Headlines

त्र्यंबकला संशयकल्लोळ; रुग्णालयाला आरक्षित जागा तरी देखील खाजगी जागांच्या ठरावाची मागणी


Trimbak News: शासनाने १०० खाटांच्या रुग्णालयाची मागणी ठेवली असताना.२०१९ च्या विकास आराखड्यात देवस्थान ट्रस्टची पाच एकर रुग्णालयासाठी आरक्षित ठेवण्यात आली आहे. तरी देखील खाजगी मालकीच्या जागांबाबत वारंवार मागणी केली जात असल्याने भूमाफियांचा हस्तक्षेप असल्याचा नागरिक संशय व्यक्त करत आहे.

त्र्यंबक
(फोटोमहाराष्ट्र टाइम्स)
म.टा.वृत्तसेवा,त्र्यंबकेश्वर :येथील दर्शनपथासाठी (दर्शन कॉरिडॉर) उपजिल्हा रुग्णालय शहरापासून सुमारे पाच किमी अंतरावर स्थलांतरित केल्याने निर्माण झालेल्या जनक्षोभानंतर शासनाने आता शहरात १०० खाटांच्या रुग्णालयासाठी जागेची मागणी पुढे केली आहे.

खासगी मालकीच्या जागांबाबत वारंवार ठराव

मात्र, कुंभमेळ्यासारखा मोठा सोहळा आयोजित करणाऱ्या प्रशासनाने रुग्णालयाच्या बांधकामाची तयारी किमान चार वर्षे आधी सुरू करणे अपेक्षित असताना, त्याकडे दुर्लक्ष झाल्याचा आरोप नागरिकांकडून होत आहे. खासगी मालकीच्या जागांबाबत वारंवार ठराव मागितले जात असल्याने याबाबत संशयकल्लोळ निर्माण झाला आहे.

दोन ते अडीच एकर जागेची मागणी

जनक्षोभ वाढल्यानंतर जिल्हा शल्यचिकित्सकांनी त्र्यंबक नगर परिषदेकडे पोलिस ठाण्यासमोरील सुमारे दोन ते अडीच एकर जागेची मागणी केली आहे. जाणकारांच्या मते, १०० खाटांचे रुग्णालय, शवविच्छेदन कक्ष, वैद्यकीय अधिकारी-कर्मचारी निवासस्थाने, पार्किंग आणि इतर सुविधांसाठी दोन ते अडीच एकर जागा अपुरी आहे.

आरक्षणे इतरत्र हलवून तेथे रुग्णालय उभारण्याचा विचार

प्रस्तावित जागा भविष्यात अधिक गजबजलेली होण्याची शक्यता असून, बसस्थानक शहराबाहेर गेल्यास ग्रामीण भागातील रुग्णांना तेथे पोहोचणे कठीण होईल. २०१९ च्या शहर विकास योजनेत या जागेवर अग्निशमन केंद्र, बगीचा यांसह चार आरक्षणे आहेत. ही आरक्षणे इतरत्र हलवून तेथे रुग्णालय उभारण्याचा विचार प्रशासन करीत असल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

प्रक्रियेत भूमाफियांचा हस्तक्षेप असावा असा संशय

दरम्यान, २०१९ च्या विकास आराखड्यात देवस्थान ट्रस्टची पाच एकर जागा रुग्णालयासाठी आरक्षित आहे. त्र्यंबक नगर परिषद सभागृहानेही यापूर्वी ठराव करून रुग्णालय हे आरक्षित भूखंडावरच उभारावे, असा एकमताने निर्णय घेतला आहे. तरीही खासगी मालकीच्या जागांबाबत वारंवार ठराव मागितले जात असल्याने या प्रक्रियेत भूमाफियांचा हस्तक्षेप असावा, असा संशय नागरिक व्यक्त करीत आहेत.वाहनतळाची प्रशस्त जागा किंवा देवस्थान ट्रस्टची आरक्षित पाच एकर जागा रुग्णालयासाठी अधिक योग्य असल्याचे मत त्र्यंबकवासीयांकडून व्यक्त होत आहे.

Maharashtra TimesNagpur News: नागपूरची खाजगी रुग्णालये मनपाच्या रडारावर; विशेष पथक ऑडिट करणार, पार्किंगच्या जागा, खाटांच्या संख्येची होणार पाहणी

प्रशासनाला धारेवर धरले.

उपजिल्हा रुग्णालय तळवाडे रस्त्यावर स्थलांतरित केल्याने संतप्त ग्रामस्थांनी गुरुवारी (दि. २०) तहसील कार्यालय, पोलिस ठाणे आणि त्र्यंबक नगरपरिषदेवर मोर्चा काढून निवेदन दिले. नगरपरिषद सभागृहातील बैठकीत संपतराव सकाळे, समाधान बोडके-पाटील, नवनाथ कोठुळे यांनी प्रशासनाला धारेवर धरले.

Maharashtra TimesMumbai News : आधी मित्राची कार दामटवली, मग थेट पोलिसांचं वाहन पळवून कोस्टल रोडवर धुमाकूळ, अनेक वाहनांना धडक, माथेफिरु ताब्यात

१०० खाटांच्या रुग्णालयासाठी जागा निश्चित

मुख्याधिकारी गोविंद जाधव यांनी १०० खाटांच्या रुग्णालयासाठी जागा निश्चित करण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे सांगितले. नगराध्यक्षा त्रिवेणी तुंगार यांनी उपजिल्हा रुग्णालय आठ दिवसांत पूर्वीच्या जागेवर कार्यान्वित करण्याचे आश्वासन दिले. यावेळी महिलांनी शासनाच्या कुंभमेळा धोरणाचा निषेध केला.

कांचन परुळेकर

लेखकाबद्दलकांचन परुळेकरकांचन परुळेकर महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये कन्सलटंट पदावर कार्यरत आहेत. कांचन स्थानिक बातम्या, पायाभूत सुविधा, बांधकाम आणि विकास प्रकल्प यासाठी लिखाण करतात. त्यांच्या पत्रकारितेच्या प्रवासाला सुरुवात ही महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमधून झाली. मार्च २०२६ मध्ये महाराष्ट्र टाइम्सच्या व्हिडिओ विभागात त्यांनी इंटर्न म्हणून काम केले. सुरुवातीला त्यांनी युट्यूब, फेसबुक आणि इन्स्टाग्रामसाठी कन्टेंट तयार करताना व्हिडिओ आणि लेख लिहिले आहेत. महाराष्ट्रातील राजकीय घडामोडी, स्थानिक बातम्या आणि क्राइमसह स्पोर्ट्सवर इत्यादी विषयांचे वाचन आणि लेखन करण्याची त्यांना विशेष आवड आहे.

कांचन यांचे संपूर्ण शिक्षण मराठी माध्यमातून झाले असून पत्रकारितेची आवड असल्याने त्यांनी कोकण ते मुंबई असा शैक्षणिक प्रवास केला. २०२५ मध्ये बॅचलर्सचे शिक्षण गावी पूर्ण केले. इकोनॉमिक्स या विषयातून पद्वी घेतली. लिखाणाची आवड, संवाद साधण्याचे कौशल्य आणि पत्रकारितेची आवड समजून घेऊन साठ्ये कॉलेज विलेपार्ले येथे वृत्तपत्रविद्या आणि संवाद या विषयात त्यांनी पद्व्युत्तर शिक्षणासाठी प्रवेश घेतला.

महाविद्यालयीन काळात कला आणि नाटक विषयात विशेष आवड असल्याने त्यांनी अभिनयदेखील केले आहे. काही नाटक त्यांनी लिहिले आहेत. मुंबई विद्यापीठाच्या युथ फेस्टिवलमध्ये त्यांना अभिनयासाठी ब्रॉन्झ आणि सिल्व्हर मेडल देण्यात आले आहेत. कविता आणि लेख लिहिण्याची आवड असल्याने शाळा ,कॉलेज मासिक अंकात त्यांचे लेख देखील प्रसिध्द झाले आहेत.

२०२६ मध्ये महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन सोबत जोडल्या गेल्यानंतर त्यांची पत्रकारितेची आवड अगदी स्पष्ट झाली. बोलण्यातला स्पष्टपणा लिखाणातली पारदर्शकता अधिक नव्याने समजत गेली. तीन महिन्यांच्या इंटर्नशिप नंतर त्या आता कन्सलटंट पदावर म.टा. समुहात सहभागी झाल्या आहेत. पारदर्शकता आणि विश्वासार्ह माहिती वाचकांपर्यंत पोहचवण्याचं काम त्या करत आहेत.आणखी वाचा