![]()
वाहिन्यांवर आपल्या विनोदाने प्रेक्षकांना खळखळून हसवणारी ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम अभिनेत्री वनिता खरात सध्या एका मोठ्या मानसिक धक्क्यातून जात आहे. एका नामांकित कुरिअर कंपनीच्या नावाखाली सायबर गुन्हेगारांनी वनिताला लक्ष्य केले असून, तिचे व्हॉट्सॲप हॅक करून तिच्या मित्रपरिवाराची आर्थिक फसवणूक केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. वनिताने स्वतः इन्स्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर करत या भयानक अनुभवाचा खुलासा केला असून चाहत्यांना सावध राहण्याचे आवाहन केले आहे. पार्सलच्या बहाण्याने काही सेकंदांत खेळ खल्लास! नेमकं काय घडलं, याचा थरार सांगताना वनिता म्हणाली की, तिला एका अज्ञात नंबरवरून फोन आला. समोरील व्यक्तीने आपण ‘ब्लू डार्ट’ कुरिअर कंपनीमधून बोलत असल्याचे सांगितले. “तुमचे एक पार्सल आले आहे, पण डिलिव्हरी बॉयला तुमचा पत्ता सापडत नाहीये. मी सांगतो त्या नंबरवर तुमचा पत्ता पाठवा,” असे त्या फोनवर सांगण्यात आले. वनिताने सुरुवातीला संशय व्यक्त केला की, “माझा पत्ता आधीच ॲपवर सेव्ह असतो, मग असे कसे होईल?” मात्र, समोरील व्यक्तीने वारंवार फोन केल्यामुळे विश्वासाने वनिताने त्याने दिलेला नंबर डायल केला. हा नंबर डायल करताच अवघ्या काही सेकंदांत वनिताच्या फोनमधील व्हॉट्सअॅप आपोआप लॉगआऊट झाले आणि हॅकर्सनी तिच्या अकाऊंटवर पूर्ण ताबा मिळवला. अडचणीचे नाटक करून मागितले 62 हजार रुपये हॅकर्स एवढ्यावरच थांबले नाहीत, तर त्यांनी वनिताचे येणारे सर्व कॉल्स त्यांच्या नंबरवर वळवले (कॉल फॉरवर्डिंग), ज्यामुळे तिला कोणाचे फोन येणे बंद झाले. त्यानंतर हॅकर्सनी वनिताच्या व्हॉट्सॲपवरून तिच्या कॉन्टॅक्ट लिस्टमधील सर्व मित्रमैत्रिणींना आणि नातेवाईकांना मेसेज पाठवण्यास सुरुवात केली. “मी सध्या खूप मोठ्या अडचणीत अडकले आहे, मला तातडीने मदत हवी आहे. कृपया मला 62 हजार रुपये पाठवा,” असा मेसेज हॅकर्सनी फिरवला. वनिता खरोखरच संकटात असावी या काळजीपोटी तिच्या काही जवळच्या मित्रांनी कोणताही विचार न करता हॅकर्सनी दिलेल्या खात्यावर पैसे ट्रान्सफर देखील केले. कुरिअर कंपन्यांच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह? या फसवणुकीनंतर वनिताने थेट ब्लू डार्टसारख्या मोठ्या कुरिअर कंपन्यांच्या कार्यपद्धतीवर प्रश्न उपस्थित केले आहेत. ग्राहकांचा वैयक्तिक डेटा या कंपन्यांमधून लीक कसा होतो? आणि त्यांच्या नावाचा वापर करून असे स्कॅम होत असताना कंपन्या याकडे दुर्लक्ष का करत आहेत? असा संतप्त सवाल तिने विचारला आहे. अभिनेत्रीचे चाहत्यांना महत्त्वाचे आवाहन अशा प्रसंगात त्या एका क्षणात आपल्याला काहीच सुचत नाही आणि आपण बळी पडतो,” असे सांगत वनिताने खालील गोष्टींची काळजी घेण्याचे सांगितले आहे:
Source link
'हास्यजत्रा' फेम वनिता खरात सायबर भामट्यांच्या जाळ्यात:ब्लू डार्टच्या नावाने मोठा स्कॅम; व्हॉट्सॲप हॅक करून मित्रांना लुटले
