Pune Railway: पुणे आणि कोल्हापूर शहरातून प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी मध्य रेल्वेनं दिलासादायक आणि मोठा निर्णय घेतला आहे.

हडपसर-हरंगुळ ‘ट्रेन ऑन डिमांड’ विशेष गाडी १५ ऑगस्टपासून ‘११४२९/११४३० हडपसर-हरंगुळ-हडपसर एक्स्प्रेस’ या नवीन क्रमांकाने दररोज धावत आहे. गाडी क्रमांक ११४२९ हडपसरहून सकाळी ६:२० वाजता सुटून दुपारी १:०० वाजता हरंगुळला पोहोचेल, तर परतीची ११४३० गाडी हरंगुळहून दुपारी ३:०० वाजता सुटून रात्री ८:४५ वाजता हडपसरला पोहोचेल. या गाडीला उरुळी, दौंड, कुर्डुवाडी, बार्शी आणि धाराशिवसह प्रमुख स्थानकांवर थांबे देण्यात आले आहेत.
Ganesh Bidkar: पुणे पालिकेत महायुतीत ठिणगी; ‘युती फक्त राज्यात’ म्हणत गणेश बीडकरांचा राष्ट्रवादीला थेट इशारादुसऱ्या टप्प्यात, पुणे-कोल्हापूर गाडी २० ऑक्टोबरपासून ‘११४१९/११४२० पुणे-कोल्हापूर-पुणे दैनिक एक्स्प्रेस’ म्हणून नियमित होईल. गाडी क्रमांक ११४१९ पुण्याहून रात्री ९:४० वाजता सुटून पहाटे ५:०८ वाजता कोल्हापूरला पोहोचेल. परतीची ११४२० गाडी कोल्हापूरहून रात्री ९:५० वाजता सुटून पहाटे ५:१० वाजता पुण्यात येईल.
पवारांचे खासदार PM मोदींना भेटले, राष्ट्रवादी NDA सोबत जाणार? अमोल कोल्हेंची प्रतिक्रिया
अनधिकृत प्रवेशमार्ग बंद करा- डॉ. अमोल कोल्हे
पुणे-नाशिक सेमी हायस्पीड रेल्वे मार्ग पूर्वीच्या मार्गानेच व्हावा. त्यासाठी पंतप्रधान, रेल्वेमंत्री यांना माहिती दिली. स्थानिक पातळीवर रेल्वे खात्याने सहकार्य करावे. चाकण औद्योगिक वसाहत व परिसरातील सततच्या वाहतूक कोंडीमुळे येथील उद्योग स्थलांतरित होण्याच्या मार्गावर आहेत. या पार्श्वभूमीवर पुणे जिल्ह्याच्या औद्योगिक विकासाच्या दृष्टीने छत्रपती संभाजीनगर- रांजणगाव एमआयडीसी- चाकण एमआयडीसी- तळेगाव एमआयडीसी ते जेएनपीटी बंदर असा समर्पित मालवाहतूक कॉरिडॉर करावा,’ अशी मागणी खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी बैठकीत केली.

