Headlines

Tharala Tar Mag Serial New Promo Update ; सायली अर्जुनचं स्टिंग ऑपरेशन सुरू, मर्दानी अवतारात दिसणार सुभेदारांची सून, कोर्टात स्वत:च लढणार केस


Tharala Tar Mag New Promo : ठरलं तर मग या मालिकेचा नवीन प्रोमो समोर आला असून यामध्ये आता अर्जुन नव्हे तर सायली पुराव्यांचा शोध घेऊन कोर्टात केस लढताना दिसणार आहे.

tharala tar mag
(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
ठरलं तर मग ही स्टार प्रवाह वरील मालिका गेली साडेतीन वर्ष प्रेक्षकांच्या मनात ठाण मांडून आहे. टीआरपीच्या स्पर्धेत नेहमीच अव्वल राहणारे ही मालिका नेहमीच आपल्या अनोख्या कथानकामुळे प्रेक्षकांची मन जिंकण्यात यशस्वी होते. या मालिकेतील सायली अर्जुन पासून ते अगदी प्रिया आणि महिपत पर्यंतची सर्व पात्र प्रेक्षकांना मनापासून आवडतात. या मालिकेतील खलभूमिका सुद्धा तितक्याच प्रसिद्ध झाल्या आहेत. कौटुंबिक वातावरण ते कोर्टातील कामकाज या सर्व गोष्टी अगदी सुंदरपणे या मालिकेत पाहायला मिळतात.

सध्या या मालिकेमध्ये सायली गरोदर असल्याचे पाहायला मिळते. प्रियाला तिची भांडाफोड केल्यावर घराबाहेर काढलं जातं. प्रियाची सर्व पाप बाहेर आल्यामुळे ती पोलिसांच्या तावडीत असते. तेव्हाच तिला सुद्धा कळतं की ती गरोदर आहे पण अश्विन मात्र तिला व तिच्या बाळाला स्वीकारत नाही. सायली अर्जुन मुळे झालेला अपमान, घरात न मिळणार स्थान, एवढी मेहनत करून हाताचा गेलेला पैसा, या सर्वांमुळे प्रिया आणखी पेटून उठते. शिवाय महीपत नागराज आणि राकेश यांना सुद्धा त्यांच्या अपमानाचा बदला घ्यायचा असतो त्यामुळे ते सुद्धा प्रियाशी हात मिळवणी करतात. तिथूनच या मालिकेच्या कथानकाला नवे वळण मिळते.

सर्व शत्रू गॅंग सायलीवर खोटे आरोप लावून तिला तुरुंगात डांबतात. सर्व नीट प्लॅनिंग झालेली असते पण कुठेतरी अर्जुन हाडाचा वकील आहे याकडे त्यांचे दुर्लक्ष होतं त्यामुळेच की काय काही गोष्टी हातच्या निसटतात ज्या अर्जुन लगेचच पकडतो. अर्जुन आपली सर्व बुद्धी व शिक्षण पणाला लावून सायलीला खोट्या आरोपातून निर्दोष ठरवतो आणि पुन्हा एकदा बेल वर तिला घरात आणतो. पण शांत बसेल ती प्रिया कसली! ती पुन्हा असा एक डाव खेळते ज्यामुळे सायली पूर्णपणे एकटी पडते. यावेळी तिने थेट अर्जुनवर जीवघेणा हल्ला केलेला आहे. त्यामुळे सायलीची केस लढवायला अर्जुन कोर्टात पोहोचू शकत नाही.

Maharashtra TimesUrvashi Rautela On Trolling : हा अपमान नाही मानवंदना! तिरंग्यासारखा ड्रेस परिधान केल्याने ट्रोल झाल्यावर उर्वशी रौतेलाचे स्पष्टीकरण
अशातच आता Tharala Tar Mag या मालिकेच्या नव्या प्रोमोने प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले आहे. सायली आता गरोदरपणाच्या अंतिम टप्प्यात असते. नवरा हॉस्पिटलमध्ये जीवन मरणाच्या दारात असतो. आज पर्यंत अर्जुन कधीही कोणतीही केस हरला नाही पण या हल्ल्यामुळे तो ही लढू सुद्धा शकत नसतो त्यामुळे त्याच्या वतीने सायली आता सर्व प्रयत्न करणार आहे. अर्जुन हॉस्पिटल मध्ये असताना सायली तिच्या विरोधात तयार करण्यात आलेले पुरावे शोधायला बाहेर पडते. विशेष म्हणजे अर्जुन तिला फोनवरून मार्गदर्शन करत असतो. ती कुठलीतरी एक फाईल शोधायला बाहेर पडते. तोंडावर मास्क असल्यामुळे तिच्याकडे फारसं कोणाचे लक्ष जात नाही. कानात असलेल्या ब्लूटूथ मार्फत ती अर्जुनशी कॉन्टॅक्टमध्ये असते.

Maharashtra TimesNeha Dhupia : नशीब मी लग्नाआधीच प्रेग्नंट राहिले! नेहा धुपियाने आठवला तो काळ, झटपट झालेलं लग्न; जवळच्या लोकांनाही शॉक

गरोदरपणाचा अंतिम टप्पा चालू असल्यामुळे तिला सतत थकवा ही जाणवत असतो पण तेव्हाच तिच्या डोळ्यासमोर तिला झालेली अटक, तुरुंगातले प्रियाचे शब्द आणि अर्जुन वर झालेला हल्ला या सर्व गोष्टी दिसू लागतात त्यामुळे ती पुन्हा एकदा पेटून उठते. स्वतःचा थकवा बाजूला ठेवून ती पुन्हा कामाला लागते. अर्जुन सुद्धा तिला धीर देत म्हणतो की आता सगळं तुला स्वतःला तुझं पार पाडायच आहे. अर्जुन ला कुठलाही त्रास होऊ नये यासाठी सायली जिद्दीने सर्व पुरावे शोधत असते. कोर्टात सुद्धा ती न्यायाधीशासमोर अगदी खंबीरपणे सांगते की आता माझी केस मीच लढणार.

ठरलं तर मग चा हा नवीन प्रोमो प्रेक्षकांना खूप आवडला आहे. या प्रोमोला मर्दानीची म्युझिक लावली आहे. कमेंट सेक्शन मध्ये एका चाहत्याने लिहिले की, येतो बस एक ट्रेलर है पिक्चर अभी बाकी है! कडक आणि धमाकेदार प्रोमो, दुसऱ्याने लिहिले- काय प्रोमो बनवले खतरनाक एकदम! , आणखी एकाने नाईस ट्विस्ट म्हणून कौतुक केले.

आकांक्षा तळेकर

लेखकाबद्दलआकांक्षा तळेकरआकांक्षा तळेकर महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये कन्सल्टन्ट या पदावर कार्यरत आहे. फेब्रुवारी 2023 मध्ये मटा ऑनलाइनमध्ये काम करण्यास सुरूवात केली. तेव्हापासून मनोरंजन, फिल्म इंडस्ट्री विषयक बातम्या लिहिण्यात हातखंडा आहे. तसेच कलाकारांच्या मुलाखती घेणे, वेगवेगळ्या इव्हेंटला उपस्थित राहून तेथील महत्वाच्या बातम्या करणे, सेट व्हिजिट देऊन त्यावर आर्टिकल बनवण्याचा अनुभव आहे.
पत्रकारितेतील अनुभव
आकांक्षा तळेकर यांचा पत्रकारितेच्या अनुभवाची सुरुवात सामना या वृत्तपत्रापासून झाली. तिथे इंटर्नशीप करताना बातम्यांचा पाया काय असतो इथपासून ते अचूक बातम्यांची निवड कशी करावी या गोष्टी शिकून घेतल्या. त्यानंतर लोकशाही वाहिनीवर दुसरी इंटर्नशीप केली आणि मग तिथेच 6 महिने टिकर ऑपरेटर म्हणून काम केले. यावेळी ब्रेकिंग न्यूज करताना प्रेक्षकांना वाचण्यासाठी कोणते शब्द महत्वाचे असतात, किंवा पत्रकारितेमधले शब्द आणि सामान्य आयुष्यातले शब्द यांच्यातील तफावत शिकता आली. लोकशाही वृत्तवाहिनीमध्ये व्हायरल शोसाठी स्क्रिप्ट लिखाणही केले आहे. हे करत असताना विविध व्हायरल व्हिडिओंपाठी नेमकं सत्य काय हे शोधण्याची सवय लागली. त्यामुळे एखादी बातमी करताना त्याचा ठोस पाठपुरावा करावा हे शिकण्यात आले.
लोकशाहीनंतर मुक्तपीठ या वेबपोर्टलसाठी काही काळ काम केले. तिथे व्हिडिओ बनवणे, कॅमेऱ्यासमोर वृत्तवाचन करणे आदी काम केली. या सर्व गोष्टी करत असताना मेघा मराठी या मनोरंजन विषयक वेबपोर्टलसाठी रोज आर्टिकल लिहिण्याचे काम सुरू होते. त्यामध्ये बॉलिवूड किंवा मराठी इंडस्ट्रीमध्ये लेटेस्ट घडणाऱ्या घडामोडी आर्टिकल स्वरुपात दिल्या.
करोनाच्या काळात बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या व्हॅक्सिन सेंटरमध्ये डेटा ऑपरेटर म्हणून दीड वर्ष कार्य केले. त्यावेळी सर्वसामान्य व्यक्ती, त्यांचे स्वभाव आणि अडीअडचणी जवळून जाणता आल्या. हे काम करत असताना विविध राजकिय पक्षांसंबंधित लोकांशी सतत संपर्क होत होत्या. त्यामुळे राजकारणात काय चालू असते याची थोडीफार जाण झाली ज्याचा उपयोग पुढे पत्रकारितेमद्ये झाला.
त्यानंतर हेमा मालिनी संपादक असलेल्या मेरी सहेली या मासिकाची मराठी आवृत्ती माझी सहेली मध्ये 3 वर्षे काम केले आहे. माझी सहेलीमध्ये मनोरंजन विषय कोलम लिहिणे तसेच पॉडकास्टमध्ये वेगवेगळ्या विषयांचे संशोधन करणे, मुलाखतींसाठी प्रश्न तयार करण्याचे काम केले. सध्या महाराष्ट्रा टाइम्स ऑनलाइनध्ये मनोरंजन सिनेसृष्टीविषय बातम्या करणे, गाजलेल्या मालिकांचे अपडेट्स देणे, कलाकारांच्या महत्वाच्या सोशल मीडियावर पोस्टबाबत बातमी तयार करुन ती वाचकांपर्यंत पोहचवण्याचे काम करत आहेत. तसेच मालिका किंवा सिनेमांच्या प्रेस कॉन्फरन्समध्ये जाऊन कलाकारांच्या मुलाखती घेण्याचा अनुभव आहे. मनोरंजन विषयाशिवाय क्राइम आणि व्हायरल व्हिडिओवरुन बातम्या करण्याचीही आवड आहे.
शैक्षणिक माहिती
आकांक्षा तळेकर यांनी पार्ले टिळक विद्यालयातून शालेय शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर साठ्ये महाविद्यालयात विज्ञान शाखेतून 12 वी दिली. पुढे साठ्ये महाविद्यालयातच BMM हा स्पेशल कोर्स केला आणि त्यात पत्रकारितेची पदवी मिळवली.
आणखी वाचा