Headlines

Mumbai Police Administration Takes Strict Action Arrival of Lalbaugcha Raja; बाप्पा सुखरुप सर्व पार पडू दे! भुलेश्वर दुर्घटनेमुळे लालबाग-परळमध्ये कठोर उपाययोजना, आगमनाच्या उत्साहाला सावधगिरीची किनार


Mumbai Lalbaugcha Raja Arrival : भव्य गणेशमूर्तींच्या स्वागतासाठी शेकडो भाविक आणि उत्सव मंडळांचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरले असले, तरी प्रशासन आणि पोलिस यंत्रणा कोणतीही जोखीम न पत्करता प्रत्येक हालचालींवर बारकाईने लक्ष ठेवून होती

Mumbai Lalbaugcha Raja Arrival
मुंबई लालबागचा राजा आगमन सोहळा(फोटोमहाराष्ट्र टाइम्स)
म. टा. प्रतिनिधी, मुंबई : गणेशमूर्ती आगमनाने लालबाग-परळ परिसर रविवारी ढोल-ताशांच्या गजराने दुमदुमून गेला. मात्र, शनिवारी रात्री भुलेश्वर येथील दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर आगमनाच्या उत्साहाला सावधगिरीची किनार लाभल्याचे चित्र दिसून आले.

प्रत्येक हालचालींवर बारकाईने लक्ष

भव्य गणेशमूर्तींच्या स्वागतासाठी शेकडो भाविक आणि उत्सव मंडळांचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरले असले, तरी प्रशासन आणि पोलिस यंत्रणा कोणतीही जोखीम न पत्करता प्रत्येक हालचालींवर बारकाईने लक्ष ठेवून होती. बाप्पाच्या आगमनाच्या आनंदात सुरक्षिततेचा संदेश देत लालबाग-परळ परिसरात अभूतपूर्व पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.

Maharashtra TimesMumbai Crime : प्रेयसीचा नको तो हट्ट, तरुणाने साखरपुडा मोडला, भडकलेल्या तरुणीची मुंबई पोलिसांना खोटी टिप, सोहमच्या घरी छापा टाकताच मोठा उलगडा

गाजावाजा न करता साध्य पद्धतीने मंडपाकडे रवाना

परळ वर्कशॉप, गणसंकुल आणि परिसरातीलविविध कारखान्यांतून भव्य गणेशमूर्ती मंडपांकडे रवाना झाल्या. सोबतच काही नामांकित मंडळांनी पूर्वनियोजित आगमन सोहळा रद्द केला. तसेच काही मंडळांनी कोणताही गाजावाजा न करता साध्य पद्धतीने गणेशमूर्ती मंडपाकडे रवाना केल्या. उंच आणि आकर्षक मूर्ती पाहण्यासाठी सकाळपासूनच भाविकांची मोठी गर्दी उसळली होती. बाप्पाची एक झलक पाहण्यासाठी नागरिकांनी रस्त्यांच्या दुतर्फा गर्दी केली असून, आगमन सोहळ्याचे सर्वांना भावनिक आणि भक्तिमय वातावरण सर्वत्र अनुभवायला मिळत आहे.

उड्डाणपुलाच्या कडेलाही बॅरिकेडींग

परळ वर्कशॉप, आणि गण संकुलच्या प्रवेशद्वारावर मुंबई पोलिसांनी विशेष बॅरिकेड्सची आखणी केली होती. सोबतच जमलेल्या गर्दीचा अडथळा दैनंदिन वाहतुकीला होऊ नये म्हणून पोलिसांनी खबरदारी घेतली होती. तसेच परळ-भायखळा उड्डाणपुलाच्या कडेलाही बॅरिकेडींग करण्यात आली होती. भुलेश्वरमधील दुर्घटनेनंतर कोणतीही अप्रिय घटना घडू नये, यासाठी मुंबई पोलिसांनी विशेष खबरदारी घेतली आहे. लालबाग, परळ, गणसंकुल आणि प्रमुख मार्गांवर स्थानिक पोलिसांसह एसआरपीएफच्या तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत. साध्या वेशातील पोलिस, सीसीटीव्ही कॅमेरे आणि विशेष महिला सुरक्षा पथके परिसरात सतत गस्त घालत होत. मोठ्या प्रमाणावर होणारी गर्दी आणि वाहतुकीचा ताण लक्षात घेऊन वाहतूक पोलिसांनीही पर्यायी मार्गांची व्यवस्था केली होती.

Maharashtra TimesChhatrapati Sambhajinagar : खवड्या डोंगर प्रकरण; कुणालच्या मावशीचा सासरच्या आरोपांवर पलटवार, 20 वर्षांपूर्वीच्या घटनेची आठवण दिली; कौटुंबिक वादाचे पदर आणखी गडद

गणेशमूर्ती आगमन मार्गांची पाहणी करा

भुलेश्वर राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाची गणेशमूर्ती कोसळून झालेल्या अपघातानंतर सर्व गणेश आगमन मार्गांची पाहणी केली जाणार आहे. ‘भुलेश्वर येथील दुर्घटनेच्या चौकशीत नेमकी कारणे समोर येतील आणि त्यानुसार जबाबदारी निश्चित होईल. मात्र, भविष्यात अशा दुर्घटना घडू नयेत यासाठी गणेश मंडळे, महापालिका प्रशासन आणि पोलिस यंत्रणांनी समन्वयाने काम करणे आवश्यक आहे. महापालिकेने येत्या २४ तासांत आगमनाच्या मार्गांची पाहणी करून आवश्यक दुरुस्ती तसेच सुरक्षेच्या उपाययोजनांवर कार्यवाही करावी’, असे निर्देश सांस्कृतिक कार्यमंत्री तथा मुंबई उपनगर पालकमंत्री आशीष शेलार यांनी दिले आहेत.

पार्थिवाचे चंदनवाडी स्मशानभूमीत अंतिम दर्शन

शेलार यांनी मंडळाच्या पदाधिकाऱ्यांची भेट घेत मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबीयांचे सांत्वन केले. तसेच, मृत्युमुखी पडलेले मंडळाचे पदाधिकारी संकेत नेवसे आणि बृजेश जोशी यांच्या पार्थिवाचे चंदनवाडी स्मशानभूमीत अंतिम दर्शन घेतले. यावेळी मंत्री मंगलप्रभात लोढा हेही उपस्थित होते. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीदेखील शनिवारी मध्यरात्री गिरगावच्या एचएन रिलायन्स रुग्णालयात जाऊन जखमींची भेट घेतली.

Maharashtra TimesAmravati Fire : अमरावतीत NICU मध्ये आग, तीन नवजात अर्भकांचा होरपळून मृत्यू; स्वतःचा विचार न करता बाळांना वाचवलं, धाडसी नर्समुळे मोठा हाहाःकार टळला

मृतांच्या वारसांना आर्थिक मदत

या दुःखाच्या प्रसंगी मृतांच्या कुटुंबीयांच्या पाठीशी उभे राहणे हे आपले कर्तव्य आहे. मृतांच्या कुटुंबीयांना शासनाच्यावतीने आर्थिक मदत करण्याची भूमिका राहणार असून, जखमींवर उपचार करणाऱ्या रुग्णालयांना आवश्यक ती सर्व मदत आणि आर्थिक साह्य करण्यात येईल, तसेच मृतांच्या नातेवाइकांना वैयक्तिकरित्या पाच लाखांची मदत देणार असल्याचे शेलार यांनी सांगितले.

प्रशांत पाटील

लेखकाबद्दलप्रशांत पाटीलप्रशांत पाटील ‘महाराष्ट्र टाईम्स ऑनलाईन'(TIL) या आघाडीच्या डिजिटल माध्यम समूहात सीनियर डिजिटल कंन्टेट प्रोड्युसर पदावर कार्यरत आहेत. पुणे जिल्ह्यातील नामांकित ‘थोडक्यात’ न्यूज वेब पोर्टल, हैदराबादमधील ‘आधान शॉर्ट न्यूज अॅप’, ‘सकाळ मिडिया ग्रुप’ आणि आता ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’, असा जवळपास पाच ते साडेपाच वर्षांपेक्षा अधिक काळ ते कार्यरत आहेत. प्रशांत पाटील यांना महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील सर्व गुन्हेगारी, अपघात, शेतकरी विषयक बातम्या, ग्रामीण भागात यश संपादन केलेल्या तरुणी किंवा तरुणांच्या सक्सेस स्टोरीज् आणि महाराष्ट्र हायपर लोकल अशा विविध विषयांची आवड आहे. ऑगस्ट (2026) पासून ‘महाराष्ट्र टाईम्स ऑनलाईन’साठी (TIL) काम करत आहेत. या दरम्यान, राज्यातील विधानसभा, लोकसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकींच्या बातम्यांवर विशेष लक्ष ठेवतात. याआधीही त्यांनी याच माध्यम समूहासोबत तीन वर्ष काम केलं आहे.

प्रशांत पाटील यांनी पुण्यातील नामांकित आबासाहेब गरवारे महाविद्यालयातून मास कम्युनिकेशन विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. शिक्षण घेत असतानाच त्यांनी ‘थोडक्यात’ या न्यूज वेब पोर्टलला काम केलं. तिथे डिजिटल माध्यमासाठी लेखन करत असताना त्यांना डिजिटल क्षेत्रातलं कसं काम करतात? हे यश संपादन केलं. त्यानंतर त्यांना मुंबईत ‘महाराष्ट्र टाइम्य ऑनलाईन’ (TIL) या नामांकित माध्यम समूहामध्ये काम करण्याची संधी मिळाली. 28 मार्च 2022 रोजी ते ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ या मोठ्या ब्रँण्डसोबत पहिल्यांदा जोडले गेले. तिथे त्यांनी प्रदीर्घ काळ म्हणजे तीन वर्ष डिजिटल विभागात काम केलं. त्यांनतर त्यांनी फेब्रुवारी 2025 ला ‘सकाळ मिडिया ग्रुप’ला काम करण्याची संधी मिळाली. परंतु तिथे ते काम करत असताना त्यांना पुन्हा ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ (TIL) या माध्यम समूहाने संधी दिली. त्यानंतर ऑगस्ट 2026 पासून प्रशांत पाटील हे ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’सोबत (TIL) काम करताय.

‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’मध्ये (TIL) काम करताना त्यांना खूप मोठमोठ्या संध्या मिळाल्या. जसे की, व्हिडिओ करणे, महाराष्ट्रातील संपूर्ण जिल्ह्यातील रिपोर्टर यांच्याशी समन्वय साधणे, जिल्हा प्रतिनिधींकडून वेळोवेळी काम करुन घेणे, विशेष आणि काही महत्वाच्या बातम्या मागवून घेणे, अशा बऱ्याच गोष्टींची त्यांना इथे मिळाली. प्रशांत पाटील हे सकाळच्या शिफ्टला काम करत असताना लाईव्ह ब्लॉग, रिपोर्टरशी बोलणे, ब्रेकिंग बातम्या, हायपर लोकल बातम्या, ग्रामीण भागातील सर्व घडामोडींकडे लक्ष देण्याचं काम ते करतात.आणखी वाचा