Headlines

Mumbai Ghatkopar Daughter in Law Sapna Ganji Killed by her Mother in Law who Gave of Three Lakhs to House Maid Family; मिरची पूड टाकून बेसावध केलं, घरातच निर्घृणपणे संपवलं, सुनेचा काटा काढण्यासाठी सासूची मोलकरिणीच्या कुटुंबाला सुपारी; मुंबईत खळबळ


Mumbai Crime News : मुंबईमधील घाटकोपरमध्ये एक संतापजनक तथा धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. जुन्या वादाच्या रागातून सासूने आपल्याच सुनेला मारण्यासाठी घरातील मोलकरिणीच्या कुटुंबाला सुपारी दिली होती.

Ghatkopar Daughter in law Killed
घाटकोपर सुनेची हत्या(फोटोमहाराष्ट्र टाइम्स)
म.टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई : सासू-सुनांमधील वाद हे काही नवीन नाहीत. कधी हुंड्यासाठी तर कधी आपले ऐकत नाही म्हणून सूनेचा छळ करण्याचे प्रकार वारंवार समोर येत असतात. परंतु घाटकोपरमध्ये सासू-सुनेच्या नात्यातील भयंकर प्रकार समोर आला आहे. एखाद्या क्रूर गुन्हेगाराप्रमाणे सासू आणि मोलकरिणीच्या कुटुंबीयांनी सुनेला ठार केले. आधी मिरची पूड टाकून बेसावध केले, नंतर तिचा गळा आवळला. तरीही जीव जात नसल्याचे पाहून तिच्या गळ्यावर पाय ठेवून उभे राहिले. या प्रकरणी सासूसह मोलकरीण, तिचा पती, तिची मुलगी आणि मुलाला पोलिसांनी अटक केली आहे.

रात्री घरातील बाथरूममध्ये पडून त्यांचा मृत्यू

सपना गंजी (वय ३५) असे मृत विवाहितेचे नाव आहे. त्या लक्ष्मीनगर येथील त्रिवेणी इमारतीत राहत होत्या. १६ ऑगस्ट रोजी रात्री घरातील बाथरूममध्ये पडून त्यांचा मृत्यू झाला, अशी माहिती पोलिसांना देण्यात आली. पंतनगर पोलिसांनी पाहणी केली तेव्हा मृत सपना यांचा गळा आवळण्यात आल्याचे पोलिसांना आढळले. शवचिकित्स मृत्यूपूर्वी सपना यांच्या डोळ्यांत मिरची पूड फेकण्यात आली, त्यांच्या डोक्यात अवजड वस्तूचा घाव घालण्यात आला, अखेर गळा आवळून त्यांची हत्या करण्यात आली, असे स्पष्ट झाले.

Maharashtra TimesTukaram Mundhe : सुट्या खाद्यतेलाच्या विक्रीवर पूर्णपणे बंदी, तुकाराम मुंढेंचे महत्त्वपूर्ण आदेश, सात वर्षांपर्यंत कारावासाची तरतूद

सपनाच्या हत्येसाठी तीन लाखांची सुपारी

पंतनगर पोलिस ठाण्याच्या वरिष्ठ पोलिस निरीक्षक लता सुतार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी सपना यांच्या सासू धनलक्ष्मी यांच्याकडे कसून चौकशी सुरू केली. सुरुवातीला दिशाभूल करणाऱ्या धनलक्ष्मी हिने गुन्हा केल्याची कबुली दिली. मोलकरीण मंगला जाधव आणि तिच्या कुटुंबाला सपनाच्या हत्येसाठी तीन लाखांची सुपारी दिल्याचे तिने सांगितले. घटना घडली तेव्हा सपना घरी एकट्याच होत्या. ठरलेल्या कटानुसार मंगला, तिचा पती सुरेश, मुलगी शिवानी, मुलगा साजन घरात घुसले आणि त्यांनी सपनाची हत्या केली.

दोन वर्षांपूर्वीच हिंसाचाराची तक्रार

दोन वर्षांपूर्वी सपना यांनी सासरच्या मंडळींविरोधातनालासोपारा पोलिस ठाण्यात कौटुंबिक हिंसाचाराची तक्रारकेली होती. त्या आधारे धनलक्ष्मी यांच्यासह इतरांविरोधात गुन्हा नोंद झाला होता. तेव्हापासून धनलक्ष्मीचा सपनावर राग होता. तसेच, सपना कामानिमित्त दुबई येथे गेली होती. अलीकडेच ती मुंबईत परतली. तिला दारूचे व्यसन होते. ती मुंबईत येताच धनलक्ष्मी यांनी तिच्या हत्येचा कट आखला आणि सुपारी दिल्याचे तपासातून उघड झाले.

Maharashtra TimesMaharashtra Weather Update : महाराष्ट्रातील हवामानात पुन्हा उलटफेर! पुढील चार आठवडे पावसाचं असमान वितरण, हवामान विभागाचा ताजा अंदाज

दुहेरी हत्याकांडातील आरोपींना मकोका

उल्हासनगर येथील कैलास कॉलनी चौकात भरदिवसा झालेल्या गोळीबारात दोन सख्ख्या भावांची हत्या झाली होती. या प्रकरणातील आठही आरोपींवर पोलिसांनी महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यानुसार (मकोका) कारवाई केली आहे.

उल्हासनगर कॅम्प क्र. ५ येथील कैलास कॉलनी चौकात २२ मे रोजी पूर्ववैमनस्यातून दोन गटांमध्ये जोरदार हाणामारी झाली होती. या वादाचे पर्यवसान गोळीबारात झाले. या गोळीबारात अनिल (२२) आणि अमन हरकेश चौहान (१७) या सख्ख्या भावांचा मृत्यू झाला होता. याप्रकरणी हिल लाइन पोलिसांनी चंद्रशेखर बिरादार, अजय राव, अजीज शेख, सागर पाटील, अदालत खान, कल्पेश म्हात्रे, अमन चौहान आणि प्रणय निकम यांना अटक केली.

Maharashtra TimesMumbai News : मुंबईतील गणेशोत्सव मंडळांसाठी दिलासादायक बातमी! POP मूर्तींचा विसर्जन संभ्रम तूर्तास दूर, उच्च न्यायालयाचं महत्त्वाचा निर्णय; फक्त एक अट

विशेष मकोका न्यायालयात हजर

आरोपींची गुन्हेगारी पार्श्वभूमी आणि प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन त्यांच्यावर मकोका अंतर्गत कारवाईचा प्रस्ताव तयार करण्यात आला होता. परिमंडळ ४चे पोलिस उपायुक्त सचिन गोरे यांच्या मार्गदर्शनाखाली हा प्रस्ताव तयार करण्यात आला. अतिरिक्त पोलिस आयुक्त संजय जाधव यांनी या प्रस्तावास मंजुरी दिली. बुधवारी या दुहेरी हत्याकांडातील सर्व आरोपींना ठाणे येथील विशेष मकोका न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने तपास पूर्ण करून आरोपपत्र दाखल करण्यासाठी पोलिसांना आणखी ९० दिवसांची मुदत दिल्याची माहिती सहाय्यक पोलिस आयुक्त शैलेश काळे यांनी दिली.

प्रशांत पाटील

लेखकाबद्दलप्रशांत पाटीलप्रशांत पाटील ‘महाराष्ट्र टाईम्स ऑनलाईन'(TIL) या आघाडीच्या डिजिटल माध्यम समूहात सीनियर डिजिटल कंन्टेट प्रोड्युसर पदावर कार्यरत आहेत. पुणे जिल्ह्यातील नामांकित ‘थोडक्यात’ न्यूज वेब पोर्टल, हैदराबादमधील ‘आधान शॉर्ट न्यूज अॅप’, ‘सकाळ मिडिया ग्रुप’ आणि आता ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’, असा जवळपास पाच ते साडेपाच वर्षांपेक्षा अधिक काळ ते कार्यरत आहेत. प्रशांत पाटील यांना महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील सर्व गुन्हेगारी, अपघात, शेतकरी विषयक बातम्या, ग्रामीण भागात यश संपादन केलेल्या तरुणी किंवा तरुणांच्या सक्सेस स्टोरीज् आणि महाराष्ट्र हायपर लोकल अशा विविध विषयांची आवड आहे. ऑगस्ट (2026) पासून ‘महाराष्ट्र टाईम्स ऑनलाईन’साठी (TIL) काम करत आहेत. या दरम्यान, राज्यातील विधानसभा, लोकसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकींच्या बातम्यांवर विशेष लक्ष ठेवतात. याआधीही त्यांनी याच माध्यम समूहासोबत तीन वर्ष काम केलं आहे.

प्रशांत पाटील यांनी पुण्यातील नामांकित आबासाहेब गरवारे महाविद्यालयातून मास कम्युनिकेशन विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. शिक्षण घेत असतानाच त्यांनी ‘थोडक्यात’ या न्यूज वेब पोर्टलला काम केलं. तिथे डिजिटल माध्यमासाठी लेखन करत असताना त्यांना डिजिटल क्षेत्रातलं कसं काम करतात? हे यश संपादन केलं. त्यानंतर त्यांना मुंबईत ‘महाराष्ट्र टाइम्य ऑनलाईन’ (TIL) या नामांकित माध्यम समूहामध्ये काम करण्याची संधी मिळाली. 28 मार्च 2022 रोजी ते ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ या मोठ्या ब्रँण्डसोबत पहिल्यांदा जोडले गेले. तिथे त्यांनी प्रदीर्घ काळ म्हणजे तीन वर्ष डिजिटल विभागात काम केलं. त्यांनतर त्यांनी फेब्रुवारी 2025 ला ‘सकाळ मिडिया ग्रुप’ला काम करण्याची संधी मिळाली. परंतु तिथे ते काम करत असताना त्यांना पुन्हा ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ (TIL) या माध्यम समूहाने संधी दिली. त्यानंतर ऑगस्ट 2026 पासून प्रशांत पाटील हे ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’सोबत (TIL) काम करताय.

‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’मध्ये (TIL) काम करताना त्यांना खूप मोठमोठ्या संध्या मिळाल्या. जसे की, व्हिडिओ करणे, महाराष्ट्रातील संपूर्ण जिल्ह्यातील रिपोर्टर यांच्याशी समन्वय साधणे, जिल्हा प्रतिनिधींकडून वेळोवेळी काम करुन घेणे, विशेष आणि काही महत्वाच्या बातम्या मागवून घेणे, अशा बऱ्याच गोष्टींची त्यांना इथे मिळाली. प्रशांत पाटील हे सकाळच्या शिफ्टला काम करत असताना लाईव्ह ब्लॉग, रिपोर्टरशी बोलणे, ब्रेकिंग बातम्या, हायपर लोकल बातम्या, ग्रामीण भागातील सर्व घडामोडींकडे लक्ष देण्याचं काम ते करतात.आणखी वाचा