Headlines

Progress of Historic Tokekhar-Turumbadi Sea Bridge in Raigad Directly Connecting Murud and Mhasla


रायगडमध्ये मुरुड–म्हसळा तालुके जोडणारा ८०९ कोटींचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प हळूहळू पूर्णत्वास येताना दिसत आहे. या सागली पुलाचं काम पू्र्ण झाल्यास पर्यटन, उद्योग आणि वाहतुकीला नवी दिशा मिळणार आहे.

Raigad News
(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
अमुलकुमार जैन, रायगड : कोकण किनारपट्टीवरील वाहतूक व्यवस्था अधिक गतिमान आणि सुलभ करण्याच्या दृष्टीने उभारण्यात येत असलेल्या टोकेखार–तुरुंबाडी सागरी पुलाचे काम वेगाने प्रगतीपथावर आहे. खाडीतील सुमारे 70 टक्के पिलर्सचे काम पूर्ण झाले आहे. माजी मुख्यमंत्री बॅरिस्टर ए. आर. अंतुले यांनी पाहिलेले कोकणातील सागरी महामार्गाचे स्वप्न आता प्रत्यक्षात उतरत असल्याचे चित्र या प्रकल्पामुळे दिसून येत आहे.

आगरदांडा खाडीवरील टोकेखार–तुरुंबाडी सागरी पूल हा रायगड जिल्ह्यातील अत्यंत महत्त्वाचा पायाभूत सुविधा प्रकल्प मानला जातो. सुमारे ४. ३ किलोमीटर लांबीच्या या पुलामुळे मुरुड आणि म्हसळा हे दोन महत्त्वाचे तालुके थेट जोडले जाणार आहेत. या प्रकल्पासाठी सुमारे ८०९ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. बांधकामाची जबाबदारी एचसीसी इंडिया कंपनीकडे देण्यात आली आहे.

जानेवारी २०२६ पासून पुलाच्या बांधकामाला वेग आला आहे. आता हा पूल प्रत्यक्ष स्वरूपात दिसू लागला आहे. समुद्रातील अनेक पिलर्स उभे करण्यात आले आहेत. त्यावर कॅपिंग बीमचे काम सुरू आहे. खाडीतील सुमारे ७० टक्के पिलर्सचे काम पूर्ण झाल्याने प्रकल्पाच्या प्रगतीबाबत समाधान व्यक्त केले जात आहे.

पुलाच्या दोन्ही बाजूंना ॲप्रोच रस्त्यांचे कामही युद्धपातळीवर सुरू आहे. प्रकल्प नियोजित वेळेत पूर्ण व्हावा यासाठी अतिरिक्त यंत्रसामग्री, तांत्रिक मनुष्यबळ आणि अभियंते तैनात करण्यात आले आहेत. त्यामुळे आगामी काळात या प्रकल्पाची गती आणखी वाढण्याची शक्यता आहे.

हा सागरी पूल पूर्ण झाल्यानंतर मुरुड, म्हसळा, श्रीवर्धन आणि दिघी परिसरातील प्रवास अधिक सुलभ होणार आहे. सध्या खाडीभोवतीचा मोठा वळसा घालावा लागतो किंवा फेरीबोट सेवांवर अवलंबून राहावे लागते. मात्र पूल सुरू झाल्यानंतर प्रवासाचा वेळ आणि अंतर दोन्ही मोठ्या प्रमाणात कमी होणार आहेत.

याचबरोबर दिघी बंदरापर्यंतची मालवाहतूक अधिक जलद आणि कार्यक्षम होईल. त्यामुळे औद्योगिक गुंतवणूक, लॉजिस्टिक्स आणि व्यापार क्षेत्राला मोठी चालना मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. कोकणातील आर्थिक विकासाच्या दृष्टीने हा पूल महत्त्वाचा टप्पा ठरणार आहे.

पर्यटनाच्या दृष्टीनेही या प्रकल्पाचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. ऐतिहासिक जंजिरा आणि पद्मदुर्ग किल्ले, दिवेआगर, हरिहरेश्वर, श्रीवर्धन यांसारख्या प्रसिद्ध पर्यटनस्थळांपर्यंत पोहोचणे अधिक सोपे होणार आहे. त्यामुळे पर्यटकांची संख्या वाढून हॉटेल, होमस्टे, रेस्टॉरंट, वाहतूक आणि मत्स्य व्यवसायाला मोठा लाभ मिळण्याची शक्यता आहे.

रेवस ते रेड्डी या प्रस्तावित किनारी महामार्गाच्या दृष्टीनेही टोकेखार–तुरुंबाडी पूल हा महत्त्वाचा दुवा ठरणार आहे. कोकण किनारपट्टीवरील सलग आणि वेगवान वाहतूक साखळी निर्माण करण्यासाठी हा प्रकल्प अत्यंत उपयुक्त मानला जात आहे.

दरम्यान, या प्रकल्पासाठी जमीन अधिग्रहित केलेल्या शेतकरी कुटुंबांतील बेरोजगार तरुणांना प्राधान्याने रोजगार उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून करण्यात येत आहे. विकासासोबत स्थानिकांना रोजगाराच्या संधी मिळाल्यास या प्रकल्पाचा लाभ अधिक व्यापक स्वरूपात समाजापर्यंत पोहोचेल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

चेतन पाटील

लेखकाबद्दलचेतन पाटीलचेतन पाटील महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये डिजीटल कंटेट प्रोड्यूसर म्हणून कार्यरत आहेत. ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन इथे सेकंड शिफ्ट इंचार्ज म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. महाराष्ट्र, देश, विदेश, राजकीय, क्रीडा, मनोरंजन अशा विविध बीटच्या बातम्या लिहिण्याचा त्यांना अनुभव आहे. एखादी मोठी बातमी कमी वेळात सर्वात आधी ब्रेक करण्याचं त्यांचं कसब आहे. ब्रेकिंग आणि महत्त्वाच्या बातम्या कमी वेळात लिहून ते अपलोड करण्यात ते पारंगत आहेत. पण कुठलीही बातमी ब्रेक करताना तिची सत्यता पडताळणी केल्याशिवाय ते ती बातमी पुढे जाऊ देत नाहीत. पत्रकार म्हणून त्या बातमीची शहानिशा करणं ही आपली प्राथमिक जबाबदारी असल्याचं चेतन पाटील मानतात.

डिजीटल पत्रकारितेच्या या अवाढव्य मोठ्या विश्वावात पत्रकाराने एक माणूस म्हणून योग्य जबाबदारी पार पाडणं जास्त आवश्यक आहे. त्यामुळे केवळ क्लिकबेट हेडिंग करुन वाचकांची दिशाभूल न करता पत्रकारितेचं नैतिक मूल्य अंगीकारण्यावर त्यांचा भर असतो. त्यामुळे कोरोना संकट काळ असले, विधानसभा, लोकसभा किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा काळ असेल, एकनाथ शिंदे यांचं शिवसेनेतील बंड असेल, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांचा न्यायालयीन खटला असेल, भारत-पाकिस्तान युद्धजन्य स्थिती असेल, भारत-चीन सीमेवरील गलवान खोऱ्यातील संघर्ष असेल, दिल्लीच्या सीमेवरील शेतकऱ्यांचं आंदोलन असेल, त्यानंतर शेतकऱ्यांच्या आंदोलनाला आलेलं हिंसक वळण असेल, महाराष्ट्रात मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांचं आंदोलन असेल, मराठा आरक्षणाचे आंदोलन असेल, कष्टकरी आणि शेतकऱ्यांची विविध आंदोलने असतील, विविध सामाजिक आणि राजकीय घटना असतील, ते त्या घटनांचं वृत्तांकन करताना पत्रकारितेच्या नैतिक मुल्यांचं अतिशय काटेकोरपणे पालन करण्याचा प्रयत्न करतात.

चेतन पाटील यांना पत्रकारितेत जवळपास 9 वर्षांचा अनुभव आहे. पत्रकारितेचं पदवी शिक्षण घेत अतानाच त्यांना भिवंडी महापालिका निवडणूक काळात एका पॉलिटीकल पीआर कंपनीसोबत काम केल्याचा अनुभव आहे. त्यानंतर लोकमत, न्यूज 24, जय महाराष्ट्र, आपलं महानगर, न्यूज 18 लोकमत, टीव्ही 9 मराठी अशा नामांकीत वृत्त संस्थांमध्ये काम केल्याचा अनुभव आहे. आपलं महानगरमध्ये काम करत असताना त्यांनी यूट्यूबवर आयपीएलच्या मोसमात महिनाभर विश्लेषणाचे व्हिडीओ बनवले होते. तसेच ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन इथेदेखील विविध राजकीय घडामोडींचे विश्लेषण करणारे व्हिडीओ बनवत असतात.

चेतन पाटील यांनी लिहिलेल्या अनेक बातम्यांचा पॉझिटिव्ह इम्पॅक्ट झाला आहे. त्यांच्या एका बातमीमुळे धुळे बस स्टॅण्डवर फिरणाऱ्या एका निराधार वृद्ध महिलेला खूप मोठी मदत झाली होती. महाविकास आघाडी सरकारने सीबीएसई आणि आयसीएसई बोर्डातील शाळांमध्ये मराठी भाषेचं शिक्षण सक्तीचं केलं होतं. पण कोरोना काळानंतर अचानक या निर्णयावर घुमजाव केल्याचं बघायला मिळालं होतं. त्यावेळी चेतन पाटील यांनी ‘आपुल्याच घरात हाल सोसते मराठी’ या मथळ्याखाली बातमी लाहिली होती. ही बातमी महाराष्ट्र एकीकरण समितीने रिट्विट करत मोठा मुद्दा उपस्थित केला होता. अखेर या मुद्द्यावरुन वातावरण तापल्यानंतर तत्कालीन शालेय शिक्षण मंत्र्यांना यावर स्पष्टीकरण द्यावं लागलं होतं. निर्णय मागे घेतला नसून काही वर्ष मराठी भाषेचे श्रेणीतून गुण दिले जातील, असं त्यांनी स्पष्ट केलं होतं. जीआर काढताना अधिकाऱ्यांकडून चूक झाल्याचं त्यांनी स्पष्ट केलं होतं.

चेतन पाटील यांनी लिहिलेल्या बातमीमुळे गडचिरोली येथील सीमाभागातील स्थानिक नागरिकांचा पाण्याचा प्रश्न सुटला होता. त्या भागातील स्थानिकांना पिण्याचं पाणी आणण्यासाठी खूप पायपीट करावी लागत होती. चेतन पाटील यांना स्थानिक पत्रकारांनी या घटनेची माहिती दिल्यानंतर त्यांनी खोलवर सविस्तर विषयाची माहिती गोळा करत बातमी केली होती. त्यांच्या या बातमीची दखल तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी घेतली होती. विशेष म्हणजे बातमी प्रकाशित केल्यानंतर अवघ्या 15 दिवसांनी त्या भागातील नागरिकांच्या पाण्याचा प्रश्न सुटल्याची बातमी चेतन पाटील यांनी केली होती.

चेतन पाटील यांनी कल्याणच्या नामांकीत बिर्ला महाविद्यालयातून BMM (Bachelor Of Mass Media in Journalism) म्हणजेच पत्रकारितेतून पदवी शिक्षण घेतलं आहे. त्याआधी त्यांचं दहावीपर्यंतचं शिक्षण हे कल्याणच्या रॉयल हायस्कूल इथे झालं आहे. शालेय जीवनात त्यांना मराठी, हिंदी आणि गणित विषयाची विशेष गोडी होती. त्यांना लहानपणापासून कविता वाचनाचा छंद होता. त्यांनी अकरावी आणि बारावीचं शिक्षण हे विज्ञान शाखेतून केलं. पण बारावीनंतर त्यांना पत्रकारितेची वाट खुणावू लागली. त्यामुळे त्यांनी कल्याणच्या बिर्ला महाविद्यालयातून पत्रकारितेतून पदवी शिक्षण घेतलं.

महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना त्यांनी विविध उपक्रमांमध्ये भाग घेतला आहे. त्यांना नाट्य आणि चित्रपट क्षेत्राविषयी नेहमीच आकर्षण राहिलं आहे. त्यामुळे त्यांनी महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना जलरंग तापी नाट्य संस्थेसोबत अहिराणी आणि मराठी नाटकांमध्ये काम केलं आहे. त्यांनी राज्य नाट्य स्पर्धेत सहभाग घेतला आहे. त्यांनी ‘नटसम्राट’ नाटकात केलेल्या बूट पॉलिश करणाऱ्या राजाची भूमिका खूप गाजली होती. त्यावेळी त्यांच्या अभिनयाचं खूप कौतुक झालं होतं.

चेतन पाटील यांना कविता लिहिण्याचा आणि त्या सादर करण्याचा देखील छंद आहे. तसेच ज्येष्ठ आणि दिग्गज कवींच्या गाजलेल्या कविता सादर करण्याची देखील त्यांना आवड आहे. चेतन पाटील यांनी लिहिलेल्या ‘भगतसिंग’ कवितेची निवड ही ८९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात कवी कट्टा कार्यक्रमात वाचनासाठी झाली होती. चेतन पाटील यांचं आतापर्यंतचं आयुष्य खूप संघर्षमय आणि खडतर असल्यामुळे ते फार संवेदनशील आहेत. त्यामुळे संवेदनशील बातम्या हाताळताना ते अशा बातम्यांना न्याय देण्याचा पूरेपूर प्रयत्न करतात.आणखी वाचा