Headlines

Mumbai Bhuleshwar Raja Ganapati Idol Collapsed on Arrival Two Death 22 Year Old Decision Discussed Again; भुलेश्वर दुर्घटनेनंतर 22 वर्षांपूर्वीच्या निर्णयाची पुन्हा चर्चा, मुंबईत बाप्पाच्या आगमनावेळी नेमकं काय घडलं?


Mumbai Bhuleshwarcha Raja Idol Incident : ‘आगमन आणि विसर्जनावेळी अशा घटना टाळण्यासाठी बृहन्मुंबई सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीकडून बैठक बोलावण्यात येणार आहे. यामध्ये ट्रॉलीची उंची, मजबुती, उंची असे विषय हाताळण्यात येतील’, असं बृहन्मुंबई सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीचे अध्यक्ष अॅड. नरेस दहिबावकर यांनी म्हटलं आहे.

Mumbai Bhuleshwarcha Raja Idol Incident
भुलेश्वरचा राजा गणपती मूर्ती कोसळली(फोटोमहाराष्ट्र टाइम्स)
म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई : भुलेश्वर येथे गणेशमूर्तीच्या आगमनावेळी शनिवारी मूर्ती कोसळून घडलेल्या दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर मुंबईच्या गणेशोत्सवातील गणेशमूर्तींच्या वाढत्या उंचीचा प्रश्न पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. १८ फुटांहून उंच मूर्ती नको, हा सन २००४च्या सुमारास साळगावकर समितीने घेतलेला निर्णय सन २००९पासून मागे पडला असून, आता गणेशमूर्तींच्या उंचीवर कोणाचेच नियंत्रण राहिले नसल्याचे दिसत आहे.

कार्यशाळांमधून मंडपांपर्यंत जाण्याचा प्रदीर्घ प्रवास

मुंबईच्या सार्वजनिक गणेशोत्सवामध्ये पर्यटकांना उंच मूर्तींचे आकर्षण असले आणि या मूर्तींच्या उंचीभोवती आर्थिक समीकरणे फिरत असली, तरी मुंबईतील रस्ते, खड्डे, स्पीडब्रेकर, पूल आणि मूर्तिकारांच्या कार्यशाळांमधून मंडपांपर्यंत जाण्याचा प्रदीर्घ प्रवास या अडचणींचा विचार करता गणेशमूर्तींच्या उंचीची स्पर्धा थांबायला हवी, असे मत गणेशभक्तांकडून व्यक्त होत आहे.

Maharashtra TimesKannad Ghat : काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; काठड्यावर लटकली एसटी बस, खिडकीतून उड्या मारून 49 प्रवाशांनी वाचवला जीव

भुलेश्वरमधील दुःखद वातावरणाला समोरे

शनिवारच्या दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर विविध मंडळांच्या पदाधिकाऱ्यांनी एकीकडे भुलेश्वरमधील दुःखद वातावरणाला समोरे जाताना, साळगावकर समितीने सन २००४च्या सुमारास घेतलेल्या १८ फुटांच्या वर मूर्ती नको, या निर्णयाचीही आठवण करून दिली. त्यावेळची मूर्तींच्या उंचीवर निर्बंध हवे, हा निर्णय चार ते पाच वर्षे पाळला गेला. मात्र, मंडळांनी केलेले सर्वेक्षण, त्यानंतर मूर्तिकारांनी उंच मूर्ती घडवण्यासाठी व्यक्त केलेली इच्छा या पार्श्वभूमीवर सन २००९पासून उंच मूर्तींची स्पर्धा वाढत गेल्याचे सांगण्यात येत आहे. दक्षिण मुंबईतील अनेक मंडळांमध्ये २० ते २२ फुटांहून उंच मूर्तीची प्रतिष्ठापना केली जाते.

प्रभावळींची उंचीही वाढतेय

उपनगरांतील मंडळेही या स्पर्धेत आता पुढे आली असून, मुंबईमध्ये ३० फुटांच्या वर गणेशमूर्ती आणणारी १० ते १५ मंडळे कार्यरत आहेत. तर, २५ फुटांच्या वरची ६० ते ७० आणि २० ते २५ फुटांच्या उंचीची गणेशमूर्ती आणणाऱ्या मंडळांची संख्या १५०च्या आसपास असेल. सार्वजनिक गणेश मंडळांच्या मूर्तींसोबतच प्रभावळींची उंचीही वाढताना दिसत आहे. अधिक आकर्षक आणि भव्य सजावटीसाठी मंडळांमध्ये उंच प्रभावळी उभारण्याची स्पर्धा लागल्याचे चित्र आहे. यामुळे पुलाखालून जाताना प्रभावळी तुटणे, प्रभावळीमुळे अडचण निर्माण झाल्याच्याही घटना घडलेल्या आहेत.

Maharashtra TimesChhatrapati Sambhajinagar : ‘आमचं सर्व संपलं, आता वंशच नाही’; वृद्ध बापाचा काळीज चिरणारा आक्रोश, म्हातारपणी होतकरु लेकराला खांदा, उपस्थितांचाही कंठ दाटला

मूर्तींच्या उंचीची स्पर्धा नियंत्रणात येणे आवश्यक

मुंबईतील उंच मूर्ती हे पर्यटकांसाठी आकर्षण असले तरी मूर्तींच्या उंचीची स्पर्धा नियंत्रणात येणे आवश्यक आहे, याकडे मंडळाचे पदाधिकारी लक्ष वेधत आहेत. २० ते २५ फुटांदरम्यान मूर्तीची उंची असेल तर मंडळांना रस्त्यांपासून झाडांच्या फांद्यांपर्यंतच्या समस्यांना तोंड देणे अधिक सोपे होते. त्यामुळे ही आदर्श उंची असावी, असेही सांगण्यात येत आहे. २५ फुटांच्या वर मूर्तीची उंची गेली की त्यातील धोका अधिक वाढतो. मुंबईमध्ये गेल्या वर्षी सहा फुटांवरील ४ हजार ३८५ मूर्तींचे विसर्जन झाल्याची माहिती बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली. त्यामुळे हा वाढता आकडा लक्षात घेता या विषयाचा विचार अधिक गांभीर्याने होण्याची गरज व्यक्त होत आहे.

सगळ्याविरोधात रोषाचे वातावरणही

भुलेश्वर दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील रस्त्यांच्या अवस्थेकडेही लक्ष वेधले जात आहे. आगमन, विसर्जनाच्या मार्गावरील खड्डे, उंच-सखल भाग दुरुस्त करणे, स्पीड ब्रेकर काढून टाकणे तसेच झाडांच्या फांद्यांची छाटणी करणे याची गरज मंडळांतर्फे व्यक्त केली जात आहे. पूरस्थितीपासून रक्तदानापर्यंत मुंबईकरांच्या मदतीला धावून येणाऱ्या मंडळांसाठी प्रशासन या व्यवस्था निर्माण करू शकत नाही, तसेच यंदा न्यायालयातील प्रकरणामुळे पोलिस, वाहतूक विभाग आणि महापालिका अधिकाऱ्यांसोबत बैठकांना झालेला उशीर या सगळ्याविरोधात रोषाचे वातावरणही निर्माण झाले आहे.

Maharashtra TimesKanbai Mahotsav : साडेचार हजार वर्षांपूर्वीची परंपरा, खान्देशातील प्रसिद्ध कानबाई माता उत्सव नेमका काय आहे? जाणून घ्या A टू Z

मूर्तीच्या पायाशी असलेले वजनही वाढवले जाते

आगमन मिरवणुकांमध्ये मूर्तींच्या वाढत्या उंचीबरोबर, मूर्तीचा तोल सांभाळण्यासाठी मूर्तीच्या पायाशी असलेले वजनही वाढवले जाते. काही वेळा वजनाचा तोल न पेलवल्याने ट्रॉलीचे चाक निखळल्याची घटनाही घडली आहे. त्यामुळे अशा वेळी मूर्तीचा तोल खरोखरच नीट सांभाळला जातो आहे का, हा तोल कसा सांभाळायचा, मोठ्या मूर्तींसाठी ट्रॉली किती मोठी हवी, ट्रॉलीला मूर्तीचे वजन पेलत आहे का, यासाठी आता समितीतील विविध तज्ज्ञांशी, पदाधिकाऱ्यांशी मंडळांच्या कार्यकर्त्यांची चर्चा होत आहे. अनेक मंडळांनी ट्रॉलीवर आता लहान मुलांना बसवायचे नाही, असाही निर्णय घेतल्याचे सांगण्यात येत आहे. यंदाच्या घटनेनंतर पुढच्या वर्षी उंचीवर मर्यादा येतील, याची कोणतीही खात्री देता येत नसली तरी येत्या काळात तांत्रिकदृष्ट्या अधिक काळजी घेण्याचा विचार होईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

भुलेश्वर दुर्घटना वेल्डिंग तुटल्याने?

भुलेश्वरच्या राजाची मूर्ती पडण्यामागे वेगवेगळी कारणे पुढे येत असली तरी मूर्तीला आधार देण्यासाठी पाठीमागे करण्यात आलेली लोखंडी रचना आणि त्याला मूर्तीशी जोडण्यात आलेले वेल्डिंग तुटल्याने ही घटना घडल्याचा प्राथमिक अंदाज आहे. या प्रकरणी लोकमान्य टिळक मार्ग पोलिसांनी अपमृत्यूची नोंद करून चौकशी सुरू केली आहे.

Maharashtra TimesKhavdya Dongar : ‘आयफोनचा काहीही संबंध नाही, कुणालला असं करायचंच नव्हतं’; वादामागचं जुनं कारण समोर, आजोबांनी सांगितली धक्कादायक वस्तुस्थिती
शनिवारी रात्री भुलेश्वरच्या राजाची मूर्ती पडल्याचे कळताच वरिष्ठ पोलिस अधिकारी घटनास्थळी पोहोचले. लोकमान्य टिळक मार्ग पोलिस ठाण्यात अपमृत्यूची नोंद करण्यात आली. मिरवणुकीदरम्यान ट्रॉलीवर असलेल्या कार्यकर्त्यांचे जबाब नोंदविण्यात आले आहेत. त्यांनी दिलेल्या जबाबानुसार’ मूर्तीला मागील बाजूने आधार देण्यासाठी विशेष रचना करण्यात आली होती. या लोखंडी रचनेसोबत मूर्ती वेल्डिंगने जोडण्यात आली होती. मूर्ती पुढे पुढे नेत असताना वेल्डिंगमध्ये अडचणी येत असल्याने दोन ते तीनवेळा मिरवणूक थांबविण्यात आली होती. मात्र मंडपापासून ५० मीटरवर असतानाच हे वेल्डिंग तुटल्याची माहिती त्यांनी जबाबात दिल्याचे पोलिसांनी म्हटले आहे. अग्निशमन दलाचाही प्राथमिक अंदाज तसाच असल्याचे अधिकाऱ्याने सांगितले.

प्रशांत पाटील

लेखकाबद्दलप्रशांत पाटीलप्रशांत पाटील ‘महाराष्ट्र टाईम्स ऑनलाईन'(TIL) या आघाडीच्या डिजिटल माध्यम समूहात सीनियर डिजिटल कंन्टेट प्रोड्युसर पदावर कार्यरत आहेत. पुणे जिल्ह्यातील नामांकित ‘थोडक्यात’ न्यूज वेब पोर्टल, हैदराबादमधील ‘आधान शॉर्ट न्यूज अॅप’, ‘सकाळ मिडिया ग्रुप’ आणि आता ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’, असा जवळपास पाच ते साडेपाच वर्षांपेक्षा अधिक काळ ते कार्यरत आहेत. प्रशांत पाटील यांना महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील सर्व गुन्हेगारी, अपघात, शेतकरी विषयक बातम्या, ग्रामीण भागात यश संपादन केलेल्या तरुणी किंवा तरुणांच्या सक्सेस स्टोरीज् आणि महाराष्ट्र हायपर लोकल अशा विविध विषयांची आवड आहे. ऑगस्ट (2026) पासून ‘महाराष्ट्र टाईम्स ऑनलाईन’साठी (TIL) काम करत आहेत. या दरम्यान, राज्यातील विधानसभा, लोकसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकींच्या बातम्यांवर विशेष लक्ष ठेवतात. याआधीही त्यांनी याच माध्यम समूहासोबत तीन वर्ष काम केलं आहे.

प्रशांत पाटील यांनी पुण्यातील नामांकित आबासाहेब गरवारे महाविद्यालयातून मास कम्युनिकेशन विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. शिक्षण घेत असतानाच त्यांनी ‘थोडक्यात’ या न्यूज वेब पोर्टलला काम केलं. तिथे डिजिटल माध्यमासाठी लेखन करत असताना त्यांना डिजिटल क्षेत्रातलं कसं काम करतात? हे यश संपादन केलं. त्यानंतर त्यांना मुंबईत ‘महाराष्ट्र टाइम्य ऑनलाईन’ (TIL) या नामांकित माध्यम समूहामध्ये काम करण्याची संधी मिळाली. 28 मार्च 2022 रोजी ते ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ या मोठ्या ब्रँण्डसोबत पहिल्यांदा जोडले गेले. तिथे त्यांनी प्रदीर्घ काळ म्हणजे तीन वर्ष डिजिटल विभागात काम केलं. त्यांनतर त्यांनी फेब्रुवारी 2025 ला ‘सकाळ मिडिया ग्रुप’ला काम करण्याची संधी मिळाली. परंतु तिथे ते काम करत असताना त्यांना पुन्हा ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ (TIL) या माध्यम समूहाने संधी दिली. त्यानंतर ऑगस्ट 2026 पासून प्रशांत पाटील हे ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’सोबत (TIL) काम करताय.

‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’मध्ये (TIL) काम करताना त्यांना खूप मोठमोठ्या संध्या मिळाल्या. जसे की, व्हिडिओ करणे, महाराष्ट्रातील संपूर्ण जिल्ह्यातील रिपोर्टर यांच्याशी समन्वय साधणे, जिल्हा प्रतिनिधींकडून वेळोवेळी काम करुन घेणे, विशेष आणि काही महत्वाच्या बातम्या मागवून घेणे, अशा बऱ्याच गोष्टींची त्यांना इथे मिळाली. प्रशांत पाटील हे सकाळच्या शिफ्टला काम करत असताना लाईव्ह ब्लॉग, रिपोर्टरशी बोलणे, ब्रेकिंग बातम्या, हायपर लोकल बातम्या, ग्रामीण भागातील सर्व घडामोडींकडे लक्ष देण्याचं काम ते करतात.आणखी वाचा