Headlines

Farhana Bhatt Recalled Casting Couch Memory While Audition ; Farhana Bhatt Casting Couch : सिनेमाच्या आमिषाने मुंबईला बोलावलं पण कॉण्ट्रॅक्टमधल्या अटी वाचून बसला धक्का, दिग्दर्शकाचा वाईट हेतू समजताच फरहाना भट्टने काढला पळ


Farhana Bhatt Casting Couch Memory : इंडस्ट्रीत काम करताना कलाकारांना मोठ्या कामाचं आमिष दाखवत अनेकदा वाईट हेतूने बोलवालं जातं . या विषयावर कलाकार शांत राहतात तर काही निडरपणे भाष्य करतात. अभिनेत्री फरहाना भट्टने तिला आलेला अनुभव एका मुलाखतीत सांगितला.

farhana bhatt
(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
बिग बॉसमध्ये गेल्यावर अनेकांचे नशीब पालटते. अनेकांना भरपूर प्रोजेक्ट मिळतात. तर काहींना त्यांच्या वागण्याचा पश्चाताप करत बसावा लागतो. या शोमध्ये आल्यावर अनेक कलाकार त्यांच्या वैयक्तिक आयुष्यातील गोष्टी इतर स्पर्धकांशी शेअर करतात ज्या पुढे प्रेक्षकांना समजल्यावर त्यांनाही आश्चर्य वाटते. पडद्यावर एक प्रकारची इमेज घेऊन वावरत असलेले हे कलाकार खऱ्या आयुष्यात कसे आहे हे या शोमधून पाहायला मिळतं.

बिग बॉस 19 मध्ये सर्वाधिक चर्चेत आलेली स्पर्धक म्हणजे अभिनेत्री फरहाना भट्ट. फरहाना भट्ट ही बिग बॉस 19 ची फायनलिस्ट होती. या शोमध्ये ती तिच्या तिखट स्वभाव तसेच स्पष्टवक्तेपणासाठी जास्त चर्चेत आली. या शोनंतर तिने नशीब जास्त चमकले कारण तिला वेगवेगळ्या ऑफर्स मिळू लागल्या. एका गाण्याच्या अल्बममध्ये दिसल्यानंतर ती आता खतरों के खिलाडी 15 मध्येही दिसणार आहे.

Maharashtra TimesKangana Ranaut On Sharmila Tagore :वंदे मातरम् च्या पहिल्या दोनच ओळी ठीक! शर्मिला टागोर यांच्या मतावर कंगना रणौतचा निशाणा; हिंदू-मुस्लिम विचारांतून बाहेर पडण्याचा सल्ला
एका मुलाखतीत फरहानाने तिच्या आयुष्यात घडलेली एक भयंकर घटना शेअर केली. त्यात ती कास्टिंग काउचसारख्या प्रकाराची शिकार होण्यापासून थोडक्यात वाचली होती.

कश्मीरमध्ये 15 मार्च 1997 मध्ये जन्माला आलेली फरहाना तिचे करियर घडवण्यासाठी मुंबईत राहते. करियरच्या सुरुवातीला तिला एका महिलेने तिला फोन करुन बॉलिवूड सिनेमात काम देते असे आमिष दाखवत मुंबईला बोलवून घेतलेले. फरहाना भट्टने दैनिक भास्करला दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, त्या महिलेने मला म्हटले- लवकरच शूट सुरू होणार आहे. हॉटेलमध्ये राहण्याची सोयही केली आहे. तिचं ऐकून मी मुंबईला आली. पण मुंबईत आल्यावर मला हॉटेलमध्ये नेण्याऐवजी एक दिग्दर्शकाच्या घरी नेलं गेलं.

फरहाना भट्टने त्या रात्रीच्या आठवणी सांगताना म्हटले की, मला तिथे रात्री कॉण्ट्रॅक्ट वाचायला दिले गेले. त्यात एक अट होती की अभिनेत्रीला काही आठवडे दिग्दर्शकाच्या फार्महाऊसवर राहावे लागेल. अभिनेत्री पुढे सांगितले की ते कॉन्ट्रॅक्ट वाचताच माझ्या लक्षात आलेलं की इथे काहीतरी गडबड आहे. मी लगेचच त्या महिलेला फोन केला जिने मला या फिल्मची ऑफर दिलेली. त्याचवेळी दिग्दर्शकाने मला त्याच्या खोलीत बोलावले. मी खूप घाबरले होते.

Maharashtra TimesAditi Sarangdhar On Neelam Shirke : माझं आणि नीलम शिर्केचं भांडण होतं, वादळवाटच्या अवॉर्डनंतर काय घडलेलं? अदिती सारंगधरनं सांगितला कोल्ड वॉरचा किस्सा
फरहाना पुढे म्हणाली- त्या दिग्दर्शकाने मला खोलीत बसवून ठेवले. मी माझ्या स्वरक्षणासाठी बाजूचा फ्लॉवर पॉट हातात पकडून ठेवला होता. मी माझ्या मैत्रिणीला मेसेज करुन याची कल्पना दिलेली. तिला मी सांगितलं होती की जर मला काही चुकीच होतय असं जाणवलं तर मी लगेच हल्ला करेन. त्यानंतर तिने त्या दिग्दर्शकावर दबाव आणून तिचे व तिच्या मैत्रिणीचे परतीचे तिकिट काढून घेतले अन् श्रीनगरला परतली.

फरहाना भट्टला नंतर समजलं की तो कथित दिग्दर्शक बऱ्याच जणांना असा धोका देऊन झाला होता. त्याने निर्मात्यांचे पैसे बुडावले होते अन् नंतर गायब झालेला. फरहानाच्या मते जर ती सतर्क नसती तर परिस्थिती नक्कीच बिघडली असती.

फरहाना भट्ट बद्दल बोलायचे झाल्यास तिने श्रीनगर मधून आपले शालेय शिक्षण पूर्ण केले नंतर मुंबईत तिने मास कम्युनिकेशन आणि पत्रकारितेत पदवी मिळवली. त्यानंतर तिने सिनेसृष्टीत पदार्पण केले. 2016 मध्ये तिने सनशाइन म्यझिक एंड ट्रॅव्हल्समधून तिने सनी कौशलसोबत बॉलिवूडमध्ये काम करायाला सुरुवात केली होती. या व्यतिरिक्त ती लैला मजनू या सिनेमातही दिसली आहे.

आकांक्षा तळेकर

लेखकाबद्दलआकांक्षा तळेकरआकांक्षा तळेकर महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये कन्सल्टन्ट या पदावर कार्यरत आहे. फेब्रुवारी 2023 मध्ये मटा ऑनलाइनमध्ये काम करण्यास सुरूवात केली. तेव्हापासून मनोरंजन, फिल्म इंडस्ट्री विषयक बातम्या लिहिण्यात हातखंडा आहे. तसेच कलाकारांच्या मुलाखती घेणे, वेगवेगळ्या इव्हेंटला उपस्थित राहून तेथील महत्वाच्या बातम्या करणे, सेट व्हिजिट देऊन त्यावर आर्टिकल बनवण्याचा अनुभव आहे.
पत्रकारितेतील अनुभव
आकांक्षा तळेकर यांचा पत्रकारितेच्या अनुभवाची सुरुवात सामना या वृत्तपत्रापासून झाली. तिथे इंटर्नशीप करताना बातम्यांचा पाया काय असतो इथपासून ते अचूक बातम्यांची निवड कशी करावी या गोष्टी शिकून घेतल्या. त्यानंतर लोकशाही वाहिनीवर दुसरी इंटर्नशीप केली आणि मग तिथेच 6 महिने टिकर ऑपरेटर म्हणून काम केले. यावेळी ब्रेकिंग न्यूज करताना प्रेक्षकांना वाचण्यासाठी कोणते शब्द महत्वाचे असतात, किंवा पत्रकारितेमधले शब्द आणि सामान्य आयुष्यातले शब्द यांच्यातील तफावत शिकता आली. लोकशाही वृत्तवाहिनीमध्ये व्हायरल शोसाठी स्क्रिप्ट लिखाणही केले आहे. हे करत असताना विविध व्हायरल व्हिडिओंपाठी नेमकं सत्य काय हे शोधण्याची सवय लागली. त्यामुळे एखादी बातमी करताना त्याचा ठोस पाठपुरावा करावा हे शिकण्यात आले.
लोकशाहीनंतर मुक्तपीठ या वेबपोर्टलसाठी काही काळ काम केले. तिथे व्हिडिओ बनवणे, कॅमेऱ्यासमोर वृत्तवाचन करणे आदी काम केली. या सर्व गोष्टी करत असताना मेघा मराठी या मनोरंजन विषयक वेबपोर्टलसाठी रोज आर्टिकल लिहिण्याचे काम सुरू होते. त्यामध्ये बॉलिवूड किंवा मराठी इंडस्ट्रीमध्ये लेटेस्ट घडणाऱ्या घडामोडी आर्टिकल स्वरुपात दिल्या.
करोनाच्या काळात बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या व्हॅक्सिन सेंटरमध्ये डेटा ऑपरेटर म्हणून दीड वर्ष कार्य केले. त्यावेळी सर्वसामान्य व्यक्ती, त्यांचे स्वभाव आणि अडीअडचणी जवळून जाणता आल्या. हे काम करत असताना विविध राजकिय पक्षांसंबंधित लोकांशी सतत संपर्क होत होत्या. त्यामुळे राजकारणात काय चालू असते याची थोडीफार जाण झाली ज्याचा उपयोग पुढे पत्रकारितेमद्ये झाला.
त्यानंतर हेमा मालिनी संपादक असलेल्या मेरी सहेली या मासिकाची मराठी आवृत्ती माझी सहेली मध्ये 3 वर्षे काम केले आहे. माझी सहेलीमध्ये मनोरंजन विषय कोलम लिहिणे तसेच पॉडकास्टमध्ये वेगवेगळ्या विषयांचे संशोधन करणे, मुलाखतींसाठी प्रश्न तयार करण्याचे काम केले. सध्या महाराष्ट्रा टाइम्स ऑनलाइनध्ये मनोरंजन सिनेसृष्टीविषय बातम्या करणे, गाजलेल्या मालिकांचे अपडेट्स देणे, कलाकारांच्या महत्वाच्या सोशल मीडियावर पोस्टबाबत बातमी तयार करुन ती वाचकांपर्यंत पोहचवण्याचे काम करत आहेत. तसेच मालिका किंवा सिनेमांच्या प्रेस कॉन्फरन्समध्ये जाऊन कलाकारांच्या मुलाखती घेण्याचा अनुभव आहे. मनोरंजन विषयाशिवाय क्राइम आणि व्हायरल व्हिडिओवरुन बातम्या करण्याचीही आवड आहे.
शैक्षणिक माहिती
आकांक्षा तळेकर यांनी पार्ले टिळक विद्यालयातून शालेय शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर साठ्ये महाविद्यालयात विज्ञान शाखेतून 12 वी दिली. पुढे साठ्ये महाविद्यालयातच BMM हा स्पेशल कोर्स केला आणि त्यात पत्रकारितेची पदवी मिळवली.
आणखी वाचा