Headlines

PM Naendra Modi Launch talent hunt for olympic 2036 announced in red for speech


PM Narendra Modi on Olympic 2036 : लाल किल्ल्यावरून 80 व्या स्वातंत्र्यदिनाच्या दिवशी देशाला संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2036 ऑलिम्पिकसाठीसाठी मोठी घोषणा केली आहे. अनेक खेळांसाठी आपण पात्रही नसतो त्यासाठी मोदींनी आतापासूनस सर्वांना सुरूवात करायला लावलीय.

PM Narendra Modi on Olympic 2036
PM Narendra Modi on Olympic 2036(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ८० व्या स्वातंत्र्यदिनी लाल किल्ल्यावरून बोलताना भारताचे २०३६ऑलिम्पिकचे यजमानपद मिळवण्याचे आणि त्या ऑलिम्पिकमध्ये सर्वच क्रीडा प्रकारांमध्ये पात्र ठरण्याचे ध्येय जाहीर केले. स्वातंत्र्यदिनाच्या भाषणात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०३६च्या ऑलिम्पिकच्या तयारीसाठी मोठी घोषणा केली. देशातील क्रीडा क्षेत्राला बळ देण्यासाठी गावे आणि शाळांमधील ५ ते १५ वयोगटातील मुलांसाठी (टॅलेंट हंट) ‘प्रतिभा शोध मोहीम’ राबवली जाईल.

या मोहिमेद्वारे लहान वयातच खेळाची आवड आणि क्षमता असलेल्या मुलांना ओळखून त्यांना व्यावसायिक प्रशिक्षण दिले जाणार आहे, ज्यामुळे २०३६च्या ऑलिम्पिकसाठी भारताकडे सर्वच खेळांमधील तयार खेळाडूंची फळी असेल. भारताला आपला पाया मजबूत करावा लागेल. विकसित भारताच्या प्रवासात युवकांची भूमिका सर्वात महत्त्वाची आहे. त्यांनाच सर्वात मोठा फायदा होणार आहे. त्यामुळे विकसित भारताचे ध्येय युवकांशी जोडून पुढे जायचे आहे आणि युवकांना आपली सर्वात मोठी प्राथमिकता बनवायचं असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदीम्हणाले.

२०३० च्या कॉमनवेल्थ गेम्सचे यजमानपद अहमदाबाद, गुजरातला मिळालं आहे. २०२६ ग्लासगो गेम्सच्या समारोप समारंभात औपचारिक हस्तांतरण झालं. २०१०नंतर भारतात होणारा हा दुसरा कॉमनवेल्थ गेम्स असेल. नरेंद्र मोदी स्टेडियम कॉम्प्लेक्स हे स्पर्धेचं मुख्य केंद्र असेल. मोदींनी सांगितलं की २०३०चे कॉमनवेल्थ गेम्स म्हणजे पायाभूत सुविधा उभारणे, नवीन टॅलेंट शोधणे आणि २०३६ऑलिम्पिकसाठी खेळाडूंची मजबूत फळी तयार करण्याची संधी आहे.

१२ वर्षांतील सरकारच्या कामगिरीचा आढावा

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या १२ वर्षांतील सरकारच्या कामगिरीचा उल्लेख केला. त्यांनी सांगितले की या काळात संरक्षण उत्पादन ४ पट, इलेक्ट्रॉनिक उत्पादन ७ पट, रेल्वे डब्यांचे उत्पादन २१ पट आणि मोबाईल फोनचे उत्पादन ३३ पट वाढले आहे. तसेच भारताने डिजिटल आणि नावीन्यपूर्ण तंत्रज्ञानाच्या क्षेत्रातही भक्कम ओळख निर्माण केली आहे.पुढे ते म्हणाले की, गेल्या एका दशकात मूलभूत सुविधा लोकांपर्यंत पोहोचवण्याचा वेग मोठ्या प्रमाणात वाढला आहे. नळाद्वारे पाणीपुरवठ्याची गती १५ पट, गॅस कनेक्शन ६ पट, गरीबांसाठी शौचालये बांधण्याचा वेग 4 पट आणि घरकुलांची गती ३ पट वाढली आहे. मोदींनी असेही सांगितले की स्वातंत्र्यानंतरच्या इतिहासात गेल्या दशकातील कामाचा वेग, प्रमाण आणि उपलब्धी अभूतपूर्व आहेत. या यशामुळे २०४७ पर्यंत विकसित भारत बनवण्याचा संकल्प निश्चितच पूर्ण होईल, असा विश्वास दृढ झाला आहे.

हरिश मालुसरे

लेखकाबद्दलहरिश मालुसरे हरिश मालुसरे, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये एक्झिक्युटिव्ह कंटेंट प्रॉड्युसर म्हणून कार्यरत आहेत. ते २०२४ पासून मटा ऑनलाइनसोबत जोडले गेले आहेत. गेली सात वर्षे ते विविध मीडिया समूहांमध्ये काम करत आहेत. त्यांना स्पोर्ट्स, क्राइम आणि राजकीय बातम्यांमध्ये विशेष रुची आहे.

पत्रकारितेमधील अनुभव
पुण्यात पत्रकारितेचे शिक्षण घेत असताना झी २४ तास आणि सकाळ या माध्यम समूहांमध्ये इंटर्नशीप केली होती. त्यानंतर मास मीडियाच्या शेवटच्या वर्षाला असताना ‘थोडक्यात’ या वेब पोर्टलमध्ये इंटर्न म्हणून काम केले आहे. त्यानंतर थोडक्यात मध्येच नोकरीची संधी मिळाली, तिथेच काही दिवसांनी शिफ्ट इंचार्ज म्हणून जबाबादारी सांभाळली. यादरम्यान लोकसभा आणि विधानसभा २०१९ निवडणुकांचे टेक्स्ट बातम्यांमधून वार्तांकन केले. मराठी चित्रपटसृष्टीतील ‘श्रीराम समर्थ’ या चित्रपटातील संत रामदासांची भूमिका साकारणारे मराठी अभिनेते शंतून मोघे यांची छोटेखानी मुलाखत घेतली. (लिंक : https://youtu.be/-wsyyekJ-DE?si=SaJ_OC9nUgLFmKXK)

‘थोडक्यात’ नंतर सकाळ डीजिटलमध्ये सोशल मीडिया एक्सेक्युटिव्ह म्हणून काम पाहिले आहे, त्यावेळी टी-२० वर्ल्ड कपचे लाईव्ह करत क्रीडाप्रेमींना माहिती दिली. त्यानंतर ‘पोलीसनामा’मध्ये काम करत असताना सीडीआर वाचून समजून घेत अनेक स्टोरी साध्या आणि सोप्या शब्दात बातमी लेखन केले. यादरम्यान कॉलेज पूर्ण झाल्यावर झी २४ तासमध्ये संधी मिळाली, मुंबईत झी २४ तासमध्ये महाराष्ट्र केसरी कु्स्ती स्पर्धेवर विशेष स्टोरी केल्या आहेत. टीव्ही९ मराठीमध्ये Sub-Editor, Social Media Executive म्हणून काम पाहिले आहे. त्यानंतर २०२४ मध्ये महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये जॉइन झाले.

महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये महाराष्ट्र, क्राइम आणि स्पोर्ट्स या तिन्ही सेक्शनमध्ये ट्रेंडनुसार बातमी लेखन करतात. आता पार पडलेल्या विधानसभा निवडणूक आणि निकालांचे कव्हरेज बातम्यांच्या माध्यमातून केले. महापालिका निवडणुकांमध्ये मुंबई, पुणे आणि पिंपरी चिंचवड आणि कोल्हापूर या महत्त्वाच्या जिल्ह्यांचे स्थानिक पातळीवर भागानुसार सविस्तर वार्तांकन केले आहे. महापालिका निवडणुकीमध्ये सायली वांजळे यांची मुलाखत घेतली होती. लिंक: https://youtu.be/Wejw-eMnXqI?si=jyeD36tRboIc9bpJ. त्यासोबतच आता टी-२० वर्ल्ड कप २०२६ चे कव्हरेज पाहत आहेत.

शैक्षणिक पात्रता
हरीश मालुसरे यांचे पदवीपर्यंतचे शिक्षण पुणे जिल्ह्यातील नामांकित आबासाहेब गरवारे महाविद्यालयातून झाले आहे. तिथूनच 2022 साली एम. ए. जर्नलिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण पूर्ण केले. त्यांचे मराठी हिंदी आणि इंग्रजी भाषेवर प्रभुत्व असून डिजिटल पत्रकारितेतील सातहून अधिक वर्षांचा अनुभव आहे.आणखी वाचा