धनादेश/चेकबुकमध्ये बदल होणार
बँकिंग क्षेत्रात एक मोठा बदल घडणार असून यानुसार पुढील काही दिवसांत तुमचे जुने चेकबुक केवळ कागदांचा गठ्ठा बनून राहतील. चेक क्लोनिंग, फसवणूक आणि क्लिअरिंगसाठी लागणाऱ्या दीर्घ कालावधीपासून ग्राहकांना वाचवण्यासाठी बँकांनी नवीन सुरक्षा प्रणाली असलेली चेकबुक जारी करणे सुरू केले आहे. या नवीन मॉडेलनुसार आता बँक ऑफ इंडियासह अनेक बँकांनी आपल्या ग्राहकांना नवीन अल्फान्यूमेरिक कोड असलेली चेकबुक वापरण्याचा सल्ला दिला असून 31 डिसेंबर 2026 नंतर केवळ अल्फान्यूमेरिक कोड असलेले चेकच वैध मानले जातील.
Real Estate: बिल्डर अन् जमीन मालक दोघांसाठी फायद्याचा आहे JDA करार; पूर्ण समजून घ्या, नंतर कटकट नको!
चेकबुकमध्ये नेमकं काय बदललं?
आतापर्यंत बँकेच्या जुन्या चेकबुकमधील प्रत्येक चेकच्या तळाशी छापलेला चेक क्रमांक आणि MICR कोड केवळ अंकांच्या स्वरूपात असायचा, पण आता यामध्ये बदल केला गेला आहे. नव्या चेकबुकमध्ये आता या अंकांसोबतच विशेष अक्षरे, म्हणजेच वर्णमाला, यांचाही वापर केला जाईल.
नवीन चेकबुकमध्ये विशेष वॉटरमार्क, अतिनील (UV) प्रकाशात दिसणारी अदृश्य शाई आणि मायक्रो-प्रिंटिंग यांचा वापर केला जाईल, ज्यांची उघड्या डोळ्यांनी नक्कल करणे जवळजवळ अशक्य आहे. याशिवाय चेक रिझर्व्ह बँकेच्या ‘पॉझिटिव्ह पे सिस्टीम’सोबत पूर्ण सुसंगत काम करतात.
Gold Silver Price Hike Explained: अरे देवा! रक्षाबंधनपूर्वी सोने-चांदी रंगात आले; पिवळसर झळाळी पुन्हा 1.62 लाखांवर, चांदीतही मोठी वाढ31 डिसेंबर 2026 नंतर 50000 रुपये किंवा त्याहून अधिक रकमेचे, ज्यांवर नवीन विशेष कोड नाही असे जुने चेक स्वीकारले जाणार नाहीत. हा कोड अक्षरे आणि अंकांचे अद्वितीय संयोजन आहे, ज्यामुळे चेकच्या सत्यतेची त्वरित पडताळणी करता येते, ज्यामुळे रिझर्व्ह बँकेच्या चेक ट्रंकेशन सिस्टम – CTS – अंतर्गत डिजिटल क्लिअरन्सला लक्षणीय गती मिळेल.
नवीन चेकबुक शुल्क आणि बँकेचे नियम
नवीन चेकबुक जारी करण्याचे शुल्क खात्याच्या प्रकारानुसार बँकांचे वेगवेगळे असू शकतात
बँक ऑफ इंडिया: बचत खात्यांसाठी वार्षिक 25 पानांचे एक चेकबुक विनामूल्य दिले जाते. त्यानंतर प्रत्येक अतिरिक्त पानासाठी 5 रुपये शुल्क आकारले जाते.
सरकारी स्कीमच्या गुंतवणुकीतून मिळवा लाखोंचा निधी; महिन्याला 2000, 5000 किंवा 10000 रुपये गुंतवल्यास फक्त व्याजाचे मिळतील 37 लाखइतर बँका: इतर सार्वजनिक आणि खाजगी बँकांसाठी हे शुल्क त्यांच्या स्वतःच्या नियमांनुसार वेगवेगळे असू शकते.
वापरलेले vs नवीन चेकुबुक
| जुनी चेकबुक | नवीन (अल्फा-न्यूमेरिक) चेकबुक |
|---|---|
| फक्त अंकांमध्येच (Digits) संख्या असतात. | अंक आणि अक्षरे (अल्फा-न्यूमेरिक) चे कॉम्बिनेशन असेल |
| सुरक्षा नियम साधारण असायचे | अत्याधुनिक वॉटरमार्क आणि अदृश्य – UV – शाईने संरक्षित |
| चेकमध्ये फेरफार करणे किंवा बनावट तयार करणे सोपे होते | नवीन कोड आणि सुरक्षा वैशिष्ट्यांमुळे चेकची नक्कल करणे अशक्य आहे |
| डिजिटल स्कॅनिंग आणि क्लिअरिंगला वेळ लागायचा | ऑटोमॅटिक स्कॅनिंगमुळे जलद मंजुरी मिळते. |
| पॉझिटिव्ह पे थेट प्रणालीशी जोडलेले नव्हते. | पॉझिटिव्ह पे सिस्टमसोबत पूर्णपणे एकात्मिक आहे. |
| उरलेली पाने संपेपर्यंतच वैध असायचे | बँकांकडून आता हेच चेकबुक जारी केले जाते |

