुरू झाला असून त्या रंजक आणि विश्वासार्ह माहिती वाचकांपर्यंत पोहोचवण्याचं काम करत आहेत.आणखी वाचा