लावा या भारतीय कंपनीने आपला नवीन ‘Lava Virat V1 Pro 5G’ स्मार्टफोन भारतीय बाजारपेठेत सादर केला आहे. या फोनमध्ये तब्बल 6,000mAh ची शक्तिशाली बॅटरी आणि फोटोसाठी 50-मेगापिक्सलचा मुख्य कॅमेरा देण्यात आला आहे. हा फोन ग्राहकांना सिक्कीम मिडनाईट आणि स्पिती फ्रॉस्ट अशा दोन अतिशय सुंदर रंगांमध्ये खरेदी करता येईल. चला तर मग याविषयीची माहिती पुढे जाणून घेऊया.

स्मार्टफोनचे मुख्य स्पेसिफिकेशन्स आणि फीचर्स
6,000mAh ची तगडी बॅटरी
या फोनचे सर्वात मोठे फीचर्स म्हणजे याची 6,000mAh क्षमता असलेली बॅटरी. कंपनीच्या दाव्यानुसार, ही बॅटरी एका चार्जवर 40 तासांचा टॉकटाईम, 650 तासांचा स्टँडबाय आणि सलग 760 मिनिटांचा युट्युब प्लेबॅक देऊ शकते. चार्जिगसाठी यामध्ये युएसबी टाइप-सी (USB Type-C) पोर्टसह 18W फास्ट चार्जिंगचा सपोर्ट देण्यात आला आहे.
50MP AI मुख्य कॅमेरा
फोटोग्राफीसाठी या फोनच्या पाठीमागे चौकोनी आकाराच्या (Square-shaped) मॉड्यूलमध्ये ड्युअल कॅमेरा सेटअप आहे. यात मुख्य कॅमेरा 50-मेगापिक्सलचा AI सेन्सर आहे. कॅमेरा ॲपमध्ये नाईट मोड, एचडीआर, पोर्ट्रेट, फिल्म, प्रो मोड आणि मोशन फोटो यांसारखे विविध फीचर्स मिळतात. या कॅमेऱ्याने 30fps वर 2K व्हिडिओ रेकॉर्डिंग करता येते. तसेच सेल्फीसाठी समोर 8-मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा दिला आहे.
प्रोसेसर आणि डिस्प्ले
Lava Virat V1 Pro 5G मध्ये ६nm आर्किटेक्चरवर आधारित ऑक्टा-कोर Unisoc T8200 प्रोसेसर वापरण्यात आला आहे, ज्याचा AnTuTu बेंचमार्क स्कोअर 5,00,000 पेक्षा जास्त आहे. फोनमध्ये 6.75 इंचाचा HD+ LCD स्क्रीन आहे, जो 120Hz रिफ्रेश रेटला सपोर्ट करतो.
स्टोरेज आणि सॉफ्टवेअर
या फोनमध्ये 6GB रॅम व्यतिरिक्त आणखी 6GB व्हर्च्युअल रॅम (Virtual RAM) वाढवण्याची सुविधा आहे. फोनचे 128GB स्टोरेज मायक्रोएसडी कार्डच्या मदतीने 1TB पर्यंत वाढवता येते. सॉफ्टवेअरबद्दल बोलायचे झाल्यास, हा फोन अँड्रॉइड 16 (Android 16) ऑपरेटिंग सिस्टमवर चालतो. कंपनीने या फोनसाठी एक ओएस अपग्रेड (OS Upgrade) आणि दोन वर्षांचे सिक्युरिटी अपडेट्स देण्याचे वचन दिले आहे.
इतर फीचर
धूळ आणि पाण्याच्या शिंतोड्यांपासून संरक्षणासाठी या फोनला IP64 रेटिंग मिळाले आहे. सुरक्षेसाठी यामध्ये साईड-माउंटेड फिंगरप्रिंट सेन्सर आणि फेस अनलॉक फीचर उपलब्ध आहे. याशिवाय, लाव्हा कंपनी ग्राहकांना त्यांच्या घरपोच मोफत सेवा देणारी ‘Lava Free Service @ Home’ ही सुविधा देखील संपूर्ण भारतात पुरवणार आहे.

