Chhatrapati Sambhajinagar Khavdya Dongar Chandgude Family Death Case Kunal Aunty Kalyani Parde Official Reaction; ‘कुणालला जीव द्यायचा नव्हता, आई-वडिलांना एकत्र बघायचं होतं’; खवड्या डोंगर प्रकरणात मावशीचा खळबळजनक दावा
Chhatrapati Sambhajinagar Khavdya Dongar Chandgude Family Death Case Kunal Aunty Kalyani Parde Official Reaction; ‘कुणालला जीव द्यायचा नव्हता, आई-वडिलांना एकत्र बघायचं होतं’; खवड्या डोंगर प्रकरणात मावशीचा खळबळजनक दावा
Khawdya Dongar Case Kunal Aunty Kalyani Parde Reaction : छत्रपती संभाजीनगर येथील तिसगाव परिसरात असणाऱ्या खवड्या डोंगरावरुन खाली पडून एकाच कुटुंबातील तीन जणांचा मृत्यू झाला होता.
छत्रपती संभाजीनगर खवड्या डोंगर चांदगुडे कुटुंबाचा मृत्यू(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
सुशील राऊत, छत्रपती संभाजीनगर : वाळूज परिसरातील खवड्या डोंगर तिहेरी मृत्यूप्रकरणात एक अत्यंत धक्कादायक आणि काळीज पिळवटून टाकणारी नवी माहिती समोर आली आहे. ‘कुणालला आत्महत्या करायची नव्हती; घरातून निघून गेलेल्या वडिलांना परत आणण्यासाठी आणि आई-वडिलांमधील वाद मिटवण्यासाठी तो केवळ इमोशनल ब्लॅकमेल करत होता’, असा दावा कुणालची मावशी कल्याणी परडे यांनी केला आहे. एका 18 वर्षांच्या मुलाचा कौटुंबिक गैरसमज दूर करण्याचा भाबडा प्रयत्न शेवटी संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त होण्यास कारणीभूत ठरला.
’पप्पा तुम्ही मला सोडून कसे जाऊ शकतात?’
मावशीने दिलेल्या माहितीनुसार, ‘संवादाच्या अभावामुळे आणि वाढत्या गैरसमजांमुळे कुणालचे वडील घर सोडून निघून गेले होते. त्यामुळे त्याची तो आणि आई तणावात होती. कुणालला जीव द्यायचा नव्हता. त्यांनी वडिलांना कॉल केला होता. तेव्हा तो म्हणाला, ‘पप्पा तुम्ही मला सोडून कसे जाऊ शकतात?, माझ्याकडे परत या’, असं म्हणाला. ‘कुणालला आई-वडिलांना एकत्र आणायचं होतं, त्यासाठी बाहेर गेलेल्या वडिलांना इमोशनल करण्यासाठी तो डोंगरावर गेला होता. आई-वडिलांचे वाद थांबवण्यासाठीच तो ही धडपड करत होता’, असंही परडे यांनी स्पष्ट केलं आहे.
भाऊजींच्या व्यवसायावरून आणि आयफोन वापरण्यावरूनहोणाऱ्या उलट-सुलट चर्चांवर कुणालच्या मावशीने कडक शब्दात उत्तर दिलं आहे. त्या म्हणाल्या की, ‘भाऊजी ड्रायव्हर असले तरी ते चांगल्या शेतकरी कुटुंबातील आहेत. घरात नोकरीसोबतच शेतीचा पैसा येत होता, त्यामुळे कुटुंबात पैशांची कोणतीही कमतरता नव्हती. तसेच आयफोन आता अगदी सहज आणि स्वस्तात मिळतात. जुने फोन 20-25 हजारात मिळतात. कुणालला शिक्षणासाठी मोबाईल घेऊन दिला होता, त्यामुळे यावरून श्रीमंतीचा किंवा उधळपट्टीचा आव आणणं चुकीचं’, असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं.
…यामुळे बहिणीने मीडियावर व्यक्त केलं मत
कुटुंबातील वादावर बोलताना मावशीनं स्पष्ट केलं की, ‘माझ्या बहिणीच्या लग्नाला 22 ते 23 वर्ष झाली होती. तिचा मोठा मुलगा आज 21 वर्षांचा असता, तर कुणाल 18 वर्षांचा होता. इतकी वर्ष संसार केल्यानंतर पतीकडून स्वतःचा हक्क मागण्याचा आणि मत मांडण्याचा प्रत्येक पत्नीला अधिकार असतो. घरात कोणाशीही संवाद होत नसल्यामुळेच तिने सोशल मीडियावर आपलं मत व्यक्त केलं होतं.
कुणाल यापूर्वी 2025 मध्येही डोंगरावर गेल्याच्या चर्चेवर मावशीने स्पष्टीकरण दिलं आहे. ‘कुणाल तेव्हा आत्महत्या करायला गेला नव्हता. तो नैराश्यात असल्यानं केवळ फिरण्यासाठी गेला होता. त्याने आईला मेसेज करून ‘मम्मी, मी थोडा परेशान आहे, मला स्पेस हवी आहे, मी संध्याकाळी परत येईन’ असं कळवलं होतं. मात्र, आईने तो मेसेज वेळेवर न पाहिल्यानं त्यावेळी पोलिसांत धाव घेण्यात आली होती’, असं मावशीने सांगितलं. कौटुंबिक वाद, संवादाचा अभाव आणि वडिलांना परत आणण्याच्या एका 18 वर्षांच्या मुलाच्या भाबड्या धडपडीतून हा संपूर्ण अनर्थ घडल्याचं मावशीच्या या दाव्यावरुन स्पष्ट होत आहे.
लेखकाबद्दलप्रशांत पाटीलप्रशांत पाटील ‘महाराष्ट्र टाईम्स ऑनलाईन'(TIL) या आघाडीच्या डिजिटल माध्यम समूहात सीनियर डिजिटल कंन्टेट प्रोड्युसर पदावर कार्यरत आहेत. पुणे जिल्ह्यातील नामांकित ‘थोडक्यात’ न्यूज वेब पोर्टल, हैदराबादमधील ‘आधान शॉर्ट न्यूज अॅप’, ‘सकाळ मिडिया ग्रुप’ आणि आता ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’, असा जवळपास पाच ते साडेपाच वर्षांपेक्षा अधिक काळ ते कार्यरत आहेत. प्रशांत पाटील यांना महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील सर्व गुन्हेगारी, अपघात, शेतकरी विषयक बातम्या, ग्रामीण भागात यश संपादन केलेल्या तरुणी किंवा तरुणांच्या सक्सेस स्टोरीज् आणि महाराष्ट्र हायपर लोकल अशा विविध विषयांची आवड आहे. ऑगस्ट (2026) पासून ‘महाराष्ट्र टाईम्स ऑनलाईन’साठी (TIL) काम करत आहेत. या दरम्यान, राज्यातील विधानसभा, लोकसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकींच्या बातम्यांवर विशेष लक्ष ठेवतात. याआधीही त्यांनी याच माध्यम समूहासोबत तीन वर्ष काम केलं आहे.
प्रशांत पाटील यांनी पुण्यातील नामांकित आबासाहेब गरवारे महाविद्यालयातून मास कम्युनिकेशन विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. शिक्षण घेत असतानाच त्यांनी ‘थोडक्यात’ या न्यूज वेब पोर्टलला काम केलं. तिथे डिजिटल माध्यमासाठी लेखन करत असताना त्यांना डिजिटल क्षेत्रातलं कसं काम करतात? हे यश संपादन केलं. त्यानंतर त्यांना मुंबईत ‘महाराष्ट्र टाइम्य ऑनलाईन’ (TIL) या नामांकित माध्यम समूहामध्ये काम करण्याची संधी मिळाली. 28 मार्च 2022 रोजी ते ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ या मोठ्या ब्रँण्डसोबत पहिल्यांदा जोडले गेले. तिथे त्यांनी प्रदीर्घ काळ म्हणजे तीन वर्ष डिजिटल विभागात काम केलं. त्यांनतर त्यांनी फेब्रुवारी 2025 ला ‘सकाळ मिडिया ग्रुप’ला काम करण्याची संधी मिळाली. परंतु तिथे ते काम करत असताना त्यांना पुन्हा ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ (TIL) या माध्यम समूहाने संधी दिली. त्यानंतर ऑगस्ट 2026 पासून प्रशांत पाटील हे ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’सोबत (TIL) काम करताय.
‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’मध्ये (TIL) काम करताना त्यांना खूप मोठमोठ्या संध्या मिळाल्या. जसे की, व्हिडिओ करणे, महाराष्ट्रातील संपूर्ण जिल्ह्यातील रिपोर्टर यांच्याशी समन्वय साधणे, जिल्हा प्रतिनिधींकडून वेळोवेळी काम करुन घेणे, विशेष आणि काही महत्वाच्या बातम्या मागवून घेणे, अशा बऱ्याच गोष्टींची त्यांना इथे मिळाली. प्रशांत पाटील हे सकाळच्या शिफ्टला काम करत असताना लाईव्ह ब्लॉग, रिपोर्टरशी बोलणे, ब्रेकिंग बातम्या, हायपर लोकल बातम्या, ग्रामीण भागातील सर्व घडामोडींकडे लक्ष देण्याचं काम ते करतात.… आणखी वाचा