Headlines

‘घरकुल योजने’साठी पाच ब्रास वाळू उपलब्ध; मोफत वाळूसाठी ९३२ लाभार्थी पात्र


Chhatrapati Sambhajinagar: जिल्ह्यात मोफत वाळू योजनेचा लाभ हा घरकूलाचे बांधकाम सुरू झालेल्यांनाच मिळतो. गौण खनिज विभागाने अहवाल सादर केल्यानंतर तपासणीअंती घर बांधकाम सुरू असलेले ९३२ लाभार्थीच पात्र ठरले.

मोफत वाळू योजना
(फोटोमहाराष्ट्र टाइम्स)
म.टा.प्रतिनिधी,छत्रपती संभाजीनगर : शासनाने घरकुल योजनेतील पात्र लाभार्थ्यांना घर बांधण्यासाठी पाच ब्रास वाळू मोफत देण्याचा निर्णय घेतला आहे. या योजनेअंतर्गत जिल्ह्यात गतवर्षापासून वाळूसाठी मागणी प्रस्ताव दाखल होत असून आतपार्यंत ९३२ घरकूलासाठी ४ हजार २६८ ब्रास वाळू वितरित करण्यात आली आहे, अशी माहिती जिल्हा गौण खनिकर्म कार्यालयाने दिली.

वाळूपैकी काही साठा घरकुलांसाठी राखीव

गतवर्षी जिल्हा खनिकर्म विभागाकडून वाळू घाटासाठी राबविण्यात आलेल्या निविदा प्रक्रियेत घरकुलांसाठी पाच ब्रास वाळू राखीव ठेवण्याबाबतही त्यात नमूद केले होते. त्यानुसार गतवर्षी प्रत्येक तालुक्यांमध्ये मंजूर वाळू घाटातील लिलावपात्र वाळूपैकी काही साठा घरकुलांसाठी राखीव ठेवण्यात आला होता.

पात्र लाभार्थ्यांना प्रत्येकी पाच ब्रास वाळू वाटप

या प्रक्रियेत गौण खनिज विभागाकडे ३१ जुलै २०२६ पर्यंत ९३२ पात्र लाभार्थ्यांना प्रत्येकी पाच ब्रास वाळूवाटपास मंजुरी देण्यात आली होती. परंतु, त्यापैकी ८५४ लाभार्थ्यांनाच मोफत वाळू वितरित करण्यात आली, अशी माहिती सूत्रांनी दिली.

Maharashtra TimesBhandara News: रेती उत्खननाचा 71 कोटींचा दंड रद्द? शिवसेनेच्या दाव्याने भंडाऱ्यात खळबळ; प्रशासनाकडून इन्कार

प्रशासनाचे निर्देशन

घरकुल मंजुरीची प्रक्रिया वेगाने पूर्ण व्हावी, यासाठी प्रशासनाने ग्रामीण आवास योजनेच्या लाभार्थ्यांच्या जागेचे प्रस्ताव मंजूर करून लाभार्थ्यांची यादी, जागा, आराखडा आणि कागदपत्रे जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेमार्फत तातडीने सादर करावे, असे निर्देश दिले.

घरकुल बांधकामासाठी पाच ब्रास वाळू मोफत मिळावी

त्यानुसार घरकुल बांधकामासाठी पाच ब्रास वाळू मोफत मिळावी, यासाठी लाभार्थ्यांच्या घरापासून जवळ अंतरावर असलेल्या शासकीय वाळू डेपोतून ही वाळू उपलब्ध करून देण्याची कार्यवाही महसूल आणि ग्रामविकास विभागाने समन्वयाने करून येणाऱ्या अडचणी दूर कराव्यात, असे आदेशही जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी यांनी दिले आहेत.

Maharashtra TimesDevendra Fadnavis : अनेकांना वाटतं मी दिल्लीत जावं, पण मोदींनी माझ्यावर महाराष्ट्र सोपवलाय; फडणवीसांनी निक्षून सांगितलं, मुख्यमंत्रिपदी कायम

वाळू योजनेचा लाभ हा घरकूलाचे बांधकाम सुरू झालेल्यांनाच

जिल्ह्यात मोफत वाळू योजनेचा लाभ हा घरकूलाचे बांधकाम सुरू झालेल्यांनाच मिळतो. मात्र, गौण खनिज विभागाने केलेल्या अहवानानंतर ग्राम पंचायतींनी तहसील कार्यालयांकडे बांधकाम पूर्ण झालेल्या घरकूलांसह मागणी नोंदविली होती. त्यानुसार २८ हजार ९८३ घरकुलांसाठी एक लाख ४२ हजार ४९५ ब्रास वाळूची मागणी करण्यात आली होती. मात्र, तपासणीअंती घर बांधकाम सुरू असलेले ९३२ लाभार्थीच पात्र ठरल्याचे सूत्रांनी सांगितले.

कांचन परुळेकर

लेखकाबद्दलकांचन परुळेकरकांचन परुळेकर महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये कन्सलटंट पदावर कार्यरत आहेत. कांचन स्थानिक बातम्या, पायाभूत सुविधा, बांधकाम आणि विकास प्रकल्प यासाठी लिखाण करतात. त्यांच्या पत्रकारितेच्या प्रवासाला सुरुवात ही महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमधून झाली. मार्च २०२६ मध्ये महाराष्ट्र टाइम्सच्या व्हिडिओ विभागात त्यांनी इंटर्न म्हणून काम केले. सुरुवातीला त्यांनी युट्यूब, फेसबुक आणि इन्स्टाग्रामसाठी कन्टेंट तयार करताना व्हिडिओ आणि लेख लिहिले आहेत. महाराष्ट्रातील राजकीय घडामोडी, स्थानिक बातम्या आणि क्राइमसह स्पोर्ट्सवर इत्यादी विषयांचे वाचन आणि लेखन करण्याची त्यांना विशेष आवड आहे.

कांचन यांचे संपूर्ण शिक्षण मराठी माध्यमातून झाले असून पत्रकारितेची आवड असल्याने त्यांनी कोकण ते मुंबई असा शैक्षणिक प्रवास केला. २०२५ मध्ये बॅचलर्सचे शिक्षण गावी पूर्ण केले. इकोनॉमिक्स या विषयातून पद्वी घेतली. लिखाणाची आवड, संवाद साधण्याचे कौशल्य आणि पत्रकारितेची आवड समजून घेऊन साठ्ये कॉलेज विलेपार्ले येथे वृत्तपत्रविद्या आणि संवाद या विषयात त्यांनी पद्व्युत्तर शिक्षणासाठी प्रवेश घेतला.

महाविद्यालयीन काळात कला आणि नाटक विषयात विशेष आवड असल्याने त्यांनी अभिनयदेखील केले आहे. काही नाटक त्यांनी लिहिले आहेत. मुंबई विद्यापीठाच्या युथ फेस्टिवलमध्ये त्यांना अभिनयासाठी ब्रॉन्झ आणि सिल्व्हर मेडल देण्यात आले आहेत. कविता आणि लेख लिहिण्याची आवड असल्याने शाळा ,कॉलेज मासिक अंकात त्यांचे लेख देखील प्रसिध्द झाले आहेत.

२०२६ मध्ये महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन सोबत जोडल्या गेल्यानंतर त्यांची पत्रकारितेची आवड अगदी स्पष्ट झाली. बोलण्यातला स्पष्टपणा लिखाणातली पारदर्शकता अधिक नव्याने समजत गेली. तीन महिन्यांच्या इंटर्नशिप नंतर त्या आता कन्सलटंट पदावर म.टा. समुहात सहभागी झाल्या आहेत. पारदर्शकता आणि विश्वासार्ह माहिती वाचकांपर्यंत पोहचवण्याचं काम त्या करत आहेत.आणखी वाचा