Headlines

Thane News: ‘भुलेश्वर राजा’दुर्घटनेचे पडसाद ठाण्यातही उमटले ; मंडपांची अनामत रक्कम व भाडे माफ करण्याची मागणी


Thane News:भुलेश्वर येथील गणेशमूर्ती कोसळण्याच्या घटनेचे पडसाद ठाण्यातही उमटले आहेत. ठाण्यातील गणेशोत्सव सुरक्षितपणे पार पडण्यासाठी महापालिका प्रशासनाने आगाऊ नियोजन करून आवश्यक प्रतिबंधात्मक उपाययोजना कराव्यात अशी मागणी लोकप्रतिनिधींकडून केली जात आहे

भुलेश्वर राजा दुर्घटना
(फोटोमहाराष्ट्र टाइम्स)
म.टा.प्रतिनिधी,ठाणे :मुंबईतील भुलेश्वर येथील गणेशमूर्ती कोसळण्याच्या घटनेचे पडासाद ठाण्यातही उमटले आहेत.या दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर ठाण्यातील गणेशोत्सव सुरक्षितपणे पार पडण्यासाठी महापालिका प्रशासनाने आगाऊ नियोजन करून आवश्यक प्रतिबंधात्मक उपाययोजना कराव्यात, अशी आग्रही मागणी लोकप्रतिनिधींकडून केली जात आहे. यामध्ये गणेशोत्सव मंडळांच्या मंडपांची अनमात रक्कम आणि भाडे माफ करावे, अशी मागणीही आता जोर धरू लागली आहे.

प्रशासनाने विशेष खबरदारी घेणे आवश्यक

भुलेश्वर येथे गणेशमूर्तींच्या आगमनावेळी शनिवारी मूर्ती कोसळून घडलेल्या दुर्घटनेत दोन पदाधिकाऱ्यांचा मृत्यू झाला.या घटनेनंतर सर्वच स्तरांतून शोक व्यक्त होत असताना ठाण्यातील गणेशोत्सव मंडळांच्या मंडपांची अनामत रक्कम व भाडे माफ करण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे महापालिकेतील गटनेते नजीब मु्ल्ला यांनी महापालिका आयुक्त सौरभ राव यांच्याकडे केली आहे. गणेशोत्सव काळात कोणत्याही नागरिकाच्या जीवितास धोका निर्माण होऊ नये, यासाठी प्रशासनाने विशेष खबरदारी घेणे आवश्यक असल्याचे मुल्ला यांनी पत्रात नमूद केले आहे.

ट्रॉलीची तपासणी आवश्यक

मोठ्या व उंच गणेशमूर्तीच्या बाबतीत मूर्तीची लोखंडी फ्रेम ,वेल्डिंग ,आधार प्रणाली ,ट्रॉली ,चाके ,ब्रेक आदींची तांत्रिक तपासणी केल्यानंतरच मिरवणुकीस परवानगी देण्यात यावी. मूर्ती वाहून नेताना योग्य सुरक्षा व्यवस्था आणि प्रशिक्षित मनुष्यबळ उपलब्ध आहे, याचीही खात्री करावी ,असे मुल्ला यांनी पत्रात सुचवले आहे.

अडथळे तातडीने दूर करा.

मोठ्या गणेशमूर्तीच्या आगमन व विसर्जन मार्गाची महापालिका, वाहतूक पोलिस आणि संबंधित विभागांच्या संयुक्त पथकाकडून तातडीने पाहणी करावी. रस्त्यांवरील खड्डे, उंच-सखल भाग, अर्धवट विकासकामे, झाडांच्या धोकादायक फांद्या, विद्युतवाहिन्या तसेच इतर अडथळे तातडीने दूर करावेत, अशी मागणी मुल्ला यांनी केली.

समाजमाध्यमांवरील संदेशांबाबत सतर्क रहा

विविध समाजमाध्यंमावरील संदेश परदेशात प्रसारित झालेले असतात.ते संदेश मॉर्फ करून काही समाजकंटक आपल्या देशातील कायदा आणि सुव्यवस्था बिघडवण्यासाठी प्रसारित करत असतात. त्यामुळे नागरिकांनी याबाब सतर्क रहावे,असे आवाहन पोलिस आयुक्त आशुतोष डुंबरे यांनी शांतता समितीच्या बैठकीत केले. सण-उत्सवांदरम्यान ध्वनिप्रदूषण होणार नाही. याची काळजी घ्यावी.तसेच गणेशमूर्तींच्या संरक्षणाची जबाबदारी गणेश मंडळांनी घ्यावी , अशी सूचनाही त्यांनी केली.

ठाणे पोलिस आयुक्तालय

ठाणे पोलिस आयुक्तालय स्तरावरील शांतता समितीच्या सदस्यांची बैठक सोमवारी ठाण्यातील सिध्दी हॉलमध्ये आयोजित करण्यात आली होती.सदस्यांनी काही सूचना मांडल्या.त्यानंतर पोलिस आयुक्त आशुतोष डुंबरे ,पोलिस सहआयुक्त डॉ. ज्ञानेश्वर चव्हाण ,अपर पोलिस आयुक्त संजय जाधव यांनी मार्गदर्शन केले.

Maharashtra TimesTukaram Mundhe : पाच मित्र रेस्टॉरंटमध्ये बसले, वेटरला एकच प्रश्न विचारला, तोच तुकाराम मुंढेंचं दर्शन घडलं, व्हिडिओला नेटिझन्सची पसंती

न्यायालयाच्या मार्गदर्शक तत्त्वांचे पालन मंडळांनी तसेच नागरिकांनी करणे गरजेचे

आगामी काळ हा सण -उत्सवांचा असून सर्वसामान्य जनता आणि पोलिस यांच्यामधील शांतता समिती सदस्य हे दुवा म्हणून काम करतात. तरुण वर्ग हा समाजातील महत्त्वाचा घटक असून शांतता समिती सदस्यांनी त्यांच्याशी संपर्कात राहणे अतिशय गरजेचे असल्याचे पोलिस आयुक्त डुंबरे यांनी सांगितले.न्यायालयाच्या मार्गदर्शक तत्त्वांचे पालन मंडळांनी तसेच नागरिकांनी करणे गरजेचे असल्याचे ते म्हणाले.

Maharashtra TimesNagpur News: २०० कोटींच्या बॉण्डचा मार्ग मोकळा ; नागपूर महापालिकेला इंडिया रेटिंग्जकडून एए+/ क्रेडिट रेटिंग,नागनदी प्रदूषणमुक्ती प्रकल्पाला बळ

घटनेच्या संदर्भात खात्री केल्याशिवाय व्हॉट्सअॅपवर संदेश फॉरवर्ड करू नका

आजच्या डिजिटल युगामध्ये व्हॉट्सअॅपवर अफवा पसरणार नाहीत,याची प्रत्येकाने काळजी घेतली पाहिजे. एखाद्या घटनेच्या संदर्भात खात्री केल्याशिवाय व्हॉट्सअॅपवर संदेश फॉरवर्ड करू नये. मोबाइल वापरताना प्रत्येकाने आवश्यक काळजी घ्यावी .प्रत्येक सण धार्मिक सद्भावना राखून साजरा करा. आगामी सणांच्या काळात शांतता राखण्यासाठी सर्व समाजांच्या प्रमुख नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहनही आयुक्तांनी केले.

कांचन परुळेकर

लेखकाबद्दलकांचन परुळेकरकांचन परुळेकर महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये कन्सलटंट पदावर कार्यरत आहेत. कांचन स्थानिक बातम्या, पायाभूत सुविधा, बांधकाम आणि विकास प्रकल्प यासाठी लिखाण करतात. त्यांच्या पत्रकारितेच्या प्रवासाला सुरुवात ही महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमधून झाली. मार्च २०२६ मध्ये महाराष्ट्र टाइम्सच्या व्हिडिओ विभागात त्यांनी इंटर्न म्हणून काम केले. सुरुवातीला त्यांनी युट्यूब, फेसबुक आणि इन्स्टाग्रामसाठी कन्टेंट तयार करताना व्हिडिओ आणि लेख लिहिले आहेत. महाराष्ट्रातील राजकीय घडामोडी, स्थानिक बातम्या आणि क्राइमसह स्पोर्ट्सवर इत्यादी विषयांचे वाचन आणि लेखन करण्याची त्यांना विशेष आवड आहे.

कांचन यांचे संपूर्ण शिक्षण मराठी माध्यमातून झाले असून पत्रकारितेची आवड असल्याने त्यांनी कोकण ते मुंबई असा शैक्षणिक प्रवास केला. २०२५ मध्ये बॅचलर्सचे शिक्षण गावी पूर्ण केले. इकोनॉमिक्स या विषयातून पद्वी घेतली. लिखाणाची आवड, संवाद साधण्याचे कौशल्य आणि पत्रकारितेची आवड समजून घेऊन साठ्ये कॉलेज विलेपार्ले येथे वृत्तपत्रविद्या आणि संवाद या विषयात त्यांनी पद्व्युत्तर शिक्षणासाठी प्रवेश घेतला.

महाविद्यालयीन काळात कला आणि नाटक विषयात विशेष आवड असल्याने त्यांनी अभिनयदेखील केले आहे. काही नाटक त्यांनी लिहिले आहेत. मुंबई विद्यापीठाच्या युथ फेस्टिवलमध्ये त्यांना अभिनयासाठी ब्रॉन्झ आणि सिल्व्हर मेडल देण्यात आले आहेत. कविता आणि लेख लिहिण्याची आवड असल्याने शाळा ,कॉलेज मासिक अंकात त्यांचे लेख देखील प्रसिध्द झाले आहेत.

२०२६ मध्ये महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन सोबत जोडल्या गेल्यानंतर त्यांची पत्रकारितेची आवड अगदी स्पष्ट झाली. बोलण्यातला स्पष्टपणा लिखाणातली पारदर्शकता अधिक नव्याने समजत गेली. तीन महिन्यांच्या इंटर्नशिप नंतर त्या आता कन्सलटंट पदावर म.टा. समुहात सहभागी झाल्या आहेत. पारदर्शकता आणि विश्वासार्ह माहिती वाचकांपर्यंत पोहचवण्याचं काम त्या करत आहेत.आणखी वाचा