Headlines

Bank Union Nationwide Strike 2026; बँक संघटनांचा एल्गार, देशव्यापी संपाची हाक; या तारखांना पूर्ण शटडाऊन, अपडेटविषयी माहिती घ्या अन् नाहक हेलपाटे टाळा


Bank Strike in India 2026: देशभरातील बँक कर्मचारी आणि अधिकाऱ्यांच्या संघटनांनी टप्प्याटप्प्यांमध्ये देशव्यापी संपाची घोषणा केली आहे. UFBU ने अलीकडेच दोन प्रमुख मागण्यांसाठी देशव्यापी संप जाहीर केला असून बँकांमधील कर्मचारी आणि अधिकाऱ्यांच्या प्रमुख संघटनांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या या संयुक्त मंचाने रविवारी आठवड्यातून 5 दिवस कामकाज आणि सरकारच्या सुधारित PLI योजनेचा निर्णय मागे घेण्याची मागणी केली.

Bank Unions Strike News 2 Key Demands
2 प्रमुख मागण्यांसाठी बँक कर्मचारी संघटनांचा संप जाहीर(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
Bank Strike in India: बँक कर्मचारी आणि अधिकाऱ्यांच्या प्रमुख संघटनांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या युनायटेड फोरम ऑफ बँक युनियन्सने आठवड्यातून 5 दिवस बँकिंग कामकाज आणि सरकारच्या सुधारित कामगिरी-आधारित प्रोत्साहन योजना किंवा PLI चा निर्णय मागे घेण्याच्या मागण्यांसाठी देशव्यापी संपाची घोषणा केली आहे.

बँकांचा देशव्यापी संप जाहीर

देशभरातील बँक कर्मचारी आणि अधिकाऱ्यांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या संघटनांनी टप्प्याटप्प्यांमध्ये संप जाहीर केला आहे. पहिला संप 11 सप्टेंबर रोजी अखिल भारतीय संपाची घोषणा केली त्यानंतर, 28 ते 30 सप्टेंबर या कालावधीत तीन दिवसांचा संप घोषित केला आहे. तसेच आपल्या मागण्या पूर्ण न झाल्यास त्यांनी 26 ऑक्टोबरपासून अनिश्चित काळासाठी संप पुकारण्याचा इशारा दिला.

Maharashtra TimesGold Silver Rate Today: आठवड्याच्या पहिल्या दिवशीही सोन्याची घोडदौड सुरूच, चांदीच्या किमतीत किंचित घट; आता कुठंवर पोहोचला भाव?

बँक संघटनांनी संपाची घोषणा का केली?

बँक कर्मचारी आणि अधिकारी संघटनांची एक संघटना UFBU ने 5-दिवसीय बँकिंग प्रणाली लागू करण्याची आणि सरकारच्या सुधारित PLI योजना मागे घेण्याची मागणी करत देशव्यापी संपाची घोषणा केली आहे.

UFBU ने म्हटले आहे की, मार्च 2024 मध्ये जारी झालेल्या 12 व्या द्विपक्षीय करार आणि 9 व्या कलमी करारानुसार IBA ने पाच दिवस बँकिंग प्रणाली लागू करण्यास सहमती दर्शवली होती. तसेच 2 वर्षांहून अधिक काळ लोटल्यानंतरही प्रस्ताव अद्याप सरकारी मंजुरीच्या प्रतीक्षेत असल्याचेही संघटनेने पुढे सांगितले असताना या मागणीच्या आधारावर बँक संघटना पाच दिवसांची बँकिंग प्रणाली लागू करण्यासाठी दबाव आणण्याचा प्रयत्न करत आहेत.

Maharashtra Timesएफडीपेक्षा जास्त अन् 100 टक्के परतावा देणारी RBI ची स्कीम; 1000 रुपयांपासून सुरू करून शून्य रिस्कमध्ये होईल Future Secureदुसरीकडे, प्रमुख मागण्यांव्यतिरिक्त बँक युनियन्सनी युनियन्स रिझॉल्व्हसोबत द्विपक्षीय चर्चेद्वारे पीएलआय योजनेत सुधारणा करण्यास आणि पेन्शनमध्ये अपग्रेडेशन व सुधारणा, सर्व पेन्शनधारकांसाठी एकसमान महागाई भत्ता सूत्र आणि NPS अंतर्गत कर्मचाऱ्यांना ओपीएसमध्ये स्विच करण्याचा पर्याय यांसारख्या उर्वरित समस्यांचे निराकरण करण्यासाठी आग्रह धरला. PLI बाबत मुद्दा सध्या मुख्य कामगार आयुक्तांकडे समेट प्रक्रियेअंतर्गत असून त्याबाबत दिल्ली उच्च न्यायालयातही कायदेशीर कार्यवाही सुरू असल्याचेही परिपत्रकात पुढे म्हटले.

बँक संप आणि त्यासंबंधीच्या तारखा

कामगार संघटनांनी सप्टेंबर महिन्यात आंदोलनाचे तीन टप्पे जाहीर केले आहेत.

  • 11 सप्टेंबर रोजी एकदिवसीय देशव्यापी संप
  • 28 ते 30 सप्टेंबर दरम्यान तीन दिवसांचा संप
  • 26 ऑक्टोबरपासून बेमुदत संप

पीएलआय योजनेलाही विरोध

अर्थ मंत्रालयाच्या सुधारित PLI योजनेलाही बँक संघटनांनी विरोध केला असून ही प्रणाली भेदभावपूर्ण असल्याचे UFBF ने आरोप केला. ही योजना स्केल 4 आणि त्यावरील अधिकाऱ्यांना वैयक्तिक कामगिरीच्या आधारावर भरीव प्रोत्साहन मिळवण्याची संधी देते असे संघटनांनी म्हटले. UFBA ने म्हटले की, बहुतेक कर्मचाऱ्यांना जास्तीत जास्त 15 दिवसांच्या मूळ वेतनाइतके आणि महागाई भत्त्याइतके प्रोत्साहन मिळू शकते तर, स्केल IV आणि त्यावरील वरिष्ठ अधिकाऱ्यांना 365 दिवसांच्या मूळ वेतनापर्यंत प्रोत्साहन मिळू शकते.

प्रियांका वर्तक

लेखकाबद्दलप्रियांका वर्तकप्रियांका वसंत वर्तक या 2023 पासून महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये डिजिटल कन्टेन्ट प्रोड्युसर पदावर काम करत आहेत. 2015 पासून डिजिटल मीडियामध्ये विविध वेबपोर्टलसाठी काम केले असून क्रीडा आणि बिझनेस यासारख्या विषयांवरील बातम्यांचं लेखन आणि कव्हरेज करायचा दहा वर्षाचा अनुभव आहे.

मुंबई विद्यापीठातून बीएमएम आणि मग मास्टर्सच शिक्षण घेतल्यावर त्यांनी एनडीटीव्हीमध्ये या अग्रगण्य वृत्तवाहिनीमध्ये इंटर्नशीप केली. मग एनबीटी या वृत्तपत्रात शिक्षण आणि मनोरंजन डेस्कवर काम केले. इथे काम करताना त्यांनी शिक्षण व मनोरंजनाशी संबंधित मुलाखती घेतल्या. त्यानंतर 2016 मध्ये फ्री प्रेस जर्नल या इंग्रजी वृत्तपत्रातील ऑनलाईन डिपार्टमेंटमध्ये तीन वर्ष केले जिथे त्यांनी मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील घडामोडींचे कव्हरेज सुरु करून तीन वर्षाचा अनुभव घेतला.

पत्रकारिता क्षेत्रात 15 वर्षांचा अनुभव
2019 मध्ये लेट्सली या मराठी वेबसाईटसाठी क्रीडा क्षेत्रात न्यूज रायटर म्हणून काम केले. मे 2023 मध्ये महाराष्ट्र टाइम्समध्ये सर्वप्रथम कन्सल्टंट म्हणून तीन महिन्यांचा अनुभव घेतला. या दरम्यान बिझनेस आणि क्रीडा क्षेत्रातील घडामोडी जसे की आयपीएल आणि वेगवेगळ्या क्रीडा मालिका तसेच बिझनेसमध्ये वेतन आयोगासह आंतरराष्ट्रीय घडामोडी कव्हर केल्या.

2023 मध्ये फुल-टाइम्स बिझनेस कव्हरेज सुरु केले. व्यापार कार्यक्षेत्रातील बातमी आणि विश्लेषण लेखांना प्राधान्य दिलं. आंतराष्ट्रीय तसेच राष्ट्रीय शेअर मार्केट, रिअल इस्टेट आणि व्यापार उद्योगाशी संबंधित घडामोडी आदी विषयांवर लेख मालिका लिहिले. केंद्रीय अर्थसंकल्प, अमेरिकेसोबत ट्रेड डील आणि त्यांचा जनसामान्यांसोबत भारतीय अर्थव्यवस्थेवर होणार परिणाम यांचे विश्लेषण केले.

शैक्षणिक पात्रता
​प्रियांका वर्तक यांनी 2014 मध्ये विद्याविहार येथील एस.के. सोमैया महाविद्यालयातून मीडिया व जर्नालिसममधून पदवी आणि पदव्युत्तर शिक्षण घेतले. महाविद्यालयीन काळात बॅडमिंटन आणि क्रिकेट यासारख्या खेळात भाग घेऊन पारितोषिके जिंकली. खेळ, चित्रपट, संगीत, पर्यटन यामध्ये प्रियांका यांना रुची आहे.आणखी वाचा