Headlines

वंदना गुप्तेंचा अलिबागमधील व्हाईट थीमचा आलिशान बंगला पाहिलात का?,प्रत्येक कोपरा आहे खास – marathi actors visit vandana gupte alibaug luxury home get home decor ideas


वंदना गुप्ते यांच्या अलिबागमधील घराची झलक पाहिल्यानंतर मोठी जागा, व्हाईट थीम, मोठ्या खिडक्या, घराभोवतीची हिरवळ आणि स्विमिंग पूल या सगळ्यामुळे हे घर किती सुंदर आणि निवांत असेल याची कल्पना येते. ‘कुटुंब किर्रतन’च्या टीमने या घरात घालवलेला वेळही त्यांच्या अलिबाग दौऱ्यातील एक सुंदर आठवण ठरला आहे.

Vandana Gupte Alibaug Home
फोटो सौजन्य :- @vandanagupteofficial, @sankarshankarhade
Vandana Gupte Alibaug Home : वंदना गुप्तेंच्या अलिबागच्या घरी ‘कुटुंब किर्रतन’ नाटकाच्या टीमचा पाहुणचार Vandana Gupte Alibaug Home : नाटक, मालिका, चित्रपट अशा तिन्ही माध्यमांमध्ये आपल्या अभिनयचा ठसा उमटवणाऱ्या ज्येष्ठ अभिनेत्री वंदना गुप्ते यांचं नाव आज घराघरांत लोकप्रिय आहे. ‘पछाडलेला’, ‘बाईपण भारी देवा’, ‘टाइमप्लीज’, ‘बकेट लिस्ट’, ‘अशी ही जमवा जमवी’ अशा एकापेक्षा एक दर्जेदार चित्रपटांमध्ये त्यांनी महत्त्वपूर्ण भूमिका साकारल्या आहेत. त्यांचा चाहतावर्ग मोठ्या प्रमाणात आहे. वंदना गुप्ते सध्या रंगभूमीवर ‘कुटुंब किर्रतन’ या लोकप्रिय मराठी विनोदी नाटकात महत्त्वपूर्ण भूमिका साकारत आहेत.

‘कुटुंब किर्रतन’ नाटकाचे प्रयोग नुकतेच अलिबागमध्ये पार पडले. या टिमने वंदना गुप्तेच्या घरी राहिले. ते ठिकाण म्हणजे वंदना गुप्ते यांचं अलिबागमधील आलिशान घर. अभिनेत्रीचा अलिबागमध्ये आलिशान बंगला आहे. याठिकाणी संपूर्ण नाटकाच्या टीमला निमंत्रित करून वंदना गुप्तेंनी या सगळ्यांचा मोठ्या आनंदाने पाहुणचार केला. याचे खास फोटो संकर्षण कऱ्हाडेने इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. ‘कुटुंब किर्रतन’ नाटकाची संपूर्ण टीम यावेळी वंदना गुप्तेंच्या घरी पोहोचली होती. एकत्र जेवण, स्विमिंग पूलमध्ये धमाल, अलिबागच्या निसर्गरम्य वातावरणाची झलक अभिनेत्याने शेअर केलेल्या फोटोमध्ये पाहायला मिळत आहे.(फोटो सौजन्य :- @vandanagupteofficial, @sankarshankarhade)

अलिबागच्या निसर्गाच्या सान्निध्यात वंदना गुप्तेंचं सुंदर घर

अलिबागच्या निसर्गाच्या सान्निध्यात वंदना गुप्तेंचं सुंदर घर

मुंबईच्या धावपळीपासून दूर असलेल्या अलिबागमध्ये अनेक सेलिब्रिटींनी आपली सेकंड होम्स उभारली आहेत. मात्र वंदना गुप्ते यांच्या घराची खासियत केवळ त्याच्या आलिशानपणात नाही, तर घराच्या सजावटीतही दिसून येते. सोशल मीडियावर समोर आलेल्या फोटोंमध्ये घराच्या इंटिरिअरमध्ये पांढऱ्या रंगाची थीम विशेष लक्ष वेधून घेते. पांढरा रंग घराला शांत, प्रसन्न आणि प्रशस्त लूक देतो. वंदना गुप्ते यांच्या अलिबागच्या घरातही याच रंगाचा सुंदर वापर करण्यात आल्याचं फोटोंवरून दिसतं. घराभोवतीचा हिरवागार निसर्ग आणि घरातील पांढऱ्या रंगाची सजावट यामुळे संपूर्ण वातावरणाला एक वेगळीच आल्हाददायक झळाळी मिळते.

‘कुटुंब किर्रतन’च्या टीमचा खास पाहुणचार

‘कुटुंब किर्रतन’च्या टीमचा खास पाहुणचार

अलिबागमधील नाटकाचा प्रयोग संपल्यानंतर ‘कुटुंब किर्रतन’च्या टीमने वंदना गुप्ते यांच्या घरी हजेरी लावली. या भेटीत कलाकारांनी एकत्र जेवणाचा आनंद घेतला. त्यानंतर स्विमिंग पूलमध्ये धमाल करत टीमने निवांत वेळही घालवला.अभिनेता संकर्षण कऱ्हाडे यांनी या खास भेटीचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले. या फोटोंमधून नाटकाच्या टीममधील कलाकारांमधील जिव्हाळ्याचं नातंही पाहायला मिळतं. नाटकाच्या प्रयोगानंतर कलाकारांनी एकत्रितपणे केलेली ही मस्ती त्यांच्या व्यावसायिक नात्यापलीकडील मैत्रीची झलक दाखवते.फोटोंमध्ये घराचा काही भाग, स्विमिंग पूल आणि अलिबागच्या निसर्गरम्य वातावरणाची झलक पाहायला मिळते. त्यामुळे चाहत्यांचं लक्ष केवळ कलाकारांकडेच नाही, तर वंदना गुप्ते यांच्या घराकडेही वेधलं गेलं.

व्हाईट थीममधून मिळू शकतात घर सजावटीच्या भन्नाट कल्पना

व्हाईट थीममधून मिळू शकतात घर सजावटीच्या भन्नाट कल्पना

वंदना गुप्ते यांच्या घरातील सजावट पाहून तुम्हालाही आपल्या घरासाठी काही इंटिरिअर आयडिया घेता येऊ शकतात. सध्या घराच्या सजावटीमध्ये मिनिमल आणि एलिगंट लूकला मोठी पसंती मिळत आहे. यासाठी पांढरा रंग उत्तम पर्याय ठरू शकतो.
पांढऱ्या भिंती आणि नैसर्गिक प्रकाश
घरातील भिंतींसाठी ऑफ-व्हाईट, आयव्हरी किंवा क्रीमसारख्या सौम्य शेड्सचा वापर केल्यास घर अधिक मोठं आणि प्रकाशमान दिसू शकतं. विशेषतः नैसर्गिक प्रकाश भरपूर असलेल्या घरात हा रंग खुलून दिसतो.
लाकडी फर्निचरचा वापर
संपूर्ण घर पांढऱ्या रंगात सजवल्यास ते काही वेळा थंड किंवा नीरस वाटू शकतं. त्यामुळे त्यात लाकडी फर्निचर, वूडन फ्लोअरिंग किंवा ब्राउन रंगाच्या छोट्या अॅक्सेसरीजचा वापर केल्यास घराला उबदारपणा मिळतो.
पांढऱ्या रंगासोबत हिरवळ
अलिबागसारख्या निसर्गरम्य ठिकाणी घराभोवतीची हिरवळ हीच सजावटीचा महत्त्वाचा भाग ठरू शकते. घराच्या बाल्कनीत, खिडकीजवळ किंवा अंगणात इनडोअर प्लांट्स ठेवल्यास व्हाईट थीम आणखी सुंदर दिसते.

वंदना गुप्ते अलिबाग घर

स्विमिंग पूल आणि ओपन स्पेस ठरते आकर्षणाचा केंद्रबिंदू

स्विमिंग पूल आणि ओपन स्पेस ठरते आकर्षणाचा केंद्रबिंदू

वंदना गुप्ते यांच्या अलिबागमधील घराचे फोटो पाहताना स्विमिंग पूल आणि आजूबाजूचा मोकळा परिसरही लक्ष वेधून घेतो. शहरातील गजबजाटापासून दूर असलेल्या घरात अशी ओपन स्पेस असेल तर ती कुटुंबीय आणि मित्रांसोबत वेळ घालवण्यासाठी उत्तम ठरते.नाटकाच्या टीमनेही या स्विमिंग पूलमध्ये मस्ती करत आपला वेळ संस्मरणीय केला. कलाकारांचे आनंदी चेहरे आणि अलिबागच्या वातावरणातील निवांतपणा या फोटोंमधून स्पष्टपणे जाणवतो.

मोठ्या खिडक्यांमुळे घरात येतो भरपूर नैसर्गिक प्रकाश

मोठ्या खिडक्यांमुळे घरात येतो भरपूर नैसर्गिक प्रकाश

वंदना गुप्ते यांच्या अलिबागमधील घराची आणखी एक खासियत म्हणजे मोठ्या खिडक्या. या खिडक्यांमधून घरात भरपूर नैसर्गिक प्रकाश येतो आणि घर अधिक प्रशस्त व हवेशीर दिसतं. बाहेरची हिरवाई आणि निसर्गरम्य वातावरणही या मोठ्या खिडक्यांमधून घराच्या इंटिरिअरचा एक भागच वाटतं.व्हाईट थीमसोबत मोठ्या खिडक्यांचा वापर केल्यामुळे घराचा लूक आणखी खुलतो. दिवसा कृत्रिम प्रकाशाची फारशी गरज भासत नाही आणि घरातील पांढऱ्या रंगावर पडणारा नैसर्गिक प्रकाश संपूर्ण जागेला प्रसन्न वातावरण देतो. मोठ्या खिडक्या आणि पांढऱ्या रंगाची थीम ही घराला प्रशस्त, आधुनिक आणि एलिगंट लूक देण्यासाठी उत्तम इंटिरिअर कल्पना ठरू शकते.

घराभोवतीची हिरवळ देते निसर्गरम्य लूक

घराभोवतीची हिरवळ देते निसर्गरम्य लूक

वंदना गुप्ते यांच्या अलिबागमधील घराची आणखी एक लक्षवेधी बाब म्हणजे घराभोवती असलेली हिरवळ. घराच्या आजूबाजूला असलेल्या झाडाझुडपांमुळे संपूर्ण परिसराला प्रसन्न आणि निवांत वातावरण मिळतं. शहरापासून दूर निसर्गाच्या सान्निध्यात वेळ घालवण्यासाठी हे घर अगदी योग्य वाटतं.

पांढऱ्या रंगाच्या घराला आजूबाजूची हिरवळ सुंदर कॉन्ट्रास्ट देते. मोठ्या खिडक्यांमधून बाहेरची हिरवाई दिसत असल्याने घराच्या आत बसूनही निसर्गाचा आनंद घेता येतो. पांढऱ्या रंगाचं घर, मोठ्या खिडक्या आणि आजूबाजूची हिरवळ यामुळे वंदना गुप्ते यांच्या अलिबागच्या घराला साधा पण आलिशान आणि प्रसन्न लूक मिळाला आहे.

मृणाल पाटील

लेखकाबद्दलमृणाल पाटीलमृणाल पाटील या महाराष्ट्र टाइम्स.कॉममध्ये कार्यरत असलेल्या अनुभवी पत्रकार आणि डिजिटल कंटेंट रायटर असून मीडिया क्षेत्रात त्यांना 11 वर्षांहून अधिक काळाचा अनुभव आहे. टेलिव्हिजन, डिजिटल मीडिया, प्रिंट पत्रकारिता आणि जनसंपर्क या विविध क्षेत्रांमध्ये काम करत त्यांनी विश्वसनीय,अभ्यासपूर्ण आणि वाचकाभिमुख लेखनाची भक्कम ओळख निर्माण केली आहे. मनोरंजन, लाइफस्टाईल, फिचर स्टोरीज, ट्रेंडिंग विषय आणि सेलिब्रिटी मुलाखती या विषयांवर सखोल माहिती देणारे लेखन हे त्यांचे प्रमुख कौशल्य आहे.

मृणाल यांनी ‘प्रहार’ वर्तमानपत्रामध्ये प्रवास आणि खाद्यसंस्कृती विषयावर साप्ताहिक लेखन केले आहे. विविध शहरांची संस्कृती, स्थानिक परंपरा आणि खाद्यवैशिष्ट्ये यावर आधारित त्यांच्या लेखांना वाचकांकडून उत्तम प्रतिसाद मिळाला आहे. ‘TV 9’ या प्रतिष्ठित न्यूज चॅनलसाठी त्यांनी अनेक नामांकित कलाकारांच्या मुलाखती घेतल्या असून मनोरंजन पत्रकारितेमध्ये त्यांनी भक्कम अनुभव मिळवला आहे. तसेच आकाशवाणी मुंबईसाठी ‘मन की बात’ या कार्यक्रमासाठी व्हॉइस ओव्हरचे काम करण्याचा अनुभव देखील त्यांच्या कार्यात महत्त्वपूर्ण ठरला आहे.

जनसंपर्क क्षेत्रात कार्यरत असताना त्यांनी 30 पेक्षा अधिक क्लायंट्सचे यशस्वीपणे व्यवस्थापन केले असून ब्रँड कम्युनिकेशन, कंटेंट स्ट्रॅटेजी आणि मीडिया समन्वय यामध्ये त्यांनी उल्लेखनीय कामगिरी केली आहे. सध्या महाराष्ट्र टाइम्समध्ये ट्रेंडिंग आणि लाईफस्टाईल विषयांवर संशोधनाधारित, अचूक आणि विश्वसनीय माहिती देणारे लेख लिहिणे ही त्यांची विशेष ओळख आहे. तथ्य पडताळणी, विश्वासार्ह स्रोतांचा वापर आणि वाचकांसाठी उपयुक्त माहिती सादर करण्यावर त्यांचा विशेष भर असतो.

लेखनासोबतच वाचन आणि सोलो ट्रॅव्हलिंग ही त्यांची आवड असून विविध ठिकाणांच्या संस्कृती, जीवनशैली आणि सामाजिक रचनेचा अभ्यास करण्यामध्ये त्यांना विशेष रस आहे. व्यायाम, हॉलिवूड चित्रपट आणि नव्या तंत्रज्ञानाविषयी माहिती मिळवणे हे देखील त्यांचे आवडते छंद आहेत. आपल्या अनुभव, संशोधन आणि निरीक्षणांच्या आधारे वाचकांना दर्जेदार, अचूक आणि विश्वासार्ह माहिती देण्याचा त्या सातत्याने प्रयत्न करतात.

शैक्षणिक पात्रता
मृणाल पाटील यांनी 2017-18 मध्ये मुंबई विद्यापीठातून मास्टर ऑफ आर्ट्स इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम (MACJ) पदवी प्राप्त केली आहे. डिजिटल मीडिया ट्रेंड्स, बदलती वाचक प्रवृत्ती आणि माहिती सादरीकरणाच्या आधुनिक पद्धतींचा त्या सातत्याने अभ्यास करतात.आणखी वाचा