Headlines

Gold Price Crash Prediction; भाव वाढतील म्हणून सोनं घेणाऱ्यांसाठी धोक्याची घंटा, मार्केट रिसर्च न करता पैसे टाकाल तर असंच होणार!


Gold Price Crash : सोन्याच्या बाजारात महिन्याभरापासून प्रचंड हालचाल होताना दिसत आहे. ऑगस्ट महिन्याच्या 25 दिवसांत सोन्याची किंमत 15 टक्क्यांनी वाढली असून सोन्याच्या या दरवाढीमुळे गुंतवणूकदारांच्या चेहऱ्यावर हास्य खिळले होते. पण त्याचवेळी,ऑप्शन्स मार्केटमध्ये अशी ऑर्डर आली, ज्याने संपूर्ण बाजाराचे लक्ष वेधून घेतले. ही काही छोटी ऑर्डर नव्हती.

सोन्याच्या किंमतीत घसरणीचा डाव

सोन्याच्या बाजारातील एका प्रतिष्ठित व्यापाऱ्याने सोन्यावर अंदाजे 1,919 कोटींची बोली लावली, पण यामध्ये आश्चर्य म्हणजे की हा डाव सोन्याची वाढती किंमत कायम राहील यावर नव्हती, तर पुढील चार आठवड्यांत होणाऱ्या घसरणीवर होती. म्हणजे एकीकडे बाजारातील लोक ‘सोन्याची किंमत आणखी वाढेल’ असं म्हणत असताना दुसरीकडे, एका बड्या प्रतिष्टीत व्यक्तीने आपल्या पैशांच्या जोरावर गुपचूप म्हटले, “आता गोष्टीत एक नवीन ट्विस्ट येणार आहे.”

Maharashtra TimesRustomjee Crown: मुंबईत 50-50 कोटींच्या फ्लॅटवर बीएमसीचा हातोडा, तुमच्यावर ही वेळ येऊ नये; एक चूकही महाग पडू शकते

एका महिन्यात सोन्याची गरुडभरारी

सोन्याच्या बाजारातील या मोठ्या खेळीबद्दल जाणून घेण्याआधी सोन्याच्या तेजीबद्दल समजून घेतले पाहिजे. सीएनबीसी इंटरनॅशनलच्या माहितीनुसार या महिन्यात सोन्याच्या किमतीत जवळपास 15% वधारल्या आहेत आणि पुढेही हीच गती कायम राहिली, तर 2008 नंतरचा ऑगस्ट सोन्यासाठी सर्वोत्तम महिना ठरू शकतो.

व्याज दरवाढ आणि बॉण्डवरील परतावा (यील्ड) वाढल्यास सोन्यावर सामान्यतः दबाव येतो, पण यावेळी उलटच उघड आहे. अमेरिकेतील 10-वर्षीय बॉण्ड यील्डने अनेक वर्षांतील उच्चांकावर झेप घेतली असून वास्तविक व्याजदरही वाढतानाही सोन्याच्या किमती वाढतच आहेत. ही तेजी पाहून सामान्य व्यापारी सोन्याकडे धाव घेत आहेत, पण आदल्या दिवशी बाजार उघडल्यानंतर 20 मिनिटांनी जे घडले, त्याने या गतीवर प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे.

Maharashtra Times8th Pay Commission Salary Hike: 2.57 पेक्षा कमी फिटमेंट फॅक्टर तरी सॅलरीत मोठी वाढ शक्य; केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या पगारवाढीचे नवीन Calculation1.16 लाख कॉल ऑप्शन्स विकून 1,919 कोटी उभारले

एका बड्या ट्रेडरने SPDR गोल्ड शेअर्स ईटीएफवरील अंदाजे 1,16,000 कॉल ऑप्शन्स विकले. सोप्या भाषेत सांगायचे तर ईटीएफ एक असा फंड आहे जो बाजारात स्टॉकप्रमाणे खरेदी-विक्री केला जाऊ शकतो. GLD ची किंमत सोन्याच्या किमतीनुसार कमी-जास्त होते त्यामुळे, व्यापारी सोन्यावर सट्टा लावण्यासाठी याचा वापर करतात.

कॉल ऑप्शन म्हणजे एका निश्चित किमतीला एखादी मालमत्ता खरेदी करण्याचा अधिकार तर स्ट्राइक प्राईस निश्चित किंमत असते, ज्यावर व्यवहार पूर्ण केला जाऊ शकतो. येथे, स्ट्राइक प्राईस $420, म्हणजेच अंदाजे 39,900 रुपये होती.

त्यावेळी, सोन्याचा भाव सुमारे $427 होता, जो भारतीय रुपयात अंदाजे 40,565 रुपये होता. लक्षात घ्या की ही भारतातील 10 ग्रॅम सोन्याची किंमत नाही, GLD ETF च्या एका युनिटचे डॉलरमधील रुपयांमधील मूल्य आहे.

Maharashtra TimesEPFO Pension: फक्त 10 वर्षं नोकरी, तरी उतारवयात मिळणार पेन्शन; 15000 मूळ पगार असलेल्यांचं संपूर्ण गणित समजून घ्या

सोन्याची आंतरराष्ट्रीय बाजारात कसोटी

अशा परिस्थितीत, सध्या या आठवड्यात अमेरिकेत दोन प्रमुख मॅक्रो इव्हेंट्स होणार आहेत. बुधवारी PCE चलनवाढीची आकडेवारी प्रसिद्ध होणार होईल, जे चलनवाढीचे एक महत्त्वाचे मापक आहे, ज्यावर अमेरिकेची मध्यवर्ती बँक, फेडरल रिझर्व्ह, बारकाईने लक्ष ठेवते.

त्यानंतर, गुरुवारी जॅक्सन होल इकॉनॉमिक सिम्पोझियम सुरू होईल जिथे जगातील आघाडीचे मध्यवर्ती बँकर्स आणि अर्थशास्त्रज्ञ व्याजदर, चलनवाढ आणि अर्थव्यवस्थेवर चर्चा करतील. चलनवाढ जास्त असल्यास किंवा फेड रिझर्व्हने दीर्घकाळासाठी उच्च व्याजदरांचे संकेत दिल्यास डॉलर आणि बॉण्ड यील्ड्स मजबूत होऊ शकतात, जे सोन्यासाठी प्रतिकूल मानले जाते.

गुंतवणूकदारांसाठी महत्त्वाचे संकेत

या संपूर्ण हालचालीचा अर्थ असा नाही की सोन्यातील तेजीचा कल संपला आहे, पण अगदी मोठा ट्रेडरकडूनही चूक होऊ शकते. ऑप्शन्स स्ट्रॅटेजीचा वापर अनेकदा केवळ घसरणीवर डाव लावण्यासाठीच नव्हे, तर आधीच केलेल्या मोठ्या गुंतवणुकीचे संरक्षण करण्यासाठीही केला जातो.

प्रियांका वर्तक

लेखकाबद्दलप्रियांका वर्तकप्रियांका वसंत वर्तक या 2023 पासून महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये डिजिटल कन्टेन्ट प्रोड्युसर पदावर काम करत आहेत. 2015 पासून डिजिटल मीडियामध्ये विविध वेबपोर्टलसाठी काम केले असून क्रीडा आणि बिझनेस यासारख्या विषयांवरील बातम्यांचं लेखन आणि कव्हरेज करायचा दहा वर्षाचा अनुभव आहे.

मुंबई विद्यापीठातून बीएमएम आणि मग मास्टर्सच शिक्षण घेतल्यावर त्यांनी एनडीटीव्हीमध्ये या अग्रगण्य वृत्तवाहिनीमध्ये इंटर्नशीप केली. मग एनबीटी या वृत्तपत्रात शिक्षण आणि मनोरंजन डेस्कवर काम केले. इथे काम करताना त्यांनी शिक्षण व मनोरंजनाशी संबंधित मुलाखती घेतल्या. त्यानंतर 2016 मध्ये फ्री प्रेस जर्नल या इंग्रजी वृत्तपत्रातील ऑनलाईन डिपार्टमेंटमध्ये तीन वर्ष केले जिथे त्यांनी मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील घडामोडींचे कव्हरेज सुरु करून तीन वर्षाचा अनुभव घेतला.

पत्रकारिता क्षेत्रात 15 वर्षांचा अनुभव
2019 मध्ये लेट्सली या मराठी वेबसाईटसाठी क्रीडा क्षेत्रात न्यूज रायटर म्हणून काम केले. मे 2023 मध्ये महाराष्ट्र टाइम्समध्ये सर्वप्रथम कन्सल्टंट म्हणून तीन महिन्यांचा अनुभव घेतला. या दरम्यान बिझनेस आणि क्रीडा क्षेत्रातील घडामोडी जसे की आयपीएल आणि वेगवेगळ्या क्रीडा मालिका तसेच बिझनेसमध्ये वेतन आयोगासह आंतरराष्ट्रीय घडामोडी कव्हर केल्या.

2023 मध्ये फुल-टाइम्स बिझनेस कव्हरेज सुरु केले. व्यापार कार्यक्षेत्रातील बातमी आणि विश्लेषण लेखांना प्राधान्य दिलं. आंतराष्ट्रीय तसेच राष्ट्रीय शेअर मार्केट, रिअल इस्टेट आणि व्यापार उद्योगाशी संबंधित घडामोडी आदी विषयांवर लेख मालिका लिहिले. केंद्रीय अर्थसंकल्प, अमेरिकेसोबत ट्रेड डील आणि त्यांचा जनसामान्यांसोबत भारतीय अर्थव्यवस्थेवर होणार परिणाम यांचे विश्लेषण केले.

शैक्षणिक पात्रता
​प्रियांका वर्तक यांनी 2014 मध्ये विद्याविहार येथील एस.के. सोमैया महाविद्यालयातून मीडिया व जर्नालिसममधून पदवी आणि पदव्युत्तर शिक्षण घेतले. महाविद्यालयीन काळात बॅडमिंटन आणि क्रिकेट यासारख्या खेळात भाग घेऊन पारितोषिके जिंकली. खेळ, चित्रपट, संगीत, पर्यटन यामध्ये प्रियांका यांना रुची आहे.आणखी वाचा



Source link

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत