Headlines

Gadchiroli News: भामरागडमध्ये रानडुकराचा हल्ला; रुग्णवाहिका नाही, रस्त्याअभावी जखमींना कावडीतून दवाखान्यात नेण्याची वेळ – gadchiroli bhamragad wild boar attacks 50 yrs old man in villagers carry injured patient hospital on bamboo stretcher


Gadchiroli News: भामरागड तालुक्यातील दर्भा परिसरात रानडुकराच्या हल्ल्यात जखमी झालेल्या व्यक्तीला बांबूच्या कावडीतून दवाखान्यात नेलं.

gadchiroli news
गडचिरोली(फोटोमहाराष्ट्र टाइम्स)
म. टा. वृत्तसेवा, गडचिरोली : रानडुकराच्या हल्ल्यात जखमी झालेल्या व्यक्तीला उपचारासाठी चक्क बांबूच्या कावडीवरून डोंगरदऱ्या पार करत मुख्य रस्त्यापर्यंत आणावे लागले. गडचिरोलीच्या भामरागड तालुक्यातील दर्भा परिसरात ही धक्कादायक घटना समोर आली आहे.

दर्भा परिसरात गेल्या दोन दिवसांत रानडुकरामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. यातच मुल्ला चैतू पिडसे (५०) हे जंगलात गेले असताना अचानक रानडुकराने त्यांच्यावर हल्ला केला. या हल्ल्यात त्यांच्या पोटावर गंभीर जखमा झाल्या. सोबत असलेल्या नागरिकांनी आरडाओरडा केल्याने रानडुकराने पळ काढला. मात्र, जखमी अवस्थेत त्यांना तातडीने रुग्णालयात नेणे आवश्यक होते. परंतु, दुर्गम भागात रस्ता नसल्याने रुग्णवाहिका पोहोचू शकली नाही. त्यामुळे ग्रामस्थांनी बांबूची कावड तयार करून जखमींना जवळपास एक किलोमीटर अंतर पायी चालत मुख्य रस्त्यापर्यंत आणले. त्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले.

Maharashtra TimesAaple Sarkar Portal Closed: ‘आपले सरकार’ पोर्टल बंद; महा-ई-सेवाचे कामकाज खोळंबले, राज्यभरातील विद्यार्थ्यांसह नागरिक संतप्त
दरम्यान, १ मे रोजी याच भागात मादी टुगे पुंगाटी (४५) या महिलेवरही रानडुकराने हल्ला केला. या घटनेत त्यांच्या पायाला गंभीर दुखापत झाली आहे. दोन्ही जखमींवर सध्या उपचार सुरू असून प्रकृती स्थिर असल्याची माहिती आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे.

Maharashtra TimesPune Nasrapur Case : वीज गेली, सीसीटीव्ही बंद पडले, पण मंदिरासमोरील घरात बॅटरीवरचा CCTV ठरला दुवा; भोरच्या विकृताला 20 वर्षांपूर्वीच झालेली गावबंदी
‘जखमींना तातडीने आर्थिक मदत द्या’
तेंदूपत्ता हंगामाच्या पार्श्वभूमीवर जंगलात वावर वाढत असताना अशा हल्ल्यांची मालिका सुरू झाल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. वनविभागाने तातडीने उपाययोजना कराव्यात, तसेच जखमींना आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी स्थानिकांकडून होत आहे. दुर्गम भागातील रस्त्यांच्या अभावामुळे नागरिकांना आजही अशा संकटांना सामोरे जावे लागत असल्याचे या घटनेतून स्पष्ट झाले आहे.

किशोरी तेलकर

लेखकाबद्दलकिशोरी तेलकर किशोरी तेलकर

किशोरी तेलकर महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये कन्सल्टंट या पदावर कार्यरत आहेत. किशोरी या २०२२पासून मटा ऑनलाइन सोबत जोडलेल्या आहेत. राजकारण, हायपर लोकल स्टोरी, क्राईम बातम्या, महिलांविषयक समस्या, गाव खेड्यातल्या बातम्या करण्याचा त्यांचा अनुभव आहे.

पत्रकारितेतील अनुभव
किशोरी यांना वृत्तपत्र, टीव्ही आणि डिजिटल माध्यमांमधील ६ वर्षांचा अनुभव आहे. किशोरी यांनी सकाळ वृत्तपत्रातून पत्रकारितेला सुरुवात केली. सकाळ वृत्तपत्रात काम करतांना त्यांनी प्रिंट मीडियासोबतच सोशल मीडिया हॅंडलिंग, वेबसाईटचेही काम केलं आहे. सध्या चार वर्षांपासून त्या महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये कार्यरत आहेत. लेखन कौशल्याच्या जोरावर सामाजिक समस्या, शाळा- कॉलेज विद्यार्थी समस्या, आरोग्य टिप्स, महिलांविषयक प्रश्न, फॅशन, लाइफस्टाइल या विविध विषयांवर त्यांनी बातम्या केल्या आहेत.

शैक्षणिक पात्रता
किशोरी तेलकर यांनी कै. बिंदू रामराव देशमुख कला व वाणिज्य महिला महाविद्यालय, नाशिकरोड येथून एम.कॉम पदवी संपादन केली. त्यानंतर गोखले एज्युकेशन सोसायटीचे एच.पी.टी आर्ट्स अँड आर.वाय.के सायन्स कॉलेजमधून कम्युनिकेशन अँड जर्नलिझम विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. जर्नलिझमचे शिक्षण घेत असतानाच किशोरी यांनी देशदूत, दिव्यमराठी सारख्या वृत्तपत्रात इंटर्नशिप केलेली आहे. मराठी भाषेवर प्रभुत्व असून हिंदी, इंग्रजी भाषाही त्यांना अवगत आहेत.आणखी वाचा