Headlines

Sugar Price Hike: तुटवडा नाही, मग दरवाढ का? 48 लाख टन साखरेचं रहस्य, महागाईवरून RBIचा इशारा काय? – indian inflation sugar price hike 48 lakh ton sugar missing raju shetty


Produced by: Amol Doifode|महाराष्ट्र टाइम्स.कॉम

पश्चिम आशियातील युद्धामुळे कच्च्या तेलाच्या किमतीत मोठे चढ-उतार सुरू आहेत. त्यामुळं देशात पुढील काळात महागाईचे संकेत आहेत. देशाच्या आर्थिक सल्लागारांनी अधिक यासंदर्भात महागाईचे संकेत दिले असून सावधानतेचा इशारा दिला आहे. कारण देशात साखरेचा तुटवडा नाही असं आता इंडियन शुगर अँड बायो-एनर्जी मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन म्हणजेच (इस्मा) म्हणतंय मग देशावर साखर आयात करण्याची वेळ का आली, आणि अचानक साखरेचा भाव असा एकाकी कसा वाढला असा सवाल आहे. शेतकरी नेते राजू शेट्टी यांनीही देशातील ४८ लाख टन साखर गेली कुठे ? असा सवाल विचारत, पंतप्रधान मोदींना पत्र लिहिलं आहे. यात साखरेच्या वाढलेल्या दरात २० हजार कोटींचा गैरव्यवहार झाल्याचा गंभीर आरोप केलाय. त्यातच साखरेच्या बाबतीतही एलपीजीसारखे साखरेचे दोन दर करण्याचा प्रस्ताव देण्यात आल्याची माहिती समोर येतीय. तेव्हा देशाच्या आर्थिक सल्लागारांनी महागाईवरून कोणता गंभीर इशारा दिलेला आहे, त्या मागचं कारण काय, राजू शेट्टींनी म्हटल्याप्रमाणे देशातील साखरेच्या वितरणात काही काळंबेरं आहे का, सरकारच्या अन्न नागरी पुरवठा मंत्रालयाच्या दाव्यानुसार ४८ लाख टन साखर कुठे गेली? आणि इस्मानं साखरेबाबत कोणती महत्त्वाची माहिती दिली आहे हेच आपण या व्हिडिओतून पाहणार आहोत.#SugarPrice #SugarInflation #SugarImport #SugarShortage #SugarCrisis #SugarProduction #SugarStock #SugarPricesIndia #IndiaInflation #InflationIndia #FoodInflation #RajuShetty #SugarScam #ISMA #SugarIndustry #SugarFarmers #SugarcaneFarmers #SugarcanePrice #MaharashtraSugar #SugarNews #IndiaSugarNews #SugarPriceNews #FoodMinistry #MinistryOfConsumerAffairs #FoodAndPublicDistribution #PMModi #NarendraModi #AmitShah #PralhadJoshi #CrudeOilPrice #WestAsiaWar #InflationWarning #EconomicAdvisor #IndiaEconomy #IndianEconomy #FoodPrices #EssentialCommoditiesWest Asia tensions are causing sharp fluctuations in crude oil prices, raising concerns over future inflation in India. The government is also facing questions over sugar prices and imports. While ISMA says there is no sugar shortage, farmer leader Raju Shetti has questioned where 48 lakh tonnes of sugar went and alleged a ₹20,000 crore irregularity. There are also reports of a proposal for two different sugar prices, similar to LPG. So, what inflation warning have economic experts given, why did sugar prices rise, and where did the missing 48 lakh tonnes go? Let’s find out.



Source link

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत