Headlines

Sahasrachandradarshan Maharashtra Times article; आजचा लेख : सहस्रचंद्रदर्शनाच्या आधी


आपल्या भारतीय व हिंदू संस्कृतीमध्ये ‘सहस्रचंद्रदर्शन’ यास एक वेगळे महत्त्व आहे. वयाची ८० वर्षे पूर्ण करणाऱ्या व्यक्तीने तिच्या आयुष्यात एक हजार पौर्णिमा पाहिलेल्या असतात, असा एक ढोबळ हिशेब. जे व्यक्तीचे तेच राष्ट्राचेही. सन २०२७मध्ये देशाच्या स्वातंत्र्यास ८० वर्षे पूर्ण होतील तेव्हा ती घडी देशासाठी सहस्रचंद्रदर्शनाचीच. त्या महत्त्वाच्या घडीकडे वाटचाल करताना, काही आधीची स्मरणे नि खूपशी पुढची नियोजने आलीच. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी परवाच्या १५ ऑगष्ट रोजी, देशाच्या ८०व्या स्वातंत्र्यदिनी लाल किल्ल्यावरून देशवासीयांना उद्देशून केलेल्या तेराव्या भाषणाकडे या दृष्टीने पाहता येईल. मोदी यांनी या भाषणाद्वारे कुणाकुणाचे विक्रम मोडले, त्यांचे भाषण किती काळ चालले, त्यांच्या कपड्यांचा-फेट्याचा रंग कुठला होता हे अगदीच किरकोळीतील मुद्दे. त्याहीपेक्षा, किंबहुना या वेळी आत्यंतिक महत्त्वाचा मुद्दा होता तो या भाषणाला असलेल्या पार्श्वभूमीचा. आंतरराष्ट्रीय पातळीवर विचार केला तर, अनेक टापूंमधील युद्धजन्य तणाव आणि राष्ट्रीय पातळीवर विचार केला तर, मध्यंतरी देशभर झालेली तरुणाईची – ‘जेन झी’ची – आंदोलने अशा आव्हानांची पार्श्वभूमी मोदी यांच्या या भाषणास होती. भाषणात या आव्हानांचा सूचक उल्लेख करीत मोदी त्यांस प्रतिसादही देते झाले.

पंतप्रधान मोदी आत्ताच्या सामाजिक व राजकीय परिस्थितीत तरुणांच्या प्रश्नांबाबत काय बोलतात, याकडे सगळ्यांचेच लक्ष होते आणि त्याची पुरेपूर जाण मोदी यांना होती हे त्यांच्या घोषणांवरून दिसते. नोकऱ्या आक्रसलेल्या असताना सरकारी स्पर्धा परीक्षांकडे तरुणांचा ओढा असणे स्वाभाविकच. अशा परीक्षांतील उमेदवारांना मोफत ऑनलाइन धडे देण्याचा निर्णय सरकारची प्राथमिकता दर्शवतो. त्याच्याच जोडीला, आजच्या काळात परवलीचा शब्द होऊ पाहणारा कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजेच एआयचा विषयही सरकारने हाती घेतलेला दिसतो. देशभरातील एक कोटी तरुणांच्या अंगी ‘एआय’ कौशल्य यावे, यासाठी सरकार व्यापक कार्यक्रम हाती घेईल, ही मोदी यांची घोषणा त्याचीच प्रचीती देणारी आहे. या घोषणा स्वागतार्हच. मात्र, या कौशल्यपूर्ण हातांना पुढे साजेसा रोजगार मिळेल, यासाठीची पावले तातडीने टाकणे अधिक गरजेचे. पुढील ऑलिम्पिक स्पर्धा डोळ्यांसमोर ठेवून, देशातील मुलांमधील क्रीडागुण हेरून त्यांना प्रोत्साहन देणे व उत्तमोत्तम खेळाडू घडवणे, या उद्देशाने देखील सरकार पावले टाकणार आहे. ही अशी पावले गरजेचीच.

सध्याचा जमाना पॅकेजिंगचा. देशासमोरील महत्त्वाचे विषय, क्षेत्रे सात रकान्यांत मांडून ते ‘सप्तधारा’ म्हणून मोदी यांनी सादर करणे हे या पॅकेजिंगला धरूनच झाले. देशांतर्गत उत्पादनास बळ, कृषी-अन्नधान्य निर्मितीस हात, तंत्रज्ञान-नमोन्मेषामागे उभे राहण्याची हमी, पायाभूत सुविधांचा विस्तार, संरक्षण क्षेत्राची ताकद वाढवणे, पर्यावरणानुकूल अर्थव्यवस्थेचा पाठपुरावा आणि योग-भारतीय संस्कृती यांच्या आधारे ‘सॉफ्ट पॉवर’ अधिक सक्षम करणे ही ती सप्तधारा. या सप्तधारेच्या मागे ‘आत्मनिर्भर भारत’चे उद्दिष्ट साध्य करण्याची आस दिसते. भोवतालच्या युद्धजन्य तणावात, विशेषतः इराक युद्धाच्या काळात उभ्या राहिलेल्या गंभीर समस्या लक्षात घेता हे स्वावलंबन किती गरजेचे आहे, हे साऱ्यांच्या चांगलेच लक्षात आलेले असणार. तसेच, भारत म्हणजे केवळ ‘विशाल बाजारपेठ’ ही धारणा मागे सोडून, ‘विशाल उत्पादक’ ही नवी प्रतिमा ठसवण्याचा सरकारचा प्रयत्न दिसतो. या प्रयत्नाच्या मार्गातील अनंत अडथळ्यांची जाणीव सरकारला असेल, ही अपेक्षा. नागरी संरक्षण अधिक बळकट करण्यासाठी ‘स्वयंसेवकांची फौज’ उभारण्याची मोदी यांची घोषणा लक्षवेधी; पण, हे ‘स्वयंसेवक’ कोण-कसे निवडणार, त्यांना काय अधिकार असणार, याचे तपशील जाहीर झालेले नाहीत. ते जाहीर झाल्यावरच त्यावर भाष्य करणे योग्य ठरेल. ‘लोकसभा व देशातील राज्यांमधील विधानसभा यांत महिलांना ३३ टक्के आरक्षण देण्यासाठी सहकार्य करा’ असे आवाहन मोदी यांनी केले, ते ठीकच; पण ‘मुळात संबंधित विधेयक मंजूर झालेले असून, त्याची अंमलबजावणी सरकारने करावी’, हे विरोधी पक्षांचे त्यावरील म्हणणे खोडून काढणे कठीण. ‘देशातील सशस्त्र माओवाद जवळपास संपुष्टात आला आहे; मात्र ‘दिमागी’ नक्षलींपासून सावध राहावे लागेल’, हे मोदी यांचे सांगणे ‘अर्बन नक्षल’ या शब्दप्रयोगाशी सुसंगत, किंवा त्यापुढे एक पाऊल जाणारे आहे. यावरून देशात रण माजू नये. शीतल सहस्रचंद्रदर्शनाआधी असे काही होणे बरे नाही!

प्रशांत पाटील

लेखकाबद्दलप्रशांत पाटीलप्रशांत पाटील ‘महाराष्ट्र टाईम्स ऑनलाईन'(TIL) या आघाडीच्या डिजिटल माध्यम समूहात सीनियर डिजिटल कंन्टेट प्रोड्युसर पदावर कार्यरत आहेत. पुणे जिल्ह्यातील नामांकित ‘थोडक्यात’ न्यूज वेब पोर्टल, हैदराबादमधील ‘आधान शॉर्ट न्यूज अॅप’, ‘सकाळ मिडिया ग्रुप’ आणि आता ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’, असा जवळपास पाच ते साडेपाच वर्षांपेक्षा अधिक काळ ते कार्यरत आहेत. प्रशांत पाटील यांना महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील सर्व गुन्हेगारी, अपघात, शेतकरी विषयक बातम्या, ग्रामीण भागात यश संपादन केलेल्या तरुणी किंवा तरुणांच्या सक्सेस स्टोरीज् आणि महाराष्ट्र हायपर लोकल अशा विविध विषयांची आवड आहे. ऑगस्ट (2026) पासून ‘महाराष्ट्र टाईम्स ऑनलाईन’साठी (TIL) काम करत आहेत. या दरम्यान, राज्यातील विधानसभा, लोकसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकींच्या बातम्यांवर विशेष लक्ष ठेवतात. याआधीही त्यांनी याच माध्यम समूहासोबत तीन वर्ष काम केलं आहे.

प्रशांत पाटील यांनी पुण्यातील नामांकित आबासाहेब गरवारे महाविद्यालयातून मास कम्युनिकेशन विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. शिक्षण घेत असतानाच त्यांनी ‘थोडक्यात’ या न्यूज वेब पोर्टलला काम केलं. तिथे डिजिटल माध्यमासाठी लेखन करत असताना त्यांना डिजिटल क्षेत्रातलं कसं काम करतात? हे यश संपादन केलं. त्यानंतर त्यांना मुंबईत ‘महाराष्ट्र टाइम्य ऑनलाईन’ (TIL) या नामांकित माध्यम समूहामध्ये काम करण्याची संधी मिळाली. 28 मार्च 2022 रोजी ते ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ या मोठ्या ब्रँण्डसोबत पहिल्यांदा जोडले गेले. तिथे त्यांनी प्रदीर्घ काळ म्हणजे तीन वर्ष डिजिटल विभागात काम केलं. त्यांनतर त्यांनी फेब्रुवारी 2025 ला ‘सकाळ मिडिया ग्रुप’ला काम करण्याची संधी मिळाली. परंतु तिथे ते काम करत असताना त्यांना पुन्हा ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ (TIL) या माध्यम समूहाने संधी दिली. त्यानंतर ऑगस्ट 2026 पासून प्रशांत पाटील हे ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’सोबत (TIL) काम करताय.

‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’मध्ये (TIL) काम करताना त्यांना खूप मोठमोठ्या संध्या मिळाल्या. जसे की, व्हिडिओ करणे, महाराष्ट्रातील संपूर्ण जिल्ह्यातील रिपोर्टर यांच्याशी समन्वय साधणे, जिल्हा प्रतिनिधींकडून वेळोवेळी काम करुन घेणे, विशेष आणि काही महत्वाच्या बातम्या मागवून घेणे, अशा बऱ्याच गोष्टींची त्यांना इथे मिळाली. प्रशांत पाटील हे सकाळच्या शिफ्टला काम करत असताना लाईव्ह ब्लॉग, रिपोर्टरशी बोलणे, ब्रेकिंग बातम्या, हायपर लोकल बातम्या, ग्रामीण भागातील सर्व घडामोडींकडे लक्ष देण्याचं काम ते करतात.आणखी वाचा



Source link

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत