Headlines

JJ Hospital: संमतीविना पदभरती; जे. जे. रुग्णालयातील 18 सहाय्यक प्राध्यापकांची नियुक्ती मुदतीपूर्वीच रद्द – appointments of 18 assistant professors at mumbai jj hospital cancelled before term ended


शर्मिला कलगुटकर, मुंबई : सर जे. जे. रुग्णालयाच्या विविध विभागांमध्ये नियमबाह्य पद्धतीने करण्यात आलेल्या १८ सहाय्यक प्राध्यापकांच्या नियुक्ती मुदत संपण्यापूर्वीच रद्द करण्यात आल्या आहेत. वैद्यकीय शिक्षण व संचनालयाची रितसर संमती न घेता विविध विभागांमधील गरजेपेक्षा अधिक पदे भरण्यात आली होती.

कार्डिओलॉजी विभागात दोन पदांची उपलब्धता असताना तिथे सहा जागा भरण्यात आल्या. विविध विभागांमध्ये नियम डावलून पदभरती करण्यात आल्याचे सरकारच्या निदर्शनास आल्याने यासंदर्भात रुग्णालय प्रशासनाकडे विचारणा करण्यात आली. त्यावेळी रुग्णालय प्रशासनास कोणतेही समाधानकार उत्तर देता आलेले नाही. वैद्यकीय शिक्षण व संचनालयाची पूर्वसंमती न घेता ही पदे भरल्याचे निष्पन्न झाल्याने रुग्णालय प्रशासनाने कंत्राटी पद्धतीने असलेली ही पदांची सेवा तत्काळ समाप्त करण्याचे निर्देश दिले. रुग्णालय प्रशासनाने ३६५ दिवसांसाठी केलेल्या या नियुक्त्या मुदत होण्यापूर्वी रद्द केल्या आहेत.

Maharashtra TimesMumbai Fraud: घराचे स्वप्न राहिले अपूर्णच! गोरेगावात 27 जणांना गंडवलं, तब्बल 56 लाखांची फसवणूक, तिघांविरुद्ध गुन्हाया पदभरतीमुळे रुग्णालयातील विविध विभागांमध्ये करण्यात आलेल्या १८ सहाय्यक प्राध्यापकांच्या कंत्राटी नियुक्त्यांवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. ही पदभरती कुणाच्या निर्देशाने करण्यात आली यासंदर्भातही चौकशी सुरू आहे. सरकारने द्विस्तरीय समितीची स्थापना केली आहे. या समितीच्या सदस्य डॉ. शिल्पा डोमकुंदवार यांच्याकडे यासंदर्भात विचारणा केली असता त्यांनी सादर केलेल्या कागदपत्रांची पडताळणी केली जात असून तूर्तात अतिरिक्त माहिती देता येणार नाही असे सांगितले.

वैद्यकीय शिक्षण विभागाच्या वरिष्ठ प्रशासकीय अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार कंत्राटी स्वरुपातील पदभरती असली तरीही संबंधित प्रक्रिया पूर्ण करण्यापूर्वी रितसर संमती घ्यावी लागते. ही पदे ३६५ दिवसांसाठी कंत्राटी पद्धतीने भरण्यात आली होती.

Maharashtra TimesGaneshotsav Special Trains: चाकरमान्यांच्या खिशाला कात्री! गणेशोत्सव विशेष गाड्यांसाठी नियमितपेक्षा दीड-दुप्पट भाडे, पण तरीही सेवेची बोंबविशेष विनंतीवरून…
मिळालेल्या माहितीनुसार ही पदे’ विशेष विनंती’ केल्यामुळे संस्थास्तरावर भरण्यात आली. या नियुक्त्या होण्यापूर्वी डीएमईआर किंवा सक्षम प्राधिकरणाची आवश्यक परवानगी घेण्यात आली होती का, नसल्यास ती का घेण्यात आली नाही असा प्रश्न डीएमईआरने उपस्थित केला आहे.

रुग्णसेवेसाठी विविध विभागांमध्ये मनुष्यबळाची वाढती गरज लक्षात घेऊन कंत्राटी पद्धतीने या डॉक्टरांची पदे भरली होती. मात्र, निर्देश येताच सेवासमाप्ती करण्यात आली. –डॉ. अजय भंडारवार, रुग्णालय अधिष्ठाता

Maharashtra TimesMaharashtra SIR: अंतिम मतदार यादी नोव्हेंबरमध्ये; निवडणूक आयोगाकडून SIR वेळापत्रकात पुन्हा बदलनियुक्त्या अशा…
शल्यचिकित्सा, अस्तिव्यंगोपचार, बालरोग, नेत्ररोग, कान-नाक-घसा, क्ष किरण, हृदयरोग, मज्जातंतू, मूत्ररोग आणि मनोविकृती अशा विविध विभागांतील डॉक्टरांचा समावेश
-काही विभागातील डॉक्टरांची नियुक्ती ही ४ जून २०२६ ते ३१ मे २०२७ तर काहींची २८ जानेवारी २०२६ ते २६ जानेवारी २०२७, १३ ऑक्टोबर २०२५ ते ११ ऑक्टोबर २०२६, १८ नोव्हेंबर २०२६ ते १६ नोव्हेंबर २०२६ या कालावधीसाठी करण्यात आली होती
-ही नियुक्ती ३६५ दिवसांसाठी होती. मात्र, मुदत संपण्यापूर्वी त्याला समाप्ती देण्यात आली



Source link

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत