Headlines

Chhatrapati Sambhajinagar Jalna Legislative Council Election Results BJP Suhas Shirsath Won by 455 Votes; भाजपकडून अंबादास दानवेंना ‘दे धक्का’, छ. संभाजीनगर-जालना विधान परिषद निवडणुकीत सुहास शिरसाठांची बाजी; कुणाला किती मते मिळाली?


Chhatrapati Sambhajinagar Legislative Council Election Suhas Shirsath Win : छत्रपती संभाजीनगर विधान परिषद निवडणुकीत महायुतीचे उमेदवार सुहास शिरसाठ यांचा विजय झाला आहे.

Chhatrapati Sambhajinagar Legislative Council Election Suhas Shirsath Win
विधान परिषद निकाल सुहास शिरसाठ विजयी(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
सुशील राऊत, छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगर आणि जालना विधान परिषद निवडणुकीचे निकाल समोर आले आहेत. यात महायुतीचे उमेदवार सुहास शिरसाठ यांना पहिला पसंतीच्या मतांमध्ये 455 मते मिळाली आहेत. तर महाविकास आघाडीचे उमेदवार गणेश लोखंडे यांना 134 मते मिळाली आहेत. यामुळे महायुतीचे उमेदवार सुहास शिरसाठ हे विजयी झाले असून आता फक्त अधिकृत घोषणा होण्याची औपचारिकता बाकी आहे.

शिरसाठांचा दणदणीत विजय

विधान परिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीमध्ये मराठवाड्यात महायुतीचा झेंडा उंचावला आहे. छत्रपती संभाजीनगर-जालना विधान परिषद निवडणुकीमध्ये भाजपचे सुहास शिरसाठ यांचा दणदणीत विजय झाला आहे. त्यांना 455 मते मिळाली आहेत. या निवडणुकीमध्ये शिवसेनेच्या ठाकरे गटाचे गणेश लोखंडे यांना 134 मते मिळाली. तर अपक्ष उमेदवार इसाक संदूक खान यांना 35 मते मिळाली. अद्याप अधिकृत घोषणा होणे बाकी आहे. या विधान परिषद निवडणुकीमध्ये 637 मतदारांपैकी 630 मतदारांनी मतदान केले होते. आज सकाळी मतमोजणीला सुरुवात झाली. त्यात पाच मते बाद झाली, त्यांना वगळता 313 मतदान घेणारा उमेदवार विजयी ठरणार होता. त्यामुळे सुहास शिरसाठ यांनी विजय मिळवला.
Maharashtra TimesVidhan Parishad Election 2026 Result : रेश्मा काळेंची माघार पथ्यावर, जळगावात भाजपच्या महाजनांचा एकतर्फी विजय, पहिल्याच फेरीत विजयाचा आकडा गाठला

महत्त्वाची पदे आपल्याकडे ठेवली

छत्रपती संभाजीनगर-जालना स्थानिक स्वराज्य संस्था विधान परिषद मतदारसंघाची जागा महायुतीने राखली असून पूर्वी ही जागा शिवसेनेकडे होती. 2018 मध्ये झालेल्या निवडणुकीत शिवसेना-भाजप युतीकडून अंबादास दानवे यांनी विक्रमी मताधिक्यांनी विजय मिळवला होता. ही जागा शिवसेनेकडेच राहावी यासाठी स्थानिक नेत्यांनी जोर लावला होता. परंतु नुकत्याच झालेल्या जिल्हा परिषद, महापालिका, नगरपालिका आणि नगरपंचायत निवडणुकीत भाजपने या दोन्ही जिल्ह्यांमध्ये शिवसेनेला संख्याबळाच्या बाबतीत मागे टाकले होते.
Maharashtra TimesNashik Gokul Gite : अखेर फैसला झाला, आमदारकीची माळ गोकुळ गितेंच्या गळ्यात; जिंकताच एकनाथ शिंदेंचा कॉल

जालना महानगरपालिका भाजपने स्वबळावर लढत तिथे महापौर, उपमहापौर सभापती अशी सगळीच महत्त्वाची पदे आपल्याकडे ठेवली होती. हीच परिस्थिती छत्रपती संभाजीनगरमध्ये देखील पाहायला मिळाली. जालन्याप्रमाणेच संभाजीनगर महापालिकेची निवडणूकही भाजपने शिवसेनेशी युती न करता स्वबळावर लढवली होती. सत्ता स्थापनेच्यावेळी भाजपने 13 नगरसेवक असलेल्या शिवसेनेला सोबत घेत उपमहापौर पद दिले. मात्र, महापौर आणि स्थायी समिती सभापती पद आपल्याकडेच ठेवले.

प्रशांत पाटील

लेखकाबद्दलप्रशांत पाटीलप्रशांत पाटील ‘महाराष्ट्र टाईम्स ऑनलाईन'(TIL) या आघाडीच्या डिजिटल माध्यम समूहात सीनियर डिजिटल कंन्टेट प्रोड्युसर पदावर कार्यरत आहेत. पुणे जिल्ह्यातील नामांकित ‘थोडक्यात’ न्यूज वेब पोर्टल, हैदराबादमधील ‘आधान शॉर्ट न्यूज अॅप’, ‘सकाळ मिडिया ग्रुप’ आणि आता ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’, असा जवळपास पाच ते साडेपाच वर्षांपेक्षा अधिक काळ ते कार्यरत आहेत. प्रशांत पाटील यांना महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील सर्व गुन्हेगारी, अपघात, शेतकरी विषयक बातम्या, ग्रामीण भागात यश संपादन केलेल्या तरुणी किंवा तरुणांच्या सक्सेस स्टोरीज् आणि महाराष्ट्र हायपर लोकल अशा विविध विषयांची आवड आहे. ऑगस्ट (2026) पासून ‘महाराष्ट्र टाईम्स ऑनलाईन’साठी (TIL) काम करत आहेत. या दरम्यान, राज्यातील विधानसभा, लोकसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकींच्या बातम्यांवर विशेष लक्ष ठेवतात. याआधीही त्यांनी याच माध्यम समूहासोबत तीन वर्ष काम केलं आहे.

प्रशांत पाटील यांनी पुण्यातील नामांकित आबासाहेब गरवारे महाविद्यालयातून मास कम्युनिकेशन विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. शिक्षण घेत असतानाच त्यांनी ‘थोडक्यात’ या न्यूज वेब पोर्टलला काम केलं. तिथे डिजिटल माध्यमासाठी लेखन करत असताना त्यांना डिजिटल क्षेत्रातलं कसं काम करतात? हे यश संपादन केलं. त्यानंतर त्यांना मुंबईत ‘महाराष्ट्र टाइम्य ऑनलाईन’ (TIL) या नामांकित माध्यम समूहामध्ये काम करण्याची संधी मिळाली. 28 मार्च 2022 रोजी ते ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ या मोठ्या ब्रँण्डसोबत पहिल्यांदा जोडले गेले. तिथे त्यांनी प्रदीर्घ काळ म्हणजे तीन वर्ष डिजिटल विभागात काम केलं. त्यांनतर त्यांनी फेब्रुवारी 2025 ला ‘सकाळ मिडिया ग्रुप’ला काम करण्याची संधी मिळाली. परंतु तिथे ते काम करत असताना त्यांना पुन्हा ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ (TIL) या माध्यम समूहाने संधी दिली. त्यानंतर ऑगस्ट 2026 पासून प्रशांत पाटील हे ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’सोबत (TIL) काम करताय.

‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’मध्ये (TIL) काम करताना त्यांना खूप मोठमोठ्या संध्या मिळाल्या. जसे की, व्हिडिओ करणे, महाराष्ट्रातील संपूर्ण जिल्ह्यातील रिपोर्टर यांच्याशी समन्वय साधणे, जिल्हा प्रतिनिधींकडून वेळोवेळी काम करुन घेणे, विशेष आणि काही महत्वाच्या बातम्या मागवून घेणे, अशा बऱ्याच गोष्टींची त्यांना इथे मिळाली. प्रशांत पाटील हे सकाळच्या शिफ्टला काम करत असताना लाईव्ह ब्लॉग, रिपोर्टरशी बोलणे, ब्रेकिंग बातम्या, हायपर लोकल बातम्या, ग्रामीण भागातील सर्व घडामोडींकडे लक्ष देण्याचं काम ते करतात.आणखी वाचा