Headlines

Tukaram Mundhe FDA Photo on Friends Restaurant table Hotel staff funny reaction Rithvik Shetty shares Video; पाच मित्र रेस्टॉरंटमध्ये बसले, वेटरला एकच प्रश्न विचारला, तोच तुकाराम मुंढेंचं दर्शन घडलं, व्हिडिओला नेटिझन्सची पसंती


How to order at a Restaurant Video : व्हिडिओमध्ये पाच जण रेस्टॉरंटच्या टेबलवर बसलेले दिसतात. त्यातील एक जण विचारतो, “पनीर असेलच ना?” त्यानंतर कॅमेरा टेबलच्या कोपऱ्याकडे वळतो, आणि तिथे एका फोनवर तुकाराम मुंढे यांचा फोटो दिसतो.

Tukaram Mundhe FDA Restaurant Table Maharashtra Times
(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
मुंबई : अन्न आणि औषध प्रशासन विभागाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी असुरक्षित अन्नपदार्थांच्या ठिकाण्यांवर छापेमारी केल्याने जनमानसात त्यांची लोकप्रियचा चांगलीच वाढली आहे. सोशल मीडियावरही त्यांची क्रेझ पाहायला मिळत आहे. अशातच काही तरुणांचा एक गमतीदार व्हिडिओ नेटिझन्समध्ये व्हायरल होत आहे. ‘२०२६ मध्ये रेस्टॉरंटमध्ये ऑर्डर कशी द्यावी’ हे मजेशीर पद्धतीने दाखवणारा हा व्हिडिओ आहे.

व्हिडिओत काही तरुण मित्रमंडळी टेबलावर तुकाराम मुंढे यांचा फोटो ठेवतात, जेणेकरुन पदार्थाची गुणवत्ता चांगली राखण्याबद्दल रेस्टॉरंट चालकांना अप्रत्यक्षपणे इशारा देता येईल. हा व्हिडिओ पूर्णपणे ‘प्रँक’ अर्थात खोडकर वृत्तीने बनवण्यात आला आहे.

काय आहे व्हिडिओ?

हा व्हिडिओ ‘ऋत्विक शेट्टी’ नावाच्या युजरने इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. व्हिडिओमध्ये पाच जण रेस्टॉरंटच्या टेबलभोवती बसलेले दिसतात. त्यातील एक जण विचारतो, “पनीर तर असेलच ना?” त्यानंतर कॅमेरा टेबलाच्या एका कोपऱ्याकडे वळवला जातो, तिथे एका फोनवर तुकाराम मुंढे यांचा फोटो दिसत आहे.

वेटरसह सगळेच हसू लागले

टेबलावर बसलेल्या तरुणांसोबतच ऑर्डर घेण्यासाठी आलेला रेस्टॉरंटचा कर्मचारीही व्हिडिओत दिसतो. तुकाराम मुंढे यांचा फोटो पाहिल्यानंतर वेटरही थोडा हसतो आणि त्यानंतर टेबलावर बसलेले सर्वजण खळखळून हसू लागतात.

Maharashtra TimesSrisailam Death : तीन बहिणींची बाथरुममध्ये बॉडी, मामा भाचाचं हॉलमध्ये शव, लॉजमध्ये एकाच कुटुंबातील पाच जणांचा संशयास्पद मृत्यू

नेटकरीही खळखळून हसले

व्हिडिओवर “२०२६ मध्ये रेस्टॉरंटमध्ये ऑर्डर कशी द्यावी” असे लिहिले आहे, तर कॅप्शनमध्ये “तुकाराम मुंढे यांचे आभार” असे म्हटले आहे. व्हिडिओचे स्वरुप पाहता तो केवळ गंमत म्हणून आणि विनोदी उद्देशाने तयार केल्याचे दिसते. या व्हिडिओने नेटकऱ्यांना खळखळून हसवले आहे.

दीड मिलियनहून अधिक व्ह्यूज

या व्हायरल व्हिडिओला जवळपास १५ लाख व्ह्यूज आणि ६३,००० हून अधिक लाईक्स मिळाले आहेत. कमेंट्सचा विभाग मोठ्या प्रमाणावर ‘हसणाऱ्या इमोजींनी’ भरलेला आहे, यावरुन सोशल मीडिया युजर्स या विनोदाचा आनंद घेत असल्याचे दिसून येते.

महाराष्ट्र अन्न व औषध प्रशासन आयुक्त म्हणून तुकाराम मुंढे यांच्या अलिकडील कार्यकाळामुळे ते अनपेक्षितपणे सोशल मीडियावर लोकप्रिय झाले आहेत. आता त्यांची छबी विविध प्लॅटफॉर्म्सवर मीम्स, व्हायरल एडिट्स आणि चाहत्यांनी बनवलेल्या व्हिडिओमध्ये झळकत आहे.

Maharashtra TimesBoarding Pass Swap : ठाण्यातील प्रवाशासोबत बोर्डिंग पासची अदलाबदल, विमानतळावर कारनामा, नेपाळचं तिकीट, कॅनडाला जाण्याचा डावमहाराष्ट्र एफडीए आणि मुंबई उच्च न्यायालय यांच्यातील एका घटनेनंतर ही चर्चा अधिकच वाढली. गेल्या आठवड्यात, खानावळी आणि कॅन्टीन्सच्या तपासणीत ‘पक्षपातीपणा’ केल्याच्या आरोपांवरून न्यायालयाने एफडीएला जाब विचारला होता. त्यानंतर लगेचच, एफडीएच्या अधिकाऱ्यांनी उच्च न्यायालयाच्या आवारातील तीन कॅन्टीन्सची तपासणी केली. या तपासण्या तुकाराम मुंढेंच्या नेतृत्वाखाली करण्यात आल्या. त्यांनी या वर्षी मे महिन्यात एफडीए आयुक्तपदाचा कार्यभार स्वीकारला होता.

ही बाब अल्पावधीतच सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनली. तुकाराम मुंढे यांची प्रतिमा एक कठोर आणि शिस्तप्रिय अधिकारी म्हणून ओळखली जाते, ते कोणत्याही प्रकारची सवलत न देता कठोर कारवाई करण्यासाठी ओळखले जातात.