Headlines

Kangana Ranaut Posted On Blue Drum Bengaluru Case ; Kangana Ranaut On Bengaluru Case : तुमच्या आसपासही एखादा निळा ड्रम असू शकतो! बंगळूरमध्ये घडलेल्या भयंकर प्रकरणावर कंगणाने काढला राग, पाश्चिमात्य संस्कृतीला धरलं जबाबदार


Kangana Ranaut Post : अभिनेत्री खासदार कंगना रणौतने बंगळूर येथे घडलेल्या प्रकरणावर तिचे मत व्यक्त करत पाश्चिमात्य संस्कृतीला जबाबदार धरले आहे.

kangana ranaut
(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
बेंगळुरूमध्ये एका महिलेने आपल्या बॉयफ्रेंडच्या मदतीने पती आणि आपल्या पाच वर्षांच्या मुलाची हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली. या प्रकरणावर आता अभिनेत्री खासदार कंगना रणौतने प्रतिक्रिया दिली आहे. कंगनाने अशा घटनांसाठी पाश्चात्य संस्कृतीला जबाबदार धरले आणि त्यातून उद्भवणाऱ्या दुष्परिणामांबाबत लोकांना सावध केले आहे. तिने इशारा दिला की, आधुनिक ‘डेटिंग‘ संस्कृतीतील अनिर्बंध वागणूक दुरून पाहताना जरी ती ‘कूल’ (आधुनिक व आकर्षक) वाटत असली, तरी त्याचे परिणाम अत्यंत धोकादायक असू शकतात.

बेंगळुरूतील या हत्या प्रकरणावर बोलताना, कंगना रणौतने सध्याच्या काळात नातेसंबंधांचे बदलत चाललेले स्वरूप आणि भारतात पाश्चात्य संस्कृतीचा वाढता प्रभाव यांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. तिने आपल्या इन्स्टाग्राम स्टोरीजवरील एका पोस्टद्वारे या विषयावर भाष्य केले आणि रिलेशनशिप संबंधित गुन्ह्यांमध्ये होत असलेल्या वाढीबाबत आपले मत स्पष्ट केले. बेंगळुरूतील हत्येबाबतची बातमी शेअर करत तिने प्रश्न उपस्थित केला की, जोडीदारच एकमेकांविरुद्ध जाण्याच्या घटना का वाढत आहेत; तसेच या पोस्टमधून अभिनेत्रीने भारतीयांना नातेसंबंधांबाबतचा पाश्चात्य दृष्टिकोन स्वीकारण्याबाबत पुनर्विचार करण्याचे आवाहन केले.

image (1)

Maharashtra TimesAbhishek Bachchan Jaipur Connection : तिथेच मी आणि ऐश्वर्याने एकमेकांना डेट करायला सुरूवात केली; अभिषेक बच्चनने पहिल्यांदाच सांगितले खास ‘जयपूर’ कनेक्शन

‘जेव्हा स्वतःचेच मूल अशा प्रकारे ड्रममध्ये सापडते, तेव्हा परिस्थिती पूर्णपणे वेगळी असते’

कंगना लिहिते, “जवळपास दर दुसऱ्या दिवशी आपण अशा बातम्या ऐकतोय. कधी महिला पुरुषांना डोंगरावरून खाली ढकलतात, तर कधी पुरुष महिलांना निळ्या रंगाच्या ड्रममध्ये कोंबून घेऊन जातात. पाश्चात्य संस्कृती स्वीकारणे सोपे आहे, पण पाश्चात्य देशांमध्ये ‘अरेंज्ड मॅरेज’ किंवा जुन्या-पुराण्या परंपरांच्या सामाजिक दबावापोटी लोक एकमेकांचा जीव घेत नाहीत. वर वर पाहता हे सर्व ‘कूल’ वाटू शकते, पण जेव्हा स्वतःचेच मूल अशा प्रकारे ड्रममध्ये सापडते, तेव्हा परिस्थिती पूर्णपणे वेगळी असते. त्यामुळे, आता तरी जागे व्हा. ‘बेंचिंग’, ‘घोस्टिंग’, ‘ब्रेडक्रंबिंग’ आणि ‘बॉडी काउंट्स’ (अनेक जोडीदारांशी शारीरिक संबंध ठेवणे) यांसारख्या गोष्टींना तुमच्या आयुष्यावर ताबा मिळवू देऊ नका. या गोष्टींना सामान्य मानू नका.”

Maharashtra TimesShatrughan Sinha : ‘मला भाजपकडून पुन्हा ऑफर आलेली’, शत्रुघ्न सिन्हा यांचा दावा, नरेंद्र मोदींबद्दल काय म्हणाले?

‘स्वतः प्रेत बनल्यावर रडू नका’

कंगनाने पुढे लिहिले, ‘जर तुम्हाला मानवी संबंधांचे मूल्य केवळ “बॉडी काउंट” (शारीरिक संबंधांच्या संख्ये) वरून ठरवणे मान्य असेल, तर स्वतः प्रेत बनल्यावर रडू नका. माणसांच्या संबंधांची व्याख्या केवळ “बॉडी काउंट”वरून करणाऱ्या पाश्चात्य संस्कृतीला नकार द्या. मला ट्रोल केले तरी चालेल, पण लक्षात ठेवा, तुमच्या आसपासही एखादा निळा ड्रम असू शकतो.’

निळ्या ड्रमचा फोटो शेअर करत साधला निशाणा

image (2)

कंगना रणौतने आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर पुन्हा एकदा निळ्या ड्रमचा फोटो शेअर करत टीका केली; तिने म्हटले की, जे लोक नातेसंबंधांकडे केवळ एक ‘आकडा’ म्हणून पाहतात, त्यांच्यासाठी हा संदेश आहे. बेंगळुरू येथील एका घटनेत, एक व्यक्ती आणि तिचा पाच वर्षांचा मुलगा मृत अवस्थेत आढळले. पोलिसांनी त्या व्यक्तीच्या पत्नीला अटक केली असून, या हत्येमध्ये तिच्या बॉयफ्रेंडचा कथित सहभाग आणि मुलाच्या मृत्यूशी संबंधित तपशील यांबाबत पोलीस तपास करत आहेत.

आकांक्षा तळेकर

लेखकाबद्दलआकांक्षा तळेकरआकांक्षा तळेकर महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये कन्सल्टन्ट या पदावर कार्यरत आहे. फेब्रुवारी 2023 मध्ये मटा ऑनलाइनमध्ये काम करण्यास सुरूवात केली. तेव्हापासून मनोरंजन, फिल्म इंडस्ट्री विषयक बातम्या लिहिण्यात हातखंडा आहे. तसेच कलाकारांच्या मुलाखती घेणे, वेगवेगळ्या इव्हेंटला उपस्थित राहून तेथील महत्वाच्या बातम्या करणे, सेट व्हिजिट देऊन त्यावर आर्टिकल बनवण्याचा अनुभव आहे.
पत्रकारितेतील अनुभव
आकांक्षा तळेकर यांचा पत्रकारितेच्या अनुभवाची सुरुवात सामना या वृत्तपत्रापासून झाली. तिथे इंटर्नशीप करताना बातम्यांचा पाया काय असतो इथपासून ते अचूक बातम्यांची निवड कशी करावी या गोष्टी शिकून घेतल्या. त्यानंतर लोकशाही वाहिनीवर दुसरी इंटर्नशीप केली आणि मग तिथेच 6 महिने टिकर ऑपरेटर म्हणून काम केले. यावेळी ब्रेकिंग न्यूज करताना प्रेक्षकांना वाचण्यासाठी कोणते शब्द महत्वाचे असतात, किंवा पत्रकारितेमधले शब्द आणि सामान्य आयुष्यातले शब्द यांच्यातील तफावत शिकता आली. लोकशाही वृत्तवाहिनीमध्ये व्हायरल शोसाठी स्क्रिप्ट लिखाणही केले आहे. हे करत असताना विविध व्हायरल व्हिडिओंपाठी नेमकं सत्य काय हे शोधण्याची सवय लागली. त्यामुळे एखादी बातमी करताना त्याचा ठोस पाठपुरावा करावा हे शिकण्यात आले.
लोकशाहीनंतर मुक्तपीठ या वेबपोर्टलसाठी काही काळ काम केले. तिथे व्हिडिओ बनवणे, कॅमेऱ्यासमोर वृत्तवाचन करणे आदी काम केली. या सर्व गोष्टी करत असताना मेघा मराठी या मनोरंजन विषयक वेबपोर्टलसाठी रोज आर्टिकल लिहिण्याचे काम सुरू होते. त्यामध्ये बॉलिवूड किंवा मराठी इंडस्ट्रीमध्ये लेटेस्ट घडणाऱ्या घडामोडी आर्टिकल स्वरुपात दिल्या.
करोनाच्या काळात बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या व्हॅक्सिन सेंटरमध्ये डेटा ऑपरेटर म्हणून दीड वर्ष कार्य केले. त्यावेळी सर्वसामान्य व्यक्ती, त्यांचे स्वभाव आणि अडीअडचणी जवळून जाणता आल्या. हे काम करत असताना विविध राजकिय पक्षांसंबंधित लोकांशी सतत संपर्क होत होत्या. त्यामुळे राजकारणात काय चालू असते याची थोडीफार जाण झाली ज्याचा उपयोग पुढे पत्रकारितेमद्ये झाला.
त्यानंतर हेमा मालिनी संपादक असलेल्या मेरी सहेली या मासिकाची मराठी आवृत्ती माझी सहेली मध्ये 3 वर्षे काम केले आहे. माझी सहेलीमध्ये मनोरंजन विषय कोलम लिहिणे तसेच पॉडकास्टमध्ये वेगवेगळ्या विषयांचे संशोधन करणे, मुलाखतींसाठी प्रश्न तयार करण्याचे काम केले. सध्या महाराष्ट्रा टाइम्स ऑनलाइनध्ये मनोरंजन सिनेसृष्टीविषय बातम्या करणे, गाजलेल्या मालिकांचे अपडेट्स देणे, कलाकारांच्या महत्वाच्या सोशल मीडियावर पोस्टबाबत बातमी तयार करुन ती वाचकांपर्यंत पोहचवण्याचे काम करत आहेत. तसेच मालिका किंवा सिनेमांच्या प्रेस कॉन्फरन्समध्ये जाऊन कलाकारांच्या मुलाखती घेण्याचा अनुभव आहे. मनोरंजन विषयाशिवाय क्राइम आणि व्हायरल व्हिडिओवरुन बातम्या करण्याचीही आवड आहे.
शैक्षणिक माहिती
आकांक्षा तळेकर यांनी पार्ले टिळक विद्यालयातून शालेय शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर साठ्ये महाविद्यालयात विज्ञान शाखेतून 12 वी दिली. पुढे साठ्ये महाविद्यालयातच BMM हा स्पेशल कोर्स केला आणि त्यात पत्रकारितेची पदवी मिळवली.
आणखी वाचा