या पोस्टमध्ये त्यांनी अमेरिकेच्या वाढत्या कर्जाबद्दल चिंता व्यक्त केली आहे. 13 ऑगस्ट 2026 नुसार, अमेरिकेवर एकूण कर्ज 39.93 ट्रिल्यन डॉलर्स इतके आहे. एकंदरीत, अमेरिकेवर जवळपास 40 ट्रिल्यन डॉलरचे कर्ज आहे. अमेरिकेवरील वाढत्या या कर्जाबाबत रॉबर्ट कियोस्की यांनी अर्थव्यवस्थेसाठी चिंता व्यक्त केली आहे. त्यामुळेच गुंतवणूकदारांना कॅशपेक्षा सोने आणि चांदीसारख्या धातूंमध्ये गुंतवणूक करण्याचा सल्ला त्यांच्याकडून देण्यात येत आहे.
रॉबर्ट कियोस्की यांची सोशल मीडिया पोस्ट पाहून अनेकांना ‘चांदीच का? सोने का नाही?’ असा प्रश्न नक्कीच पडला असेल, पण त्यांच्या या सल्ल्याचे कारण त्यांनी स्वतःही स्पष्ट केले नाहीये, तसेच याबाबत फार मोठे स्पष्टीकरणही दिले नाहीये. एकंदरीत, त्यांनी पोस्टच्या माध्यमातून अमेरिकेवर वाढत्या कर्जाविषयी चिंता व्यक्त केली आहे. अर्थव्यवस्थेवर होणाऱ्या परिणामाविषयी चिंता व्यक्त केली आहे. या दरम्यान, सोने-चांदीकडे जास्त लक्ष केंद्रित करण्याचा सल्ला त्यांनी दिला आहे. परंतु, जास्त स्पष्टीकरण न देता त्यांनी खासकरून ऑगस्ट महिन्यासाठी चांदीला पसंती दिली आहे.
रॉबर्ट कियोस्की यांनी Jim Rickards यांच्या अंदाजाचा हवाला दिला आहे. जीम रिकार्डस यांच्या अंदाजानुसार चांदी 200 डॉलर्स प्रति ounce पर्यंत पोहचण्याची शक्यता आहे. तर सोने 10,000 डॉलर्स प्रति ounce पर्यंत पोहचण्याची शक्यता आहे. या किंमती कधी पर्यंत मिळतील? याबद्दल कोणताही दावा दोघांकडून करण्यात आलेला नाही. सध्याचा सोन्याचा दर पाहता तो 4,400 डॉलर्स प्रति ounce पेक्षा जास्त आहे. तर चांदीचा दर जवळपास 65 ते 66 डॉलर्स प्रति ounce इतका आहे. रिकार्डस यांच्या अंदाजानुसार तो अर्ध्यापेक्षा जास्त वाढण्याची शक्यता आहे.
Sugar Imports: सणासुदीच्या तोंडावर साखरेत तेजीचा गोडवा! निर्यात बंदी, स्टॉक लिमिटनंतर आता 100 टक्के शुल्क माफीचा विचाररॉबर्ट कियोस्की यांनी पहिल्यांदा सोने-चांदीत गुंतवणुकीचा सल्ला दिला नसून या आधीपासून त्यांनी अनेकदा याविषयी सांगितले आहे. त्यांच्याकडून करण्यात आलेली ही पोस्ट जीम रिकार्डस यांच्या अंदाजाचा निव्वळ हवाला आहे. ते निश्चित नाही.

