Indian Cricketers : भारताचे 3 असे क्रिकेटर ज्यांनी आपल्या मित्राच्या बहिणींसोबतच केलेय लग्न, रोहित शर्माचाही समावेश – indian cricketers wedding his friend sisters rohit shrma ajit agarkar and gundappa viswanath
Indian Cricketers : भारताचे 3 असे क्रिकेटर ज्यांनी आपल्या मित्राच्या बहिणींसोबतच केलेय लग्न, रोहित शर्माचाही समावेश – indian cricketers wedding his friend sisters rohit shrma ajit agarkar and gundappa viswanath
Indian Cricketers Wedding his friend sisters : क्रिकेटच्या मैदानात एकत्र खेळलेले अनेक खेळाडू एकमेकांचे नातेवाईक झाले आहेत. यामध्ये भारताचे असे काही खेळाडू ज्यांनी आपल्या मित्राच्या बहिणीसोबतच लग्न केले. या यादीत शेवटचे नाव ज्या खेळाडूचे आहे ते कदाचित तुम्हाला माहिती नसेल, कोण-कोण आहेत ते खेळाडू जाणून घ्या.
(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
मुंबई : क्रिकेटच्या मैदानात खेळताना खेळाडूंची झालेली मैत्री पुढे नात्यात बदलली. काही खेळाडूंनी मित्राच्या बहिणीसोबतच लग्न केले. अनेक खेळाडू आहेत जे देशासाठी एकत्र खेळले आणि पुढे एकमेकांचे नातेवाईक झाले. यामध्ये भारताच्या आजी-माजी खेळाडूंचाही समावेश आहे. या यादीमधील एक नाव असे आहे ज्यावर तुम्हाला विश्वास बसणार नाही.
भारताचे माजी खेळाडू सुनील गावसकर ज्यांना लिटल मास्टर म्हणूनही ओळखलं जातं. सुनील गावसकर यांची लहान बहिण कविता यांचा विवाह माजी खेळाडू गुंडप्पा विश्वनाथ यांच्याशी झाला होता. गावसकर आणि विश्वनाथ हे दोघेही १९७०-७१ मध्ये एकत्र वेस्ट इंडिज दौऱ्यावर होते. त्यावेळी एकाच रूममध्ये राहिले होते, तिकडून आल्यावर गावसकर यांनी विश्वनाथ यांना आपल्या घरी बोलवले होते. घरी आल्यावर गावसकर यांची लहान बहिण (कविता) गुंडप्पा विश्वनाथ यांनी पाहताच क्षणी आवडली होती. मात्र त्यावेळी कविता या १८ वर्षांच्या होत्या. त्यानंतर त्यांनी वाट पाहिली आणि योग्य वेळी गावसकर यांच्या घरी जात कविता यांच्यासंदर्भात बोलणी केली त्यानंतर दोन्ही परिवारांनी विवाह केला.
Women Asia Cup Schedule 2026 : महिला आशिया कपला आजपासून सुरूवात, भारत वि. पाकिस्तान सामना केव्हा? संपूर्ण शेड्यूल जाणून घ्याभारताचा स्टार खेळाडू रोहित शर्मा ज्याला हिटमॅनही म्हणून ओळखलं जातं. रोहित शर्माने २०१५ मध्ये रितीका सजदेहसोबत विवाह केला होता. पण तुम्हाला माहिती का? रितीका ही माजी खेळाडू युवराज सिंग याची मानलेली बहिण आहे. स्वत: रोहित शर्माने सांगितलेलं की एका शुटवर गेलेला तेव्हा तो युवराजला भेटायला गेल्यावर त्यावेळी रितीका तिथेच बसलेल होती. युवराजने आधीच सांगितलं माझी बहिण आहे, तिच्याकडे पाहुपण नकोस. मी सर्व शूट होईपर्यंत तिच्याकडे रागाने पाहत होतो की कोण आहे ही इतकी, पण काही वेळाने शुटदरम्यान मी खाली गेलो तर रितिका म्हणाली की, तुला काही मदत लागत असेल तर सांग. तिथूनच दोघांची जवळीक वाढली आणि काही वर्षांनी पुढे विवाहही केला.
Devdutt Padikkal Jersey : बाप रे, हे काय! देवदत्त पडिक्कलच्या अंगावर उमटला पाठीवरच्या जर्सीचा टॅटू; फोटो तुफान व्हायरल आताचे भारतीय क्रिकेट निवड समितीचे अध्यक्ष अजित आगरकर यांनीही त्यांचे मित्र मुंबईसाठी खेळणाऱ्या मजहर यांच्या बहिणीसोबत विवाह केला आहे. १९९९ मध्ये मजहर यांच्या बहिणीसोबत (फातिमा) एका मॅचवेळी ओळख झाली. अनेक मॅचेसदरम्यान या भेटी वाढल्या आणि दोघांमधील मैत्री वाढली. या मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले पण आगरकर हे ब्राह्मण समाजाचे आणि फातिमा या मुस्लिम समाजाच्या असल्याने दोघांच्या कुटुंबियांनी विरोध केलेला. पण त्यांनी हार मानली नाही आणि आपल्या कुटुंबियांना समजावलं आणि २००२ मध्ये दोघांनी लग्न केले.
लेखकाबद्दलहरिश मालुसरे हरिश मालुसरे, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये एक्झिक्युटिव्ह कंटेंट प्रॉड्युसर म्हणून कार्यरत आहेत. ते २०२४ पासून मटा ऑनलाइनसोबत जोडले गेले आहेत. गेली सात वर्षे ते विविध मीडिया समूहांमध्ये काम करत आहेत. त्यांना स्पोर्ट्स, क्राइम आणि राजकीय बातम्यांमध्ये विशेष रुची आहे.
पत्रकारितेमधील अनुभव
पुण्यात पत्रकारितेचे शिक्षण घेत असताना झी २४ तास आणि सकाळ या माध्यम समूहांमध्ये इंटर्नशीप केली होती. त्यानंतर मास मीडियाच्या शेवटच्या वर्षाला असताना ‘थोडक्यात’ या वेब पोर्टलमध्ये इंटर्न म्हणून काम केले आहे. त्यानंतर थोडक्यात मध्येच नोकरीची संधी मिळाली, तिथेच काही दिवसांनी शिफ्ट इंचार्ज म्हणून जबाबादारी सांभाळली. यादरम्यान लोकसभा आणि विधानसभा २०१९ निवडणुकांचे टेक्स्ट बातम्यांमधून वार्तांकन केले. मराठी चित्रपटसृष्टीतील ‘श्रीराम समर्थ’ या चित्रपटातील संत रामदासांची भूमिका साकारणारे मराठी अभिनेते शंतून मोघे यांची छोटेखानी मुलाखत घेतली. (लिंक : https://youtu.be/-wsyyekJ-DE?si=SaJ_OC9nUgLFmKXK)
‘थोडक्यात’ नंतर सकाळ डीजिटलमध्ये सोशल मीडिया एक्सेक्युटिव्ह म्हणून काम पाहिले आहे, त्यावेळी टी-२० वर्ल्ड कपचे लाईव्ह करत क्रीडाप्रेमींना माहिती दिली. त्यानंतर ‘पोलीसनामा’मध्ये काम करत असताना सीडीआर वाचून समजून घेत अनेक स्टोरी साध्या आणि सोप्या शब्दात बातमी लेखन केले. यादरम्यान कॉलेज पूर्ण झाल्यावर झी २४ तासमध्ये संधी मिळाली, मुंबईत झी २४ तासमध्ये महाराष्ट्र केसरी कु्स्ती स्पर्धेवर विशेष स्टोरी केल्या आहेत. टीव्ही९ मराठीमध्ये Sub-Editor, Social Media Executive म्हणून काम पाहिले आहे. त्यानंतर २०२४ मध्ये महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये जॉइन झाले.
महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये महाराष्ट्र, क्राइम आणि स्पोर्ट्स या तिन्ही सेक्शनमध्ये ट्रेंडनुसार बातमी लेखन करतात. आता पार पडलेल्या विधानसभा निवडणूक आणि निकालांचे कव्हरेज बातम्यांच्या माध्यमातून केले. महापालिका निवडणुकांमध्ये मुंबई, पुणे आणि पिंपरी चिंचवड आणि कोल्हापूर या महत्त्वाच्या जिल्ह्यांचे स्थानिक पातळीवर भागानुसार सविस्तर वार्तांकन केले आहे. महापालिका निवडणुकीमध्ये सायली वांजळे यांची मुलाखत घेतली होती. लिंक: https://youtu.be/Wejw-eMnXqI?si=jyeD36tRboIc9bpJ. त्यासोबतच आता टी-२० वर्ल्ड कप २०२६ चे कव्हरेज पाहत आहेत.
शैक्षणिक पात्रता
हरीश मालुसरे यांचे पदवीपर्यंतचे शिक्षण पुणे जिल्ह्यातील नामांकित आबासाहेब गरवारे महाविद्यालयातून झाले आहे. तिथूनच 2022 साली एम. ए. जर्नलिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण पूर्ण केले. त्यांचे मराठी हिंदी आणि इंग्रजी भाषेवर प्रभुत्व असून डिजिटल पत्रकारितेतील सातहून अधिक वर्षांचा अनुभव आहे.… आणखी वाचा