Headlines

Sanjay Raut Attacks Amit Shah Over Marathi Language Auto Rickshaw Policy


रिक्षा आणि टॅक्सी चालकांना मराठी भाषा शिकण्यासाठी राज्य सरकारने एक वर्षाची मुदत दिल्यानंतर राजकीय वातावरण तापले आहे. या निर्णयावरून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते संजय राऊत यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आण

.

मराठीची मोहीम केराच्या टोपलीत

संजय राऊत म्हणाले की, “एकनाथ शिंदे नेहमी बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांच्या गोष्टी करतात, त्यांनी आता यावर बोलायला पाहिजे. रिक्षाचालकांसाठी मराठीची जी मोहीम चालवली होती, ती अखेर अमित शाहांनी केराच्या टोपलीत टाकली. या निर्णयावर शिंदे किंवा परिवहन मंत्री तोंड उघडत नाहीत, हे दुर्दैव आहे.

‘रिक्षाचालकांना मराठी आलीच पाहिजे’

मराठी भाषेचा मुद्दा हा केवळ राजकीय नसून महाराष्ट्राच्या अस्मितेशी संबंधित असल्याचे राऊत म्हणाले. प्रत्येक राज्यात त्या राज्याची स्थानिक भाषा काम करणाऱ्या प्रत्येकाला आली पाहिजे. कॉर्पोरेट क्षेत्रातील वरिष्ठ अधिकारी असो किंवा सामान्य कामगार, स्थानिक भाषा शिकणे आवश्यक आहे. रिक्षा आणि टॅक्सी चालकांचा दररोज जनतेशी थेट संपर्क येत असल्याने त्यांना मराठी आलीच पाहिजे, असे त्यांनी स्पष्ट केले.

‘दिल्लीतून आदेश येईल, याची आम्हाला खात्री होती’

मराठी भाषा शिकण्याची मोहीम सुरू झाल्यापासून त्यावर आपण लक्ष ठेवून होतो. ही मोहीम सरकार किती पुढे नेते, याकडे आमचे लक्ष होते. मात्र दिल्लीतून एक आदेश येईल आणि सरकार माघार घेईल, याची आम्हाला आधीपासूनच खात्री होती, असा दावा राऊत यांनी केला. मुख्यमंत्र्यांचा निर्णय शिंदे गटाला मान्य आहे, असे ऐकायला मिळत असल्याचे सांगत, मोहीम सुरू करण्यापूर्वी मुख्यमंत्र्यांशी चर्चा झाली होती का, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.

‘हा निर्णय मराठी माणसासाठी नाही’

राज्य सरकारने घेतलेला एक वर्षाची मुदतवाढ देण्याचा निर्णय मराठी माणसाच्या हितासाठी नसून राज्यातील हिंदी भाषिकांना खूश करण्यासाठी घेतल्याचा गंभीर आरोप संजय राऊत यांनी केला. महाराष्ट्रात काम करणाऱ्या व्यक्तीने स्थानिक भाषा शिकणे ही स्वाभाविक अपेक्षा असून, त्यासाठी वारंवार मुदतवाढ देणे योग्य नसल्याचे त्यांनी म्हटले.

शिंदे गटावर महापौरपदावरून गंभीर आरोप

दरम्यान, संजय राऊत यांनी शिंदे गटाच्या राजकीय कारभारावरही टीका केली. सत्ता विकत घेण्याच्या आरोपांमुळे शिंदे गटाचा इतिहास बदनाम असल्याचा दावा त्यांनी केला. आगामी मुंबईतील महापौरपदासाठी सव्वा वर्षाचा कार्यकाळ मिळवण्यासाठी किती पैसे मोजले गेले, याची माहिती आपण घेत असल्याचे राऊत म्हणाले. ‘सव्वाशे कोटी की सव्वा हजार कोटी मोजले, याची माहिती घेत आहे,’ असा दावा करत त्यांनी या प्रकरणावरून शिंदे गटाला लक्ष्य केले.

हेही वाचा..

मराठीपेक्षा सरकारला ‘यूपी’च्या निवडणुका महत्त्वाच्या?: मुदतवाढीवरून अमित ठाकरेंचा मुख्यमंत्र्यांना सवाल, चालकांना दिली मनसे स्टाईल कारवाईची धमकी

राज्यातील अमराठी रिक्षा आणि टॅक्सी चालकांना मराठी भाषा शिकण्यासाठी राज्य सरकारने नुकतीच एक वर्षाची मुदतवाढ दिली आहे. या वर्षभरात त्यांच्यावर कोणतीही दंडात्मक कारवाई केली जाणार नाही, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले. मात्र, सरकारच्या या निर्णयावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने तीव्र संताप व्यक्त केला आहे. मनसे नेते अमित ठाकरे यांनी नागपूर दौऱ्यादरम्यान या निर्णयाचा समाचार घेत फडणवीस सरकारवर जोरदार टीका केली. सविस्तर वाचा



Source link

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत