Headlines

महायुतीतील स्पर्धा रोखण्यासाठी समन्वयाची बैठक, फडणवीसांसमोर मित्रपक्षांना मॅनेज करण्याचं आव्हान – devendra fadnavis warning in mahayuti meeting and challenges to maintain mahayuti


Produced by: कोमल आचरेकर|महाराष्ट्र टाइम्स.कॉम

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वर्षा या शासकीय निवासस्थानी महायुतीच्या समन्वय समितीची बैठक पार पडली. राज्याच्या मंत्रिमंडळ बैठकीनंतर लगेचच महायुतीची ही महत्त्वाची समन्वय बैठक पार पडली. या बैठकीला राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्यासह महायुतीतील प्रमुख नेते आणि मंत्री उपस्थित होते. २०२४च्या विधानसभा निवडणुकीनंतर पहिल्यांदाच मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्या उपस्थितीत झालेली ही बैठक महत्त्वाची मानली जातेय. आगामी निवडणुका, निधी वाटपावरून मित्रपक्षांमध्ये निर्माण झालेली नाराजी आणि महामंडळांचे प्रलंबित वाटप या पार्श्वभूमीवर ही बैठक महत्त्वपूर्ण ठरली. या बैठकीत नक्की काय घडलं? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मित्रपक्षांचे कान कसे टोचले? आणि आगामी काळात महायुती मॅनेज करताना फडणवीसांसमोर कोणती मोठी आव्हाने असणार आहेत? तेच या व्हिडिओच्या माध्यामातून समजून घेऊया..



Source link

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत