Maharashtra Weather Update 28th August Marathwada Vidarbha likely to Less but expected Heavy Rain in Konkan for Next Five Days; महाराष्ट्रात पुन्हा हवा बदलली! मराठवाड्यासह विदर्भात मान्सूनचा जोर कमी, कोकणात धो-धो बरसणार, हवामान विभागाचे ताजे अपडेट्स
Maharashtra Weather Update 28th August Marathwada Vidarbha likely to Less but expected Heavy Rain in Konkan for Next Five Days; महाराष्ट्रात पुन्हा हवा बदलली! मराठवाड्यासह विदर्भात मान्सूनचा जोर कमी, कोकणात धो-धो बरसणार, हवामान विभागाचे ताजे अपडेट्स
Maharashtra Weather Update : कोकणात पुढील पाच दिवस मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तर मराठवाडा आणि विदर्भात मान्सूनचा जोर कमी असणार आहे.
महाराष्ट्र मान्सून अंदाज(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
पुणे : मराठवाडा आणि विदर्भात मान्सूनचा जोर सध्या कमी झाला आहे. पण कोकणात मात्र चांगला पाऊस होणार आहे. मागच्या काही दिवसांपासून ऊन पावसाचा खेळ सुरू होता. तसेच मुंबईसह उपनगरात आज मुसळधार पावसाच्या सरी बरसल्या आहेत. कोकणात मात्र पुढचे पाच दिवस मुसळधार पाऊस होणार आहे. हवामान विभागानं दिलेल्या अंदाजानुसार कोकणात 28 ऑगस्ट ते 2 सप्टेंबर दरम्यान मुसळधार पाऊस असणार आहे.
बंगालच्या खाडीत नवीन वातावरण तयार
उत्तर कोकणात सुरुवातीला पावसाचा जोर जास्त राहील नंतर कमी होणार असल्याचं सांगण्यात आलं आहे. मध्य महाराष्ट्र ात पुढचे पाच दिवस ऊन पाऊस असा खेळ पाहायला मिळण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. कमी दाबाचा पट्टा पूर्व उत्तर प्रदेशजवळ तयार झाला आहे. मात्र, त्याचा दबाव हळूहळू कमी होताना दिसत आहे. पश्चिमेकडून येणाऱ्या वाऱ्यांमुळे कमी दाबाचा पट्टा कमी झाला आहे. बंगालच्या खाडीत नवीन वातावरण तयार झालं आहे. ते कमी दाबाच्या पट्ट्यात बदलणार का? हे पुढचे काही दिवस पाहावं लागेल, असं स्कायमेट हवामान तज्ज्ञ महेश पलावत यांनी म्हटलं आहे. याचा परिणाम विदर्भावर होणार असून तिथे पाऊस राहण्याची शक्यता आहे. उत्तर महाराष्ट्र आणि मध्य महाराष्ट्रातील बराच भाग कोरडा राहण्याची शक्यता आहे. मुंबईसह उर्वरित कोकणात ऊन पाऊस राहणार आहे.
विदर्भात पाऊस तीन चार दिवस राहील त्यानंतर पुन्हा उष्णता वाढणार आहे. केरळ आणि कर्नाटकाच्या काही भागांमध्ये मान्सून पुन्हा परतण्याची शक्यता आहे. उत्तरेकडे मान्सून हळूहळू शुष्क होऊन कोरडं हवामान राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे आता टेन्शन वाढलं आहे. पाऊस पडला नाही तर शेतकऱ्यांवर मोठं संकट उभं राहणार आहे. ऑगस्ट अखेर ते सप्टेंबरचा पहिला आठवडा हा पूर्व भारत, मध्य प्रदेशचा पूर्व भाग, छत्तीसगड आणि ईशान्येकडील राज्यात सरासरीपेक्षा चांगला पाऊस होईल. दुसरीकडे महाराष्ट्र, दक्षिण भारत, पश्चिम मध्य प्रदेश, पूर्व राजस्थान आणि पश्चिम उत्तर प्रदेशात सरासरीपेक्षा कमी पावसाची शक्यता आहे. दुसऱ्या आठवड्यात पूर्व भारत, छत्तीसगड, मणिपूरसोबतच कोकण-गोवा भागात पावसाचा जोर वाढून तो सरासरीपेक्षा जास्त राहील. दक्षिण भारतात पावसाची तूट कायम राहील.
लेखकाबद्दलप्रशांत पाटीलप्रशांत पाटील ‘महाराष्ट्र टाईम्स ऑनलाईन'(TIL) या आघाडीच्या डिजिटल माध्यम समूहात सीनियर डिजिटल कंन्टेट प्रोड्युसर पदावर कार्यरत आहेत. पुणे जिल्ह्यातील नामांकित ‘थोडक्यात’ न्यूज वेब पोर्टल, हैदराबादमधील ‘आधान शॉर्ट न्यूज अॅप’, ‘सकाळ मिडिया ग्रुप’ आणि आता ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’, असा जवळपास पाच ते साडेपाच वर्षांपेक्षा अधिक काळ ते कार्यरत आहेत. प्रशांत पाटील यांना महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील सर्व गुन्हेगारी, अपघात, शेतकरी विषयक बातम्या, ग्रामीण भागात यश संपादन केलेल्या तरुणी किंवा तरुणांच्या सक्सेस स्टोरीज् आणि महाराष्ट्र हायपर लोकल अशा विविध विषयांची आवड आहे. ऑगस्ट (2026) पासून ‘महाराष्ट्र टाईम्स ऑनलाईन’साठी (TIL) काम करत आहेत. या दरम्यान, राज्यातील विधानसभा, लोकसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकींच्या बातम्यांवर विशेष लक्ष ठेवतात. याआधीही त्यांनी याच माध्यम समूहासोबत तीन वर्ष काम केलं आहे.
प्रशांत पाटील यांनी पुण्यातील नामांकित आबासाहेब गरवारे महाविद्यालयातून मास कम्युनिकेशन विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. शिक्षण घेत असतानाच त्यांनी ‘थोडक्यात’ या न्यूज वेब पोर्टलला काम केलं. तिथे डिजिटल माध्यमासाठी लेखन करत असताना त्यांना डिजिटल क्षेत्रातलं कसं काम करतात? हे यश संपादन केलं. त्यानंतर त्यांना मुंबईत ‘महाराष्ट्र टाइम्य ऑनलाईन’ (TIL) या नामांकित माध्यम समूहामध्ये काम करण्याची संधी मिळाली. 28 मार्च 2022 रोजी ते ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ या मोठ्या ब्रँण्डसोबत पहिल्यांदा जोडले गेले. तिथे त्यांनी प्रदीर्घ काळ म्हणजे तीन वर्ष डिजिटल विभागात काम केलं. त्यांनतर त्यांनी फेब्रुवारी 2025 ला ‘सकाळ मिडिया ग्रुप’ला काम करण्याची संधी मिळाली. परंतु तिथे ते काम करत असताना त्यांना पुन्हा ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ (TIL) या माध्यम समूहाने संधी दिली. त्यानंतर ऑगस्ट 2026 पासून प्रशांत पाटील हे ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’सोबत (TIL) काम करताय.
‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’मध्ये (TIL) काम करताना त्यांना खूप मोठमोठ्या संध्या मिळाल्या. जसे की, व्हिडिओ करणे, महाराष्ट्रातील संपूर्ण जिल्ह्यातील रिपोर्टर यांच्याशी समन्वय साधणे, जिल्हा प्रतिनिधींकडून वेळोवेळी काम करुन घेणे, विशेष आणि काही महत्वाच्या बातम्या मागवून घेणे, अशा बऱ्याच गोष्टींची त्यांना इथे मिळाली. प्रशांत पाटील हे सकाळच्या शिफ्टला काम करत असताना लाईव्ह ब्लॉग, रिपोर्टरशी बोलणे, ब्रेकिंग बातम्या, हायपर लोकल बातम्या, ग्रामीण भागातील सर्व घडामोडींकडे लक्ष देण्याचं काम ते करतात.… आणखी वाचा